आज आम्ही तुम्हाला सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याबद्दलच्या २५ गोष्टी सांगणार आहोत. काकाच्या या गोष्टी कदाचितच तुम्हाला ठाऊक असतील.
१. जीतेंद्र आणि राजेश खन्ना एकत्र शाळेत शिकले आहेत.
२. १९६५ साली युनायटेड प्रोड्युसर्स आणि फिल्मफेअरने एका टॅलेंट हंटचे आयोजन केले होते. या टॅलेंट हंटमधून हिरोची निवड करण्यात येणार होती. दहा हजार मुलांमधुन आठ मुलांची निवड करण्यात आली होती. या आठ मुलांमध्ये राजेश खन्ना यांचा समावेश होता. अखेरीस राजेश खन्ना या
टॅलेंट हंटचे विजेते ठरले.
३. राजेश खन्ना यांचे खरे नाव जतिन खन्ना होते. आपल्या काकांच्या म्हणण्यावर त्यांनी आपले नाव बदलून राजेश खन्ना केले. १९६९ ते १९७५ या कालावधीत राजेश यांनी अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. यादरम्यान अनेक आईवडिलांनी आपल्या मुलाचे नाव राजेश ठेवले होते.
४. तरुणींमध्ये राजेश खन्ना यांची वेगळीच क्रेझ होती. काहींना त्यांना आपल्या रक्ताने पत्र लिहिले, तर काहींना त्यांच्या फोटोबरोबरच लग्न केले. काही तरुणींनी आपल्या हातावर राजेश यांचे नाव गोंदवून घेतले.
५. स्टुडिओ किंवा एखाद्या निर्मात्याच्या ऑफीसच्या बाहेर जेव्हा राजेश खन्ना यांची पांढरी कार उभी दिसली की तरुणी चक्क त्या गाडीचे चुंबन घेत होत्या. लिपस्टीकने त्यांची पांढरी गाडी गुलाबी होऊन जात होती.
६. निर्माते-दिग्दर्शकांची रांग राजेश खन्ना यांच्या घराबाहेर उभी राहात होती. राजेश खन्ना मागेल तेवढे मानधन द्यायची तयारी या निर्माता-दिग्दर्शकांची राहात होती.
७. राजेश खन्ना यांना रोमॅण्टीक हिरोच्या रुपात पसंत केले जात होते. त्यांच्या डोळ्यांची पापणी हलवणे आणि मान झुकवण्याच्या लकबीचे लोक दिवाने होते.
८. राजेश खन्ना यांचे गुरु कुर्ते त्यावेळी खूपच फेमस झाले होते. अनेकांनी त्याला आपली स्टाईल बनवली होती.
९. राजेश खन्ना यांच्या यशामागे संगीतकार आर. डी. बर्मन आणि गायक किशोर कुमार यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. या त्रयींची गाणी सुपरहिट ठरली आहेत. किशोर कुमार यांनी ९१ चित्रपटांमध्ये राजेश खन्नांसाठी पार्श्वगायन केले आहे. तर आरडी यांनी राजेश खन्ना यांच्या ४० चित्रपटांना संगीत दिले आहे.
१०. आपल्या चित्रपटातील संगीताविषयी राजेश खन्ना नेहमीच जागरुक राहात होते. सिनेमातील गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळी राजेश खन्ना स्वतः हजर राहायचे आणि वेळोवेळी गाण्यात बदलही ते सुचवत असत.
११. मुमताज आणि शर्मिला टागोर यांच्याबरोबर राजेश खन्ना यांची जोडी खूप पसंत केली जात होती. मुमताजबरोबर राजेश खन्ना यांनी ८ सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
१२. मुमताजने लग्न करुन चित्रपटाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. मुमताज यांचा हा निर्णय राजेश खन्ना यांच्या आयुष्यातली मोठी ट्रॅजेडी ठरला.
१३. रोमॅण्टिक हिरो राजेश खन्ना प्रत्यक्ष जीवनातही रोमॅण्टिक होते. अंजू महेन्द्रूबरोबर त्यांचे अनेक वर्षे अफेअर होते. मात्र नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर आजपर्यंत हे दोघे कधीही एकमेकांशी बोलले नाही. ब्रेकअपनंतर अंजूने क्रिकेटर गॅरी सोबर्सबरोबर साखरपुडा करुन सगळ्यांनाचा आश्चर्याचा धक्का दिला.
१४. डिंपलबरोबर लग्न करताना राजेश तिशीपार होते तर डिंपल केवळ पंधरा वर्षांची होती.
१५. राजेश खन्ना यांनी डिंपलबरोबर अचानक लग्न करुन करोडो तरुणींना उदास केले.
No comments:
Post a Comment