महाराष्ट्रात आश्रमशाळांचे २९ विभाग आहेत . त्यातल्या पाच विभागांमध्ये गेल्या १० वर्षांत १९२ विद्यार्थी मरण पावले . यावरून सगळ्या आश्रमशाळांनी मिळून किती मुलांना मृत्यूच्या दाढेत लोटले असेल , याचा अंदाज केलेला बरा . आता मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला प्रतिज्ञापत्र देण्याचा आदेश दिला आहे . राज्यात सरकार ५४७ आश्रमशाळा चालविते . शिवाय , ५५६ आश्रमशाळांना अनुदान मिळते . या दोन्ही रहिवासी शाळांमध्ये मिळून पावणेतीन लाख मुले असावीत . ही आदिवासी , भटक्या - विमुक्त जातींची मुले किती गरीब असतात व त्यांचे पालक कसे जगण्याच्या लढाईत असतात , हे सांगायला नको . अशावेळी , ही मुले शाळेत राहून शिकली तर कुटुंबाचे नशीब बदलू शकते . मात्र , महाराष्ट्रात असंख्य आश्रमशाळा संवेदनशून्य व गुरांच्या छावण्यांपेक्षाही निष्काळजीपणे चालविल्या जातात . तसे नसते तर साप चावून , ताप येऊन , अपघात होऊन किंवा ' आत्महत्या करून ' इतकी मुले मरण पावली नसती . दुर्दैवाने , यातल्या अनेक मृत्यूंची चौकशीही झाली नाही . आता उच्च न्यायालयाने समाज कृती समितीच्या याचिकेची दखल घेऊन सर्व विभागांची आकडेवारी मागविली आहे . ती येऊनही सरकार किती हलेल व या मुलांचे दुर्दैवी मृत्यू किती कमी होतील , हे सांगता येत नाही . आता प्रश्न आहे तो , उच्च न्यायालयाने जी संवेदनशीलता दाखवून सखोल पाहणीचे आदेश दिले , त्यापासून समाज काही शिकणार की नाही हा . सरकार व नोकरशाही शिकेल तेव्हा शिकेल . मात्र , समाजसन्मुख नागरिकांना , प्रामाणिक स्वयंसेवी संस्थांना आणि नामांकित शिक्षणसंस्थांना यात करण्यासारखे खूप काही आहे . बऱ्याचदा , या आश्रमशाळा जणू तुरुंगांसारख्या असतात . तिथे बाहेरचे कुणी येत नाही . तेथे काय चालते , कुणाला कळत नाही . नागरिकांनी छोटे गट करून आपल्या जिल्ह्यांतल्या आश्रमशाळांचे पालकत्व का स्वीकारू नये ? तेथे महिन्यातले काही दिवस का जाऊ नये ? त्यांना काय हवे , ते का पाहू नये ? आज राज्यात मोठा मध्यमवर्ग आहे . तो वेगाने प्रवास करू शकतो . या अर्थाने दुर्गम अशा मोजक्या आश्रमशाळा उरल्या असतील . या सर्व शाळा नागरिकांनी दत्तक घ्यायला हव्यात . पैसे देण्याचीही गरज नाही . तो येतोच . तो योग्य खर्च होतो का , हे पाहायला हवे . मात्र , सरकार व न्यायालयांच्या तोंडाकडे पाहात समाज शांत बसला तर ही हलाखी कधीच संपणार नाही .
Thursday, May 16, 2013
Subscribe to:
Post Comments (Atom)
Popular Posts
-
Click here to see Original Photo Chhatrapati Shivaji Maharaj - Great Maratha King
-
Click here to see Original Photo Chhatrapati Shivaji Maharaj - Great Maratha King Shiwaji weapons
-
1 Land, Politics And Trade In South Asia: 2 Leadership In 21st Century: 3 Truth Is Multi Dimensional-CD Sri Sri Ravishankar Art 4 What ...
-
Click here for More articles Rashichakrakar Sharad Upadhye - Bhakti Sagar आखाडा का बखेडा? : शरद उपाध्ये - Rashichakra Sharad Upadhy...
-
Kokanatala Malvani Garana Garhana marathi garhane कोकणात देवाला गार्हाणं घालण्याची रीत अजूनही प्रचलीत आहे.चांगल्या प्रसंगी देवाची आठव...
-
आषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराक...
-
स्त्रीला गरोदर कसे करावे ? पाहण्यासाठी येथे या मातृत्व प्रत्येक विवाहीत स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तस...
-
Marathi Bold Actress Amruta Khanvilkar When Amruta Khanvilkar was the losing fina...
-
CLICK HERE TO VIEW THIS INFORMATION
-
सुरस कथा मार्केटिंगच्या Dhirubhai Ambani Marketing Story in Marathi कथा धिरुभाई अंबानी यांचे वडील गुजरातमधे ग्रामीण भागात प्राथमीक शीक...
Total Pageviews
Categories
- Mehandi Designs (1)
- rail chakra (18)
- rel chakra (17)
- relchakra (18)
Blog Archive
-
▼
2013
(871)
-
▼
May
(45)
- Fashion Design Drawing Lesson - Anarkali Suit Priy...
- PENGUIN NEW TITLE
- Austrian slackliner Reinhard Kleindl
- Laburnum and Peltophorum, the flaming red flowers ...
- 40% of Mumbai suicides due to family issues, illne...
- Pawar sees solution ahead of Friday meet with CM
- How scarring can names be? Ask Aurangzeb
- Hachette Books New Titles
- New Titles
- PENGUIN NEW TITLE
- Overnite express courier contact no, overnite expr...
- Shroff New Books Release
- RANDOM FRONT LIST
- गुरुचरित्र पारायण सुरु करण्यापूर्वी
- नेहा रामू आइनस्टाइनपेक्षा बुद्धिमान!
- आश्रमशाळा की मरणशाळा?
- Elsevier New Arrivals Books 2013
- Cylenders subsidy in nationalised banks
- गोष्ट भरपेट उपवासाची (मुक्तपीठ) Upvas
- Postal Assistant/Sorting Assistant Recruitment Sol...
- ममता कुलकर्णीने ड्रग माफियाशी लग्न - Mamta Kulkarn...
- निळू फुले आणि उपेंद्र लिमये फोर्ब्सच्या यादीत - Nu...
- चीनपुढे गुडघे टेकले, चुमार पोस्ट सोडली, India left...
- The heart of darkness in Mumbai: Adivasis live wit...
- new titles
- A young boy and his pet dog - story
- New Releases
- Australian rapper Iggy Azalea who makes no bones a...
- JAYPEE New Releases-3
- JAYPEE New Releases-1
- JAYPEE New Releases-1
- JAYPEE New Releases-1
- JAYPEE New Releases
- KARMA by Cathy Ostlere
- THE BLIND MAN’S GARDEN by Nadeem Aslam
- LWW IMPORT FRONT LIST January to June 2013
- NEW ARRIVALS
- McGraw Hill New Releases - May
- HARPER NEW TITLE
- New Published by MGH
- JUST RECEIVED STOCK DTD.06.05.2013
- New Releases
- R r sheth book
- गर्भावस्थेतले लैंगिक संबंध सुरक्षित की धोकादायक ..?
- PENGUIN NEW TITLE
-
▼
May
(45)
No comments:
Post a Comment