Sunday, July 22, 2012

'आयटी'त सव्वादोन लाख नोक-या

' आयटी क्षेत्रात सध्या सुमारे सव्वादोन लाख नोक-या उपलब्ध आहेत. यातील सुमारे दीड लाख नोक-या या फ्रेशर्ससाठीच आहेत. फक्त हे जॉब पारंपरिक आयटी जॉब्ससारखे नसून त्यासाठी आवश्यक ती कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे,' असे मत झेन्सार टेक्नोलॉजीजचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गणेश नटराजन यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

ग्लोबल टॅलेंट ट्रॅकर्स (जीटीटी) कंपनीतफेर् 'व्हेअर आर द आयटी जॉब्स' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. नटराजन, 'इंटेल'मधील वरिष्ठ अधिकारी सचिन केळकर तसेच 'जीटीटी'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उमा गणेश सहभागी झाले होते.

' आता प्रोग्रॅमिंगसोबतच अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, अॅप्लिकेशन सपोर्ट, इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट, बिझनेस इंटेलिजन्स, क्लाउड कम्प्युटिंग आदी क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. यासाठी तंत्रज्ञानासोबतच सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगचे ज्ञान आणि टीम वर्क या गोष्टी आवश्यक आहेत,' असे नटराजन म्हणाले.

' आयटी क्षेत्रात होणाऱ्या बदलांशी जुळवून घेणे आवश्यक आहे. येत्या काळात मीडिया टॅब्लेट्स, मोबाइल सेंट्रिक अॅप्लिकेशन, सोशल मीडिया, क्लाउड कम्प्युटिंग, एक्सटर्नल र्सव्हर्स या क्षेत्रात भरपूर संधी आहेत,' असे केळकर म्हणाले.

' मोठ्या शहरांसोबतच लहान शहरांमध्येही आयटी किंवा संबंधित क्षेत्रातील नोकऱ्या उपलब्ध आहेत. यासाठी स्वत:हून कौशल्यांचा विकास साधणे, नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे,' असे डॉ. उमा गणेश यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive