अमेरिकेत फडकला सर्वात मोठा तिंरगा
' विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा उँचा रहे हमारा ' या ओळी शब्दशः ख-या करत अमेरिकेत भारतीयांनी आजवरचा सर्वात मोठा तिरंगा ध्वज फडकावला. या ध्वजाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.
शनिवारपासून शिकागोत मॅजेस्टिक सिअर्स सेंटर अॅरेना येथे सुरू झालेल्या वायब्रंट इंडिया फेस्टिव्हलमध्ये गुजरात आणि राजस्थानच्या समृद्ध ऐतिहासिक परंपरा आणि संस्कृतीचे महत्त्व सांगणारे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे औचित्य साधून अमेरिकेतील भारतीयांनी २५० किलो वजनाच्या १५३ फूट लांबीच्या तिरंग्याला सलामी दिली. छोटेलाल एस. सिंधिया यांनी हा ध्वज तयार केला होता. प्रदर्शन सोहळ्याचे आयोजक एम सय्यद यांच्या हस्ते ध्वज फडकावण्यात आला.
दोन दिवसांच्या प्रदर्शन सोहळ्यानंतर हा विक्रमी तिरंगा भारतात येणार आहे. सर्वात आधी गुजरातमध्ये नवसारी येथे ध्वजाचे आगमन होईल. तिथून विविध राज्यांमध्ये ध्वज नेण्यात येणार आहे. विशेष सोहळ्यांचे आयोजन देशात ठिकठिकाणी या ध्वजाला सलामी देण्यात येईल.
No comments:
Post a Comment