Wednesday, December 22, 2010

आणि तेंव्हा - आपल्याला मोठं व्हायचं होतं.............

कधी कधी आपल्याला 'जुन्या आठवणी' एक वेगळाच आनंद देऊन जातात.. नाही म्हटलं तर थोडा का होईना - एक फ्रेश मुड.... आपल्याला आठवत असेलच; 
१. तो दुरदर्शनचा गोल-गोल फिरत येणारा लोगो
२. दुरदर्शनचा तो पट्ट्या-पट्ट्याच स्र्कीनसेव्हर
३. मालगुडी डेज
४. देख भाई देख
५. रामायण
६. मिले सुर मेरा तुम्हारा
७. टर्निंग प्वाइंट
८. भारत एक खोज
९. आलिफ लैला
१०. ब्योमकेश बक्षी
११. तहकीकात
१२. ही मॅन
१३. सलमा सुलताना - ती दुरदर्शनवरची न्युज रीडर
१४. विको टरमरिक, नहीं कौस्मेटीक.... विको टरमरिक आयुर्वेदिक क्रीम
१५. ट्वँ.........ग!

१६. मोगली
१७. श्रीकृष्ण
१८. महाभारत
१९. युग
२०. वाशिंग पाउडर निरमा.. वाशिंग पाउडर निरमा.
दुध सी सफेदी, निरमा से आयी...
रंगीन कपडेभी खिल-खिल जायें!
२१. निरमा जाहिरातीतील सोनाली बेंद्रे
१६. आय ऐम कौम्प्लॅन बौय [शाहिद कपुर] आणि आय ऐम कौम्प्लॅन गर्ल [आयेशा टाकिया]
१७. "सुरभि" वाले रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ
१८. आणि त्यानंतरचे - "मुंगेरीलाल जे हसिन सपने", करमचंद, विक्रम वेता़ळ आणि असे बरे........च!

त्या काळात आपले आयुष्य किती सरळ सोपे होते हो ना!!!
... जेंव्हा "निष्पापपणा" हा स्वाभाविक असायचा...
... जेंव्हा "पिणे" म्हणजे फक्त रसना असंच माहित होतं...
... जेंव्हा "बाबा" हे एकमेव हिरो वाटायचे..
... जेंव्हा "प्रेम" म्हणजे आईची ती मिठी/ झप्पी असंच माहित होतं...
... जेंव्हा "बाबांचे खांदे" म्हणजे जगातील सर्वात उंच गोष्ट वाटायची...
... जेंव्हा "वाईट - शत्रु" म्हणजे आपली खट्याळ भावंडं वाटायची...
... जेंव्हा "ड्रामा" फक्त नाटकातच होतो असं वाटायचं...
... जेंव्हा "वाया गेला" असं कुणी म्हणायचं तेंव्हा "वेळ" हेच अभिप्रेत असायचं...
... जेंव्हा "औषध" म्हणजे फक्त खोकल्यावरच असतं असं वाटायचं...
... जेंव्हा "तोडा - तोडी" व्ह्यायची ती फक्त खेळण्यांची...
... जेंव्हा "दुखणारी गोष्ट" म्हणजे ते फुटलेले गुडघे असायचे...
... जेंव्हा "गुडबाय" फक्त उद्यापर्यंत असायचा...
... जेंव्हा "गेटींग हाय" म्हणजे झुल्यावर/ झोक्यावर झुलणे असंच माहित होतं...
... जेंव्हा "युद्ध - लढती" फक्त खेळातच असतात असं वाटायचं...
 
आणि तेंव्हा - आपल्याला मोठं व्हायचं होतं! खर  आहे ना!!!
त्या वेळी
 नो सिटबेल्टस् ... नो एअरबॅग्ज .... ट्रकच्या मागच्या 'फाळक्यात' बसणेही एक मेजवानी  असायची!
लहाण मुलांच्या त्या रंगबिरंगी "बाबा-गाड्या" ... "टॅपरप्रुफ बौटल टौप्स" चा आता-पता ही नाही!

सायकलच्या मागच्या चाकाला कार्डबोर्डचा तुकडा लाऊन त्याचा फटरररररार - मोटार सायकल सारखा - आवाज करत तासन् तास फिरायचो.. त्या सायकलच्या शर्यती... नो सेप्टी हेल्मेट्स, नो क्नी / एल्बो पॅड ! तर कधी सायकल नसेल तर जुना गाडीचा तयार घेवून खेळणे, लपाछपी वगैरे वगैरे फुल कल्ला...

तहान  लागली की नळालाच तोंड लाऊन पाणी पिणे.. बौटल्ड वौटर - एक रहस्यच होते!

ते पोष्टाची तिकीटं... काडीपेटीचे कव्हर्स आणि बरंच काही जमा करण्याचा आणि जोपासण्याचे छंद!

सुट्टीच्या दिवशी, दिवसभर उनाडक्या - खेळ.. मात्र अंधार व्हायच्या आत घरी, ब-याचदा अगदी जेवणाच्याच वेळी!

खेळाच्या नादात अनेकदा पडलेले दात, खरचडले हात - पाय ... मात्र कुणीही तक्रार करायची नाही!

मित्रांसोबत चालत शाळेत जाणं... मोबाईलशीवायही आम्ही एकमेकांना नेहमीच शोधुन काढत असू! कसं? काही माहित नाही..!

खाण्यात अगदी केक, ब्रेड, चौकलेटस्, निंबुपाणी, साखरेचा तो आले-पाक... सगळं चालायचं... नो डायट - नथिंग!!

मित्रांना खेळायला बोलवाची ती ट्रीक - बेल न वाजवता अगदी चुपचाप मागच्या रस्त्याने जाणं...

बॅटच्या जागी ते लाकडी फळीचे गल्ली क्रीकेट, त्या आट्या-पाट्या, सुरपारंब्या... डौक्टर - डौक्टर, लपाछपी ... असे किती तरी खेळ....

परीक्षेत ना पास झालो तरी त्याच ग्रेडवर - वरच्या वर्गात ढकलला - अशी सोय..... नो नीड टु विजिट सायकॅट्रिस्ट, सायकोलोजिस्ट वा कौन्सेलर्स...

..... काय दिवस होते ते...!

त्या वेळी आपण एकमेकांबद्दल कमालीचा आदरही द्यायला अन् घ्यायलाही शिकलो..
खरोखर ना असे वाटते की हा आयुष्यातील सोनेरी काळ पुन्हा  परत आला तर...???.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive