Sunday, September 9, 2012

केव्हा, कोणती गुंतवणूक? Which investment? when?

विविध प्रकारच्या गरजांसाठी व विविध परिस्थितींमध्ये विविध प्रकारचे गुंतवणूक पर्याय आवश्यक ठरतात. त्याचाच धावता आढावा. 

* पुढच्या वर्षी कॉलेजात मुलासाठी अॅडमिशन घ्यायची आहे. 
पर्यायः रिकरिंग डिपॉझिट 
कारणः यातून ९ ते ९.५ असा आकर्षक व्याजदर व निश्चित रिटर्न्स मिळतात. 

आतापासून ३ वर्षांनी मुलीच्या लग्नासाठी सोने घ्यायचे आहे. 
पर्यायः गोल्ड ईटीएफ 
कारणः लग्न जवळ आले की गरजेनुसार याचे रूपांतर भौतिक सोन्यामध्ये करता येईल. 

* तुम्ही ४० लाख रुपयांना मालमत्ता विकली आहे आणि २-३ महिन्यांत आणखी एक घर घेण्याच्या विचारात आहेत 
पर्यायः लिक्विड फंड 
कारणः बँकेतील सेव्हिंग बँक अकाउंटपेक्षा चांगले रिटर्न्स मिळतील. 

* तुम्हाला स्वतःचा विमा उतरवायचा आहे पण गुंतवणूक करण्यासाठी फारसे पैसे नाहीत 
पर्यायः टर्म इन्शुरन्स 
कारणः कमी खर्चामध्ये मोठे कव्हर मिळेल. 

* निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम नियमित उत्पन्न मिळेल अशा ठिकाणी गुंतवायची आहे. 
पर्यायः सीनिअर सिटिझन्स सेव्हिंग स्कीम (एससीएसएस) एमआयपीएस 
कारणः एससीएसएस तिमाही पैशांसह ९.५ टक्के रिटर्न्स देते. एमआयपीएसमध्ये जोखीम कमी असते. 

* तुम्हाला इक्विटीमध्ये गुंतवणूक करायची आहे पण कलम ८० सी अतंर्गत करही वाचवायचा आहे 
पर्यायः ईलएसएस फंड 
कारणः इक्विटीतील गुंतवणूक व करबचत यांचा मेळ घालता येतो. 

* ज्येष्ठ नागरिक असलेल्या तुमच्या पालकांच्या नावे गुंतवणूक करायची आहे. 
पर्यायः फिक्स्ड डिपॉझिट 
कारणः व्याजदर सध्या चांगले आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांना पाव ते अर्धा टक्का अधिक व्याज मिळते 

* तुम्हाला २० वर्षांनंतरच्या तुमच्या निवृत्तीसाठी गुंतवणूक करायची आहे 
पर्यायः एनपीएस डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड 
कारणः दीर्घकाळात फंड चांगले रिटर्न्स देतात. एनपीएस हा कमी खर्चिक पर्याय आहे 

* तुमच्या बँक अकाउंटमध्ये अनेकदा मोठी रक्कम असते 
पर्यायः स्वीप-इन अकाउंट 
कारणः यामुळे सेव्हिंग अकाउंटपेक्षा जास्त रिटर्न्स मिळतील 

* तुम्हाला करमुक्त रिटर्न्स देत असलेल्या सुरक्षित करबचत पर्यायात गुंतवणूक करायची आहे 
पर्यायः पीपीएफ 
कारणः यामध्ये तुम्हाला हवे असलेले सगळे फायदे मिळतील आणि आता मार्केट-लिंक्ड रिटर्न्सही मिळतात 

* तुम्हाला इक्विटी-लिंक्ड करबचत पर्यायात गुंतवणूक करायची आहे पण थोडी लवचिकताही हवी आहे. 
पर्यायः युलिप 
कारणः ग्राहकांना अॅलोकेशन बदलता येते. आता युलिपचे शुल्कही कमी झाले आहे. 

* कंपनीने तुम्हाला हेल्थ कव्हर दिले आहे पण ते अपुरे आहे 
पर्यायः टॉप-अप कव्हर 
कारणः टॉप-अप प्लॅनमध्ये अन्य योजनांपेक्षा कमी खर्च येतो 

* अन्य काही सामायिक गरजा 
क्रेडिट कार्डाचे कर्ज कसे कमी करावेः थकित रक्कम कमी व्याजदराच्या पर्सनल लोनकडे वळवावी. 
महागड्या लाइफ इन्शुरन्स योजनेतून सुटका करायची आहेः प्रीमिअपम टाळण्यासाठी योजना पेड-अप पॉलिसीमध्ये बदलून घ्यावी. 
मोठ्या होत असलेल्या मुलासाठी कार्ड निवडायचे आहेः त्याच्या बँक अकाउंटशी जोडलेले डेबिट कार्ड निवडावे. 
आणीबाणीसाठी निधी उभारायचा आहेः २-३ महिन्यांचा खर्च लिक्विट म्युच्युअल फंडात ठेवावा. 

(ईटी)

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive