Thursday, May 16, 2013

नेहा रामू आइनस्टाइनपेक्षा बुद्धिमान!

नेहा रामू

लंडन- भारतीय वंशाच्या बारा वर्षीय मुलीने आपल्या बौद्धिक क्षमत्तेची झलक दाखवून संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे.
ब्रिटनमध्ये राहणाऱ्या नेहा रामू हिचा बुद्ध्यांक तथा आयक्यू (इंटेलिजन्स कोशंट) १६२ एवढा असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बुद्ध्यांक जगातील सर्वांत बुद्धिमान शास्त्रज्ञ समजल्या जाणाऱ्या आइनस्टाइन आणि स्टीफन हॉकिंग यांच्यापेक्षाही जास्त आहे.

भारतीय डॉक्टर दाम्पत्याची मुलगी नेहा रामू सात वर्षांची असल्यापासून आई-वडिलांसोबत ब्रिटनमध्ये राहते. नेहाने येथील २८० गुणांच्या शालेय प्रवेश परीक्षेत सर्वच्या सर्व गुण मिळविले. तिच्या पालकांना तिची बौद्धिक क्षमता असाधारण असल्याचे जाणवले.

'मेन्सा आयक्यू टेस्ट'मध्ये तिचा आयक्यू १६२ असल्याचे सिद्ध झाले असून तिच्या वयोगटातील हा आकडा सर्वोच्च आहे. मेन्सा ही असामान्य बुद्ध्यांक असणाऱ्या लोकांची संघटना आहे. या चाचणीनंतर ब्रिटनमधील सर्वांत बुद्धिमान एक टक्का लोकांच्या वर्गात नेहाचा समावेश झाल्याचे संघटनेने म्हटले आहे.

डॉक्टर पालकांप्रमाणेच नेहालाही वैद्यकीय क्षेत्रात पुढे जायचे आहे. हार्वर्ड विद्यापीठात जाऊन शिकायची नेहाची इच्छा आहे. हॅरी पॉटर व पोहणे या नेहाच्या आवडत्या गोष्टी आहेत.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive