महिलांनी कुंकु का लावायचे?
--अरविंद जोशी
भारतात कुमारीका आणि सौभाग्यवतींनी कपाळाला कुंकु लावावे अशी पुर्वापार रुढी होती. कपाळाखाली भ्रुमध्याला कुंकु लावायाचे असते. त्या ठिकाणी ऎक्युप्रेशर मधील पिच्युटरी ग्लॅंड (म्हणजे शिरस्त्र ग्रंथी) चा भाग आहे. त्या ठिकाणी शुध्द कुंकु लावले असता कुंकवातील औषधी घटक त्वचेवाटे पिच्युटरी ग्लॅंड मधे मिळतात. त्यामुळे पिच्युटरी व्यवस्थीत काम करु लागते. त्यामुळे महिलांना हार्मोन्सची व्यवस्थीत निर्मीती होते. बायकांना पाळिचे त्रास होत नाही. हे आमच्य पुर्वजांनी अनुभव घेऊन कुमारीका व सौभाग्यवतींनी कुंकु लावावे अशी प्रथा पाडुन समाजातील सर्व स्थरातील बायकांचे आरोग्य राखण्याचा प्रयुत्न केला. हल्ली बायकांना ब्लिडिंग होण्याचा, अशक्तपणा येण्याचा, कंबर व पोट दुखण्याचा खुप त्रास आहे. शुध्द कुंकु ओले करुन लावले असता फ़ायदा होतो हे अमेरीकेतही सिध्द झालंय. आणि तेथील बायका कुंकु लावु लागल्या कि आमच्या कडिल बायका इंपोर्टेड कुंकु घेऊन लावतील. ५ रुपयांची वस्तु २५० रुपयांना घेऊन मिरवतील. कुंकु काही इतर औषधांबरोबर पोटात देऊन मी काही बायकांचे ब्लिडिंग थांबबले आहे. ज्यांना दिवसा कुंकु लावण्याची लाज वाटते त्यांनी रात्री झोपताना पाण्यात कालवुन लावावे.
No comments:
Post a Comment