गुंतवणूकदारांची मानसिकता ही फार मजेची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. कुठलीही
खरेदी करताना आपण त्याचा भाव बघतो, कुठली योजना आहे का तसेच कुठे सेल चालू
आहे का हे बघत असतो. नेमका याच मानसिकतेचा फायदा घेऊन सर्वच मॉलमध्ये
आमच्याकडे वस्तू किती स्वस्त आहेत किंवा अमुक वस्तू खरेदी केल्यावर तमुक
वस्तू मोफत अशी जाहिरात करताना दिसतात. सामान्य ग्राहकांची हीच मानसिकता
गुंतवणूक करतानाही दिसते. केवळ ०.२५ टक्के किंवा ०.५० टक्के व्याजदर जास्त
मिळतो म्हणून पतपेढय़ांमध्ये लाखो रुपयांच्या मुदत ठेवी ठेवणारे सुशिक्षित
मी पाहिले आहेत.
याच मोहापायी थोडे दिवस व्याज मिळाल्यानंतर मुद्दल गायब झालेले आपण पाहतोच.
नेमका हाच प्रकार शेअरबाजारातही होताना दिसतो. अनेकजण कुठला शेअर स्वस्त
आहे ते शोधताना दिसतात. या ‘पेनी स्टॉक’ कंपन्या प्रत्यक्षात काय कामगिरी
करतात हे तपासण्याऐवजी मला १ रुपयाचे २ रुपये झाले म्हणजे झाले आहे ही
मानसिकता जास्त दिसते. त्यामुळेच ‘कॅल्स रिफायनरीज’सारखे शेअर्स सतत
प्रकाशात असतात. अशा गुंतवणुकीत फायदा होण्याऐवजी तोटा होण्याचीच शक्यता
असली तरीही केवळ बाजारभावामुळे गुंतवणूकदार अशा शेअर्सची खरेदी करतो.
पोर्टफोलिओसाठी कंपन्या निवडताना शेअरचा भाव किंवा खरेदीची किंमत महत्त्वाची असली तरीही ‘बाजारभाव’ आणि ‘किंमत’ यातला फरक लक्षात यायलाच हवा. यालाच प्राइस / व्हॅल्यू संकल्पना असेही म्हणतात. तुम्हाला अनेक कंपन्यांचे प्राइस अर्निग गुणोत्तर खूपच कमी आणि म्हणून तो शेअर खरेदीसाठी आकर्षक वाटू शकेल. मात्र त्याआधी हा भाव एवढा कमी का? याचाही अभ्यास करायला हवा. भले फायदा कमी झाला किंवा प्रसंगी थोडा तोटा सहन करावा लागला तरी चालेल; परंतु स्वत:ची फसगत होऊन देऊ नका.
पीव्हीआर सिनेमा हे नाव तसे शहरातील नागरिकांना अनोळखी नक्कीच नाही. मल्टिप्लेक्स, चित्रपट वितरण आणि निर्मिती या तिन्ही क्षेत्रांत सध्या उत्तम कामगिरी करणारी ही कंपनी. जून २०१२ साठी संपलेल्या तिमाहीसाठी जाहीर झालेले आर्थिक निष्कर्ष पाहिले तर पीव्हीआरची मनोरंजनाबरोबरच वितरण आणि निर्मिती क्षेत्रातील प्रगती दिसून येते. सध्या २४ शहरांतून आणि ४२ थिएटर्समधून १८४ पडदे असणारी ही कंपनी यंदाच्या आर्थिक वर्षांत सुमारे ६९ पडद्यांची भर घालेल. तसेच येत्या दोन वर्षांत कंपनीचा इरादा ४००-५०० पडदे करण्याचा आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ‘बोलिंग’ आणि खाद्य / पेये इ. व्यवसायही प्रगतीपथावर आहेत. व्यवसाय विस्तारासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने भागभांडवल विकून १०७ कोटी उभारण्याचा प्रस्तावही मंजूर केला आहे. सध्या सुमारे १८५-१८६ रुपयांना असणारा हा शेअर थोडासा महाग वाटत असला तरीही दीर्घकालीन गुंतवणुकीत तो फायदा मिळवून देईल. १६०-१७० च्या आसपास मिळाल्यास उत्तम.
पीव्हीआर लिमिटेड
सध्याचा भाव रु. १८६.७०
वर्षांतील उच्चांक/नीचांक रु. १९६/१०८
प्रवर्तक : अजय बिजली
प्रमुख उत्पादन : चित्रपट वितरण व निर्मिती
भरणा झालेले भागभांडवल : रु. २६.०३ कोटी
प्रवर्तकांचा हिस्सा : ४५ %
दर्शनी मूल्य : रु. १०
पुस्तकी मूल्य : रु.११०
प्रति भाग मिळकत (ईपीएस) : रु. १०.४
किंमत-उत्पन्न गुणोत्तर (पी/ई) : १८.७ पट
अजय वाळिंबे

No comments:
Post a Comment