चंपाषष्ठी
आज चंपाषष्ठी, आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मणी व मल्ल दैत्यांचा वध केला. मार्गशीर्ष महिन्यात येणारे हे नवरात्र देवीच्या नवरात्रासारखेच असते. श्रीमहादेवाच्या मल्हारी मार्तंड हा एक अवतार होय.
पुण्याजवळ असलेले जेजुरी ह्या गावी मल्हारी देवस्थान आहे. कृतयुगात मणी व मल्ल या राक्षसांना ब्रह्म देवाने, ``तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही'' हा वर दिला त्यामुळे ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले व ऋषीमुनी करीत असलेल्या तपश्चर्येला अडथळा आणून तेथे विध्वंस करू लागले. ऋषीमुनींनी अखेर कंटाळून देवांकडे मदत मागितली.
भगवान शंकर त्यांचे म्हणणे ऐकून संतप्त झाले. त्यांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपल्या ७ कोटी (येळकोट) सैन्य घेऊन व कार्तिकेयासह ते मणि मल्ल राक्षसांवर चालून गेले. दोन्ही पक्षात प्रचंड युध्द होऊन अखेर मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाला त्याची छाती फोडून त्याला जमिनदोस्त केले. मणी राक्षसाने शरण येऊन ``माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे'' अशी इच्छा व्यक्त केली. भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले.
नंतर मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसाचा पराभव केला तेव्हा त्याचे शरण जाऊन ``तुमच्या नांवाआधी माझे नांव जोडले जावे अशी मागणी केली.'' तथास्तु म्हणून मार्तंड भैरवाने मान्य केले. तेंव्हापासून त्यांना मल्हारी (मल्ल+अरी) मार्तंड असे म्हणण्यात येते. हा विशेषत: धनगराचा देव मानला जातो. अतिशय जागृत देव आहे. मुख्य भंडारा म्हणून हळद उधळली जाते; ज्वारीचा रोडगा व भरीत हा त्यांचा प्रसाद असतो.
--
मार्तंड भैरव षडःरात्रोत्सव, जेजुरी आणि श्रीखंडोबाविषयी माहितीसाठी लॉग इन करा
ReplyDeletewww.jejuri.in/yatra#champashashthi
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा...