Thursday, December 23, 2010

गुगल आयडी अर्थात Gmail चा पासवर्ड कसा बदलाल !


How to change Gmail ID password.

गुगल आयडी अर्थात Gmail चा पासवर्ड कसा बदलाल !

गुगल आयडी अर्थात Gmail चा पासवर्ड कसा बदलाल !

आपल्यापैकी ९० % पेक्षा जास्त लोकांचे gmail IDs असतात, त्याहून ही जास्त तर एकेकांचे २ किंवा २ पेक्षा जास्त IDs देखील असतात. बरं या सगळ्यांना एकच पासवर्ड ठेवायची बरेच जणांची इच्छा असते तर काहींना आपला आत्ताचा पासवर्ड बदलायचा असतो. पण हे सगळे अतिशय सोपे असले तरी बर्‍याच जणांना हे नक्की करायचे कसे याची माहीतीच नसते. अशा नवख्या मंडळींना हा लेख नक्कीच उपयोगी पडेल असे वाटते.चला तर मग शिकूया आपल्या gmail अकाऊंटचा पासवर्ड कसा बदलायचा ते. तुम्ही जेव्हा Gmail ला लॉगिन होता. त्यावेळी तुम्हाला ३-४ पर्याय दिसत असतील डाव्या हाताला अगदी वरती म्हणजेच इंग्रजीत टॉपला. तिकडून Setting हा पर्याय निवडा.

तुमच्या समोर Settings या पर्यायाअंतर्गत उपलब्ध असणार्‍या विविध बाबी दिसतील. त्यातून Accounts and Import हा पर्याय तुम्ही निवडा.

Accounts and Import वर क्लिक केल्यावर, तुम्हाला नवीन एक लिंक एक्स्प्लोर झालेली तुम्हाला दिसेल. त्यातून Google Account Settings या लिंकवर क्लिक करा.
Google Account Settings वर क्लिक केल्यावर एक नविन विंडो उघडेल तुमच्यासमोर. त्यातून Change Password या लिंकवर क्लिक करा.

Change Password ची लिंक एक्स्प्लोर होऊन तुम्हाला थेट पासवर्ड बदलायला सांगणारे एक नवीन पान दिसेल. त्यात तुम्हाला तुमचा आधीचा म्हणजेच जुना पासवर्ड सर्वात आधी टाकावा लागेल त्यानंतर मग नवीन पासवर्ड आणि पुढे तोच नविन लिहीलेला पासवर्ड पुन्हा लिहावा लागेल आणि मग Save या बटणावर क्लिक करा.

Save या बटणावर क्लिक केल्यावर जर दिलेला जुना , नविन आणि पुन्हा नविन पासवर्ड हा क्रम जर बरोबर असेल तर तुम्हाला तुमचा पासवर्ड बदलला आहे असे दर्शवणारे शब्द दिसतील. अन्यथा तुम्हाला पुन्हा ह्या तीन गोष्टी काळजीपूर्वक भराव्या लागतील.


























सगळे पासवर्ड योग्य आणि अचूक असतील तर तुम्हाला वरील आकृतीत दाखविल्याप्रमाणे संदेश दिसेल आणि तुमचा नविन पासवर्ड वापरण्यास तुम्ही सज्ज असाल.पुन्हा आपल्या Gmail मधील Inbox वर जाण्यासाठी Gmail वर क्लिक करा
Gmail ID चा पासवर्ड बदलण्याविषयी लिहीलेला हा लेख आपल्याला कसा वाटला हे मला नक्कीच कळवा.
आपल्या काही सूचना किंवा अडचणी असतील तर त्याही आमच्यापर्यंत पोहोचवा.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive