विद्याथ्र्यांनो, आपली प्राचीन देवभाषा 'संस्कृत'चे माहात्म्य ओळखा ! : 'संस्कृत ही ईश्वरानेच निर्माण केलेली भाषा आहे. जगातील सर्वच भाषांची ती जननी आहे. संस्कृतचे महत्त्व आज पाश्चात्त्यांनीही ओळखले आहे. पाश्चात्त्य संगणकशास्त्रज्ञ अशा भाषेच्या शोधात होते की, जिचा संगणकीय प्रणालीत वापर करून, तिचे जगातील कोणत्याही आठ भाषांत तत्क्षणीच रूपांतर होईल. त्यांना तशी भाषा संस्कृत'च आढळली. संस्कृत ही संगणकीय प्रणालीसाठी उपयुक्त असणारी जगातील सर्वोत्तम भाषा आहे. वेद, उपनिषदे, गीता आदी मूळ धर्मग्रंथ संस्कृतमध्ये आहेत.
१. संस्कृत ही ईश्वरनिर्मित भाषा !
आपल्या वैदिक परंपरेने विश्वनिर्मितीपासूनचा साद्यंत इतिहास जतन करून ठेवला आहे. प्रथम सर्वत्र शून्य होते. मग 'ॐ' असा ध्वनी अवकाशात निनादला. शेषषायी श्रीविष्णु प्रगट झाला. त्याच्या नाभीतून ब्रह्मदेव प्रगटला. त्यानंतर प्रजापति, मातृका, धन्वंतरी, गंधर्व, विश्वकर्मा आदी निर्माण झाले. त्याच वेळी विश्वाचे ज्ञानभांडार ज्यात सामावले आहे, असे वेद ईश्वराने उपलब्ध करून दिले. वेद संस्कृत भाषेत आहेत. संस्कृत ही 'देववाणी' आहे. वेद जसे अपौरुषेय म्हणजे ईश्वरप्रणीत आहेत, तशीच संस्कृत भाषाही ईश्वरनिर्मित आहे. तिची रचना आणि लिपी ईश्वराने निर्माण केली आहे; म्हणून त्या लिपिलाही 'देवनागरी' म्हणतात. संस्कृत भाषेची सर्व नावेही ती देवभाषा असल्याचे स्पष्ट करतात, उदा. 'गीर्वाणभारती' हे नाव पहा. त्यातील 'गीर्वाण' या शब्दाचा अर्थ 'देव' असा आहे.
ईश्वराच्या संकल्पाने ही सृष्टी निर्माण झाली. मानवाच्या निर्मितीनंतर मानवाला आवश्यक ते सर्वकाही त्या ईश्वरानेच दिले. एवढेच नव्हे, तर मानवाला काळाप्रमाणे पुढे ज्याची आवश्यकता भासेल, तेही द्यायची त्याने व्यवस्था केली आहे. सृष्टीच्या निर्मितीपूर्वीच ईश्वराने मनुष्यप्राण्याला मोक्षप्राप्तीसाठी उपयोगी पडणारी आणि चैतन्याने ओतप्रोत भरलेली अशी एक भाषा तयार केली. तिचे नाव 'संस्कृत' !
आद्यमानव मनु आणि शतरूपा यांंना ब्रह्मदेवाने संस्कृत शिकवले. ब्रह्मदेवाने आपल्या अत्री, वसिष्ठ, गौतमादी मानसपुत्र ऋषींना वेद शिकविले, संस्कृत शिकविले.
२. दत्तगुरूंनी संस्कृत भाषेची पुनर्निर्मिती केली.
त्रेतायुगामध्ये जिवाची शब्दातीत ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता कमी झाली. त्यामुळे शब्दांच्या माध्यमातून जिवाला ज्ञान प्राप्त होऊन मोक्षप्राप्ती सुलभतेने व्हावी, यासाठी दत्तगुरूंनी संस्कृत भाषेची पुनर्निर्मिती केली.
३. द्वापारयुगापर्यंत संस्कृत हीच विश्वभाषा !
सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग या तीन युगांमध्ये संस्कृत हीच विश्वाची भाषा होती. त्यामुळे तिला 'विश्ववाणी'ही म्हणतात. अगदी कौरव-पांडवांच्या काळापर्यंत संस्कृत हीच विश्वातील एकमेव भाषा होती !
१. ॐकार:
२. ॐकार त्याच परमात्म्याचा वाचक आहे.
वेदधर्माचे महत्त्व सर्वांना कळणे आवश्यक :
वेदांमध्ये मिळालेल्या या काही गोष्टी,
वेदांनी आमची संस्कृती घडविली, रक्षिली, चिरंतन केली. (संवाद, गुरुदेव प्रकाशन, पृष्ठ २, ३ व ४)
श्लोक अर्थासहित
१. नमस्ते शारदे देवि वीणापुस्तकधारिणि ।
विद्यारम्भं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा ॥
अर्थ : हाती वीणा आणि ग्रंथ धारण केलेल्या हे सरस्वती देवी तुला वंदन करून मी अभ्यासाला प्रारंभ करत आहे. तू माझ्यावर नेहमी प्रसन्न रहा.
२. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
अर्थ : वाईट मार्गाने आचरण करणार्यांना सरळ मार्गावर आणणार्या, विशाल शरीर असलेल्या, कोटी सूर्यांची प्रभा लाभलेल्या हे देवा श्रीगणेशा माझी सर्व कार्ये नेहमी निर्विघ्नपणे पार पडू देत.
३. रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः॥
अर्थ : भूतलावर अवतरित होऊन भक्तजनांचे मनोरथ पूर्ण करणार्या, रामचंद्र, प्रजापती, रघुनाथ, नाथ, सीतापती रामश्रेष्ठाला मी वंदन करतो.
४. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥
अर्थ : मनाप्रमाणे वेगाने धावणार्या, वायूप्रमाणे गती असलेल्या, इंद्रियांचे दमन केलेल्या, बुद्धिमंतांमध्ये सर्वांत श्रेष्ठ असलेल्या, वानरसेनेतील मुख्य, वायुपुत्र, श्रीरामदूत मारुतीला मी शरण आलो आहे.
५. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।
प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नम: ॥
अर्थ : वसुदेवपुत्र कृष्णाला , सर्व दु:ख हरण करणार्या परमात्म्याला , शरणागतांचे क्लेश दूर करणार्या गोविंदाला नमस्कार असो.
६. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥
अर्थ : गुरू हे प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णु आणि शिव आहेत. ते साक्षात परब्रह्मच आहेत. अशा श्रीगुरूंना मी नमन करतो.
७. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥
अर्थ : सर्व मंगलमय गोष्टींतील मांगल्यरूप, कल्याणदायिनी, सर्व इष्ट फळ देणार्या, शरणागतांस आश्रय देणार्या, त्रिनयने, गौरी, नारायणी तुला नमस्कार असो.
८. शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे ।
सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोऽस्तु ते ॥
अर्थ : शरण आलेल्या दीन दुबळ्यांना तारण्यास तत्पर असलेल्या, सकल विश्वाचा ताप दूर करणार्या हे देवी नारायणी (दुर्गे) तुला माझा नमस्कार असो.
९. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम्।
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः।।
अर्थ : अखंडमंडलाकार सृष्टीला व्यापून ज्यांनी (आम्हाला) त्यांच्या चरणांशी घेतले त्या श्रीगुरूंना आमचा नमस्कार असो.
१०. नमः सर्वविदे तस्मै व्यासाय कविवेधसे ।
चक्रे पुण्यं सरस्वत्या यो वर्षमिव भारतम् ॥
अर्थ : सर्वज्ञ, कवींमध्ये ब्रह्मदेवाप्रमाणे असलेल्या, आपल्या प्रतिभेने मेघवृष्टीसमान महाभारत नावाचे पुण्यदायी काव्य करणार्या भगवान श्रीवेदव्यासांना नमस्कार असो.
No comments:
Post a Comment