१ जूनपासून सिलेंडर्सची सबसिडी थेट बँकेत!
पहिला टप्पा प्रायोगिक तत्वावर, २० जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी
घरगुती गॅस सिलेंडर्सवर सरकारतर्फे
देण्यात येणारी सबसिडी आता १ जूनपासून थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा
होणार आहे. या योजनेनुसार, वर्षाकाठी नऊ सिलेंडर्सवर ग्राहकांना मिळणारी
सुमारे चार हजार रुपये इतकी सबसिडी त्यांच्या खात्यात जमा होईल. ही योजना
पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वांवर देशातील २० जिल्ह्यांमध्ये राबविण्यात
येणार आहे.
या योजनेतून मिळणारी सबसिडी आपल्या
खात्यात जमा होण्याकरिता ग्राहकांना बँकेला आपला आधार क्रमांक द्यावा
लागणार आहे. देशात एकूण १४ कोटी एलपीजी ग्राहक आहेत. तर युनिक
आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडियाने ३२ कोटी नागरिकांना आधार कार्डचे वाटप
केले आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत ८० लाख नागरिकांची बँक खाती आधार
कार्डशी जोडली गेली आहेत. ग्राहकांनी आपल्या बँकांना त्यांचा आधार क्रमांक
दिल्यानंतर सबसिडीची रक्कम काही दिवसानंतर त्यांच्या खात्यात जमा होईल.
या राज्यात प्रथम!
सबसिडी थेट बँकेत जमा होण्याचा मान ज्या
राज्यांना प्रथम मिळेल, त्यात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, दमन-दीव, गोवा,
हिमाचलप्रदेश, कर्नाटक, केरळ, पॉंडेचेरी, सिक्कीम आणि त्रिपुरा यांचा
समावेश आहे.
जबाबदारी कुणावर?
ही सबसिडी ग्राहकांच्या बँक खात्यात
टाकण्याची जबाबदारी नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ
इंडिया यांच्यावर टाकण्यात आली आहे.
सरकारचा फायदा
या थेट बँकेत पैसे जमा करण्यामुळे सरकारचे दरवर्षी १५ हजार कोटी रुपये वाचण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment