Sunday, December 19, 2010

How to undo email? चुकून पाठवलेला ईमेल लगेच undo करा


चुकून पाठवलेला ईमेल लगेच undo करा


कधी कधी अर्धवट लिहिलेला मेल चुकून आपल्याकडून पाठवला जातो! 'अरेच्चाऽऽऽ' म्हणेपर्यंत तो हातून निसटलेला असतो. आणि तो पलिकडच्या माणसाच्या इंबॉक्समध्ये जाऊन पडत असताना, हात चोळत बसण्याहून अधिक आपल्या हातात काहीही राहीलेलं नसतं.

गेल्या महिन्यात मी दररोज एक ब्लॉग लिहीत होतो. तेंव्हा काय झालं!? एके दिवशी ब्लॉग लिहीता लिहीता तो अर्धवट लिहून झालेला असताना, अचानकच पब्लिश झाला! मी पब्लिशचं बटण दाबलं नव्हतं, पण की-पॅड ची बटणं दाबत असताना 'काहीतरी' झालं आणि तो पब्लिश झाला! त्यादिवशी अधिच एक आर्टिकल पब्लिश झालं होतं, मी उद्याचं आर्टिकल लिहीत होतो, तेही त्याच दिवशी पब्लिश झालं, म्हणजे माझं काम वाढलं! असं दोनदा झाल्याने माझे ३१ दिवसात ३३ लेख लिहून झाले! यावरुन मला सांगायचंय काय!? तर कधीकधी चुकून ब्लॉग पब्लिश होऊ शकतो, तसंच मेलही चुकून सेंड होऊ शकतो.

याशिवाय मेल सेंड केल्यानंतर लगेच कधीकधी मनाला हुरुहुर देखील वाटू शकते! जसं, 'असं लिहायला नको होतं मी, थोडेसे वेगळे शब्द वापरायला हवे होते!' किंवा मेल पाठवल्या पाठवल्या दुसर्‍याच क्षणी आपलं मन म्हणतं 'अरेऽ हे लिहायचं तर राहूनच गेलंऽ!' मनाचा काय भरवसा!? त्याला आणखी एक चान्स तर द्यायलाच हवा ना!

'जीमेल' वापरुन आपल्याला आपल्या मनाला असा चान्स देता येईल! कसं काय?
१. सर्वप्रथम जीमेल वर जा.
२. उजव्या कोपर्‍यात वर settings वर क्लिक करा.
३. settings च्या मेनूमध्ये labs वर क्लिक करा.
४. labs मध्ये undo send नावाचा पर्याय आहे. त्या पर्यायाला Enable करा.

गुगल लॅब मधील 'अनडू सेंड'

५. आता यापुढे एखादा मेल पाठवत असताना तुम्ही send या बटणावर क्लिक केल्यानंतर, तो मेल पाठवण्याबाबत पुर्नविचार करण्यास तुम्हाला काही सेकंद मिळतील. म्हणजेच मेल send केल्यानंतर लगेच खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पर्याय दिसून येतील.

जाणारा संदेश थांबवा

वर  दाखवल्याप्रमाणे मेल send केल्यानंतर, त्या मेलबाबत Undo आणि View message असे दोन पर्याय तुम्हाला दिसून येतील. त्यापॆकी Undo या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचा मेसेज जाणार नाही. Undo हा पर्याय काही सेकंदांसाठीच त्या तिथे राहतो, म्हणजे त्याच्या आत तुम्हाला त्यावर क्लिक करावं लागतं, जेणेकरुन तुमचा मेसेज पुढे जाण्यापासून रोखला जाईल.

अशाप्रकारे जीमेल आपल्यासाठी भरपूर सुविधा उपलब्ध करुन देत आहेच, तर त्यांचा आपण आपल्यासाठी उपयोग करुन घेतला पाहिजे ...असं व्हायला नको की, देणारा देत आहे आणि घेणार्‍याचे हातच कमी पडतायत!





No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive