Monday, August 15, 2011

तिरंग्याचे नवे रंग

तिरंग्याचे नवे रंग

तिरंग्याच्या प्रत्येक रंगाचे आपल्या देशाच्या संस्कृतीत आणि स्वातंत्र्यलढ्यात खास स्थान आहे . यातला भगवा रंग त्यागाचे , पांढरा रंग शांततेचे तर हिरवा रंग हे समृद्धीचे प्रतीक मानला जातो . मात्र आजच्या बदलत्या काळानुसार तिरंग्याच्या या रंगांनाही नवीन अर्थ प्राप्त झाला आहे . यातला केशरी रंग तरुणाईचे , हिरवा पर्यावरणरक्षणासाठी देशाच्या प्रयत्नांचे तर पांढरा रंग हे ऊर्जेचे प्रतीक बनला आहे !
प्रत्येक भारतीयाला राष्ट्रध्वज फडकावण्याचा हक्क सुप्रीम कोर्टाने एका ऐतिहासिक निर्णयाने प्रदान केला . त्यामुळे केवळ सरकारी कार्यालयांमधून तिरंगा प्रत्येक गल्ली , बिल्डिंगपर्यंत पोहोचला . या पार्श्वभूमीवर तिरंग्याच्या या रंगांचे नवीन अर्थ अधोरेखित करणे गरजेचे आहे .
सुमारे साठ वर्षांपूर्वी त्यागाचे प्रतीक असलेला भगवा रंग आज तरुणाईचे प्रतीक बनला आहे . आज जगाच्या नकाशावर भारताचे स्थान महत्त्वाचे आहे आणि ते स्थान मिळवून देण्यात भारतीय तरुणांचे मोलाचे योगदान आहे . आज देशाच्या लोकसंख्येतली तरुणांची मोठी टक्केवारी ही केवळ गर्दी म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही . ध्येयाने प्रेरित असलेल्या या तरुणवर्गाने खेळांपासून ते तंत्रज्ञानापर्यंत आणि कलेपासून ते विज्ञानापर्यंत सगळ्यात क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवला आहे . मात्र तरीही अनेक तरुण अदृश्य बेरोजगारीला तोंड देत आहेत . त्याला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसारख्या स्वयंरोजगाराच्या योजनांची गरज आहे . आज भगव्या रंगाकडे तरुणाईची ऊर्जा म्हणून पाहण्याची गरज आहे .
तरुणाईच्या ऊर्जेप्रमाणेच देश चालवण्यासाठी विजेचीही गरज आहे . आज ५० टक्के लोकसंख्या विजेपासून वंचित आहे . पांढरा रंग हे विकासामध्ये असलेले या ऊर्जेच्या योगदानाचे प्रतीक आहे . कारण शुभ्र रंग हा केवळ शांततेचे नव्हे तर प्रकाशाचेही प्रतीक आहे . त्यामुळे देशाचा प्रत्येक कोपरा प्रकाशाने उजळावा , यासाठी ही ऊर्जा महत्त्वपूर्ण आहे .
स्वातंत्र्यलढ्याच्या काळात हिरवाईचे , समृद्धीचे प्रतीक म्हणून गणला गेलेला हिरवा रंग आजही पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत आहे . पर्यावरणाच्या हानीमुळे नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढल्याने पर्यावरणाचे संरक्षणासाठी सरकारने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत . विकासाच्या वाटेवर असताना पर्यावरणाचा समतोल साधणे महत्त्वाचे असून पांढऱ्या रंगाचे महत्त्व जाणणे आवश्यक आहे .
योग्य प्रमाणात असलेले हे तीन रंग म्हणजे संतुलनाचे प्रतीक आहे . तरुणांच्या उर्जेचे , उत्साहाचे स्वरूप आणि व्यवस्थापन यांचे योग्य संतुलन साधल्यास देशाच्या विकासात कशाचाच अडथळा राहणार नाही आणि भारताचा तिरंगा मानाने जगाच्या नकाशावर विराजमान होईल .
राष्ट्रध्वजाच्या तीन रंगांमध्ये अशी काही प्रेरणादायी शक्ती आहे , जी आपल्या क्षमतेच्या पुढे जाऊन कामगिरी करण्यास आपल्याला भाग पाडते . त्यामुळेच अभिनव बिंद्रा किंवा राज्यवर्धन राठोड तिरंग्यासह ऑलिम्पिकच्या स्टेजवर चढतात , तेव्हा उर भरून येतो . रणांगणावर लढणाऱ्या सैनिकांनाही तिथूनच प्रेरणा मिळते !
१९७४ मध्येच आपल्याला आपला आवाज उठवण्याचे स्वातंत्र्य मिळाले . आता वेळ आली आहे ती राष्ट्राचे हे सर्वोत्त प्रतीक अभिमानाने सादर करण्याची . आणि देशसेवेसाठी वचनबद्ध राहण्याची !

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive