Tuesday, August 2, 2011

Funny Marathi news

* गोमूत्र नव्हे तर पाणी ओतून हुतात्मा स्मारकाची स्वच्छता केली - छगन भुजबळ -बातमी
- लखोबा सांभाळून हां, आपल्याला गोमूत्र व पाण्यामधला फरक कळलेला दिसत नाही, उद्या चुकून पाण्याऐवजी गोमूत्र प्याल!

* मुंबई शहरात मुस्लिमांची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून त्यांच्यातील जन्माचे प्रमाण हिंदूंमधील जन्मदरापेक्षा चक्क दुप्पट असल्याचे आढळून आले आहे -बातमी

- कॉंग्रेस वेड्याच्या ढुंगणावर उगवले 'हिरवे' बाभूळ म्हणे मतदानाला बरे! पण मुळे कुठे गेली हे तो वेडा विसरतो!

* संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा आणखी एक घोटाळा उघडकीस आला असून कोळसा घोटाळ्याची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्याची मागणी भाजपाने केली आहे -बातमी
- या घोटाळ्यांचे कोळसे कितीही उगाळा, हात काळे होतील पण घोटाळ्याचे कोळसे कमी पडणार नाहीत!

* कुणी कुठल्या पक्षाशी घरोबा करावा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. भीमशक्ती ही केवळ दलित समाजापुरती मर्यादित नसून ती समता, बंधुता व मानवता जपणार्‍या प्रत्येकाची असल्याने कुणीही कुठल्याही पक्षाशी युती करताना भीमशक्ती हे नामकरण करू नये - जोगेंद्र कवाडे -बातमी
- हा खुलासा आपण केलात ते बरे झाले म्हणजे जोगेंद्रबुवा आपल्यासारख्याला कुणाच्याही घरात केव्हाही घुसता येईल!

* कॉंग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश हीच का एकनाथ नाडकर्णी यांची निष्ठा? राष्ट्रवादीत प्रवेश केलेले रमेश गावकर यांचा शिवसेना सावंतवाडी जिल्हाप्रमुखांना सवाल -बातमी
- अरे गावकर खेकड्या प्रथम तुझ्या वाकड्या चालीचा विचार कर; मग तुझी वाकडी तंगडी दुसर्‍यावर झाड!

* मुंबईवर दहशतवादी हल्ला चढवून २६६ निष्पाप नागरिक आणि पोलिसांचा बळी घेणारा एकमेव पाकिस्तानी जिवंत अतिरेकी अजमल कसाब याच्या सुरक्षेवर सरकारने तब्बल १० कोटी रुपयांचा खुर्दा उडविला आहे -बातमी
- हिंदुस्थानच्या फाळणीनंतर महात्मा गांधी म्हणाले होते 'राम के साथ रहीम रहेगा, मग रहिमची काळजी घ्यायला नको?'

* राज्यातील ठाणे, नागपुर, पुणे आणि रत्नागिरी येथील मनोरुग्णालयांची सार्वजनिक आणि खासगी सहभागांतून सुधारणा करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्वत: मान्यता दिली -बातमी
- अजितपादा, आपली उद्याची सोय आपण आजच करून ठेवली हे फार बरे झाले!

* दहशतवादाचा धोका आणि बदलत्या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर राज्यांची सुरक्षाव्यवस्था बळकट करण्यासाठी अमेरिकेच्या होम लॅण्ड सिक्युरिटीने सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले -बातमी
- उद्या कोणी स्वत:च्या बायकोला पोरे होत नाहीत म्हणून अमेरिकेची मदत न घेवो म्हणजे झाले!
* नामविस्ताराला कधी पाठिंबा दिला ते जाहीर करा - विजय कांबळे यांचे शिवसेनाप्रमुखांना आव्हान -बातमी
- जाऊ द्या हो कांबळे, डोळ्यावर 'कांबळं' ओढून घेतलेल्याला काय दिसणार?

* कुणाच्याही कमरेखाली वार करण्याचा शिवसेना नेत्यांचा छंद जुनाच आहे - सुरेंद्र हसमनीस प्रहारमध्ये
- अहो हसमनीस, शिवसेना प्रथम कुणाच्या खाली काही आहे की नाही ते पाहते मगच 'प्रहार' करते, समझ गये ना घोचू!
* आम्ही तत्त्वाबाबत कधीच तडजोड करीत नाही, तर राजकारणात तडजोड करतो. रामदास आठवले यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात येत असल्यामुळे त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून सेना-भाजपसोबत युती केली आहे - आनंदराज आंबेडकर -बातमी
- अहो आनंदराव या वाक्याचा आपल्याला तरी अर्थ कळला का? का बाबासाहेबांचे नातू म्हणून इतरांनी ऐकून घ्यायचे?

* दहशतवादास खतपाणी कोण घालते आहे त्याचा योग्य बंदोबस्त करण्यासाठी पावले टाकली जात आहेत - आर. आर. पाटील -बातमी
- मग आतापर्यंत आबा, आपली पावले भुतासारखी उलटी पडत होती काय?

* दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपी देवेंद्र भुल्लरचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला - फाशीवर शिक्कामोर्तब -बातमी
- मग अफझल गुरुला कशासाठी पोसता? त्याने केलेला तो तर देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला होता!

* पाकिस्तानला लादेन लपल्याचे माहीत नव्हते! अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री हिलरी क्लिंटन -बातमी
- पाकिस्तान व अमेरिका यांच्यामध्ये एकूण संबंध तेरी भी चूप, मेरी भी चूप असा असल्याने पाकिस्तानात लादेन लपल्याचे पाकिस्तानला कसे ठाऊक असणार?

* मोनालिसाचा सांगाडा सापडल्याचा इटालीच्या पुरातत्त्व खात्याचा दावा -बातमी
- हे ऐकून 'स्माईलवाली' मोनालिसा खदखदून हसली असणार!

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive