तुमचं वार्षिक उत्पन्न पाच
लाखापेक्षा कमी असेल, तर तुम्हाला यंदापासून इन्कम टॅक्स रिटर्न्स (आयकर
विवरणपत्र) भरायची आवश्यकता नाही. कारण, पाच लाख रुपयांपर्यंत वार्षिक
उत्पन्न असलेल्या पगारदारांची या किचकट कामातून सुटका करायचं अर्थ
मंत्रालयानंच ठरवलंय. त्यांच्या या निर्णयामुळे देशातील ८५ लाख नोकरदारांना
दिलासा मिळणार आहे.
ज्या नोकरदारांचं वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांच्या आत आहे, २०१२-१३ या वर्षांत बँकेतील बचत खात्यावर मिळणारं व्याज १० हजार रुपयांपेक्षा कमी आहे आणि पगाराशिवाय उत्पन्नाचा अन्य स्रोत नाही, त्यांनी या वर्षीपासून इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची गरज नाही, असं पत्रक अर्थ मंत्रालयानं जारी केलंय. अर्थात, तुम्हाला कर परतावा (रिफंड) हवा असेल तर हा सारा खटाटोप करावा लागेल. रिटर्न्स भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे.
कंपनीकडून मिळणारा पगार आणि बँकेतल्या डिपॉझिटवर मिळणारं व्याज मिळून वार्षिक उत्पन्न पाच लाखापेक्षा कमी होणारे ८५ लाख नोकरदार आज आपल्या देशात आहेत. ज्या कर्मचा-याला कंपनीकडून मिळालेल्या फॉर्म १६ सोबत बँकेतील बचत खात्यावर मिळालेल्या व्याजाचं प्रमाणपत्रही मिळालं असेल, त्यालाच रिटर्न्स फाइल न करण्याची सूट मिळू शकते, असं सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनं स्पष्ट केलंय.

No comments:
Post a Comment