‘‘अगं, काल ‘पुढचं पाऊल’ बघितलीस का? कित्ती छान झुमके घातले होते राजलक्ष्मीने.. ए मला कसे दिसतील गं?’’
सासू-सुनांच्या सीरिअलमधील प्रत्येक गोष्ट आपल्याही
जीवनात वापरण्याचा आटापिटा असा सगळीकडे होताना दिसतो.. लिक्विड सिंदूर,
साडय़ा नेसण्याची विशिष्ट पद्धत, गजरे, पण सर्वात जास्त मन मोहवून जाणारी
गोष्ट म्हणजे त्यांचे भरजरी दागिने. हुबेहूब खरी दिसणारी ही इमिटेशन
ज्वेलरी सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते. एवढंच नाही तर सध्या दुकानदारही या
सीरिअल्सच्या ट्रेंडप्रमाणे दुकानात दागिने ठेवू लागलेत, कारण सतत
त्यांच्याकडेही एखाद्या सीरिअलमधल्या नायिकेसारख्या ज्वेलरीची विचारणा होत
असते.
सीरिअल्समधल्या दागिन्यांची विश्वकर्मा म्हणजे एकता
कपूर. ‘कहानी घर घर की’ आणि ‘क्यूं की..’पासून सुरू झालेला हा ट्रेंड आता
बऱ्यापैकी स्थिरावलाय. आधी सीरिअल्समध्ये गुजराती आणि राजस्थानी दागिने
ट्रेंडमध्ये होते. या सीरिअल्समधील बहुतेक पात्रे पारंपरिक लूकमध्ये
दिसायची. सुरुवातीला सर्व सीरिअल्समध्ये इमिटेशन ज्वेलरी दिसायची. मोठे आणि
ठसठशीत सेमी प्रेशियस स्टोनचे दागिने होते. नंतर काहीसे सोबर असे कोरीव
आणि कुंदनचे दागिने दिसू लागले. ‘देवदास’ आणि ‘जोधा अकबर’ने आणलेला हा
ट्रेंड आणि आता दिसते ती सोन्याची झगमग..
ट्रेंडमध्ये असलेली ज्वेलरी
पौर्णिमा यांच्या मते सध्या मराठी एथनिक (पारंपरिक) ज्वेलरी ट्रेंडमध्ये
आहे. अगदी मराठी नसलेलेसुद्धा या घसघशीत आणि फॉरएव्हर ज्वेलरीला पसंती देत
आहेत, तर िहदी सीरिअल्सना ज्वेलरी पुरवणाऱ्या मुंबईच्या श्व्ोता आर्ट
ज्वेलरीच्या श्रीनिवास सुरकुंतेच्या मते सध्या ऑक्टोन स्टोन ज्वेलरीला
जास्त मागणी आहे. तसेच िहदी सीरिअल्समध्ये पाची कुंदन तर मराठीमध्ये
पारंपरिक आणि मॉडर्न अशा ऑरगॅनिक आणि फॅब्रिक ज्वेलरीला पसंती आहे जी
कॅज्युअल लूकला अगदी मस्त शोभून दिसते.
अर्थातच हे आहेत अस्सल पारंपरिक मराठी दागिने.
आश्चर्य वाटायला नको, पण हा सध्याचा ट्रेण्ड आहे. ‘शिवाजी राजे’, ‘झांसी
की रानी’ या ऐतिहासिक सीरिअल्स तसंच िहदी सीरिअल्समध्येही दिसू लागलेली
मराठी कुटुंबं आणि पात्रं जसं, ‘पवित्र रिश्ता’, ‘मी आजी आणि साहेब’,
‘बालिका वधू’तील कुंदाताईंचा नववारी पेहराव यांना सध्या मार्केटमध्ये दिसत
असलेल्या झगमगाटाचं श्रेय जातं.
सीरिअल्समधल्या दागिन्यांची जन्मकथा:
सीरिअलमध्ये एक दिवस दिसणारे हे दागिने घडवण्याची
प्रक्रिया मात्र बरीच मोठी असते. सर्वात आधी प्रत्येक कॅरेक्टरचा लूक
डिझाइन केला जातो, त्याचा पेहराव ठरवला जातो आणि त्याप्रमाणे त्याची
ज्वेलरी आणि इतर अॅक्सेसरीज ठरवल्या जातात. ऐतिहासिक मालिकांसाठी खास
संशोधन केलं जातं आणि त्याप्रमाणे दागिने तयार करून घेतले जातात. काही
वेळेला खास सोन्याचे दागिनेसुद्धा तयार करून घेतले जातात. ‘वीर शिवाजी’
सीरिअलसाठी खास खरे दागिने पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सकडून घेण्यात आले होते.
ही ज्वेलरी कुठे घ्याल?
सीरियल्समध्ये दिसणारी ही ज्वेलरी दिसायला जरी भरजरी आणि महाग वाटली तरी
खरं पाहायला गेलं तर आपल्या खिशाला अगदी सहज परवडणारी आहे. सोन्यासारखी
वाटणारी ज्वेलरी चांदी आणि तांबं वापरून बनवली जाते. या ज्वेलरीला
सोन्याच्या पाण्याचा मुलामा दिला जातो. मग त्यावर सेमी-प्रेशियस स्टोन्स
आणि काचेच्या खडय़ांनी सजवलं जातं. या सेट्समध्ये सर्वसाधारणपणे असतात
कानातले, नेकपीस आणि बांगडय़ा. हे सेट्स अगदी हजार रुपयांपासून ते अगदी
लाखापर्यंत उपलब्ध असतात. जे तुमच्या खिशाला परवडेल ते घ्या.. सोन्याच्या
या चढत्या भावात लोकांनाही ही इमिटेशन ज्वेलरी जास्त आवडू लागली आहे. या
ज्वेलरीमध्ये सोन्यापेक्षाही जास्त डिझाइन्स उपलब्ध असतात आणि ते डोळ्यांना
नक्कीच सुखकारक असतं. हव्या त्या वेळी उपलब्ध होणारी; ज्वेलरकडे जा,
डिझाइन निवडा आणि मग वाट बघा हे प्रकार यामध्ये होत नाहीत, त्यामुळे याला
पसंती का मिळू नये.. सीरिअल्समधील ही ज्वेलरी हमखास मिळण्याची ठिकाणं
म्हणजे भुलेश्वर, सान्ताक्रुज स्टेशन परिसर, मालाड मार्केट, दादरचं
कीर्तिकर मार्केट तसंच कॅज्युअल ज्वेलरीसाठी िलकिंग रोड, एल्को मार्केट,
खार, कुलाबा कॉजवे आहेच.
या सगळ्या उपलब्धतेमुळे सीरिअल्समधल्या या सगळ्या आवडत्या स्त्रियांसारखं
छान-छान दिसणं आपल्या आवाक्यातलं आणि सहज उपलब्ध असलेलं आहे, याबद्दल
आत्मविश्वास नक्कीच निर्माण झाला असेल ना..
आजच्या काळातील सीरिअल असेल
तर या पात्रांसाठी सगळ्या इमिटेशन केलेल्या दागिन्यांची बल्कमध्ये खरेदी
केली जाते, तेही मुंबई आणि आसपासच्या मार्केट परिसरात. हे दागिने खरेदी
करताना वेगळ्या आणि आकर्षक एक्सक्लुसि डिझाइनला पसंती दिली जाते. साधारण
एका सीरिअलसाठी घेतलेले दागिने त्याच सीरिअलमध्ये परत-परत वापरले जातात आणि
बहुतेक वेळा सीरिअल संपेपर्यंत ते खराबही होऊन जातात. त्यामुळे प्रत्येक
सीरिअलसाठी नवीन दागिने खरेदी करण्याला पसंती दिली जाते. काही प्रॉडक्शन
हाऊसेसचं स्वत:चं कलेक्शन असतं. काही प्रसंगी दागिने म्हणजे एखाद्या मोठय़ा
इव्हेन्ट मध्ये म्हणजेच फिनाले किंवा अॅवॉर्ड फंक्शनसाठी भाडय़ानेसुद्धा
घेतले जातात. अशा फंक्शन्ससाठी दागिने भाडय़ाने घेतले जातात, हे ऐकून  आश्चर्य
वाटलं ना.. पण प्रत्येक इव्हेन्टचं बजेट असतं आणि त्या बजेटनुसार काम
करायला लागतं. त्यामुळे भाडय़ाने घेतलेले दागिनेच त्या बजेटमध्ये बसू शकतात.
दरम्यान, िहदी सीरिअल्समधील बरेचसे दागिने पूर्वी
गुजरातमधील राजकोट येथून मागवले जायचे. मात्र आता स्थानिक पातळीवर म्हणजे
मुंबईतच हा ज्वेलरी मेकिंग बिझनेस झपाटय़ाने वाढतोय. भुलेश्वर, सांताक्रूझ
आणि दादरचं कीर्तिकर मार्केट इथे या दागिन्यांची विक्री होते, तर दागिने
तयार करण्याचं काम अंधेरी, मालाड, गोरेगाव या परिसरांत होतं. या दागिने
बनवण्याच्या उद्योगात गुजराती, बंगाली कारागीर मोठय़ा प्रमाणात आहेत. अर्थात
यात मराठीही आहेत, पण हे प्रमाण तुलनेने कमीच.
पौर्णिमा ओक हे कॉस्च्युम डिझायिनगमधलं अनुभवी नाव.
गेली कित्येक र्वष त्या सीरिअल्स आणि चित्रपटांसाठी काम करत आहेत. ‘असंभव’,
‘बाजीराव मस्तानी’, ‘छत्रपती शिवाजी राजे’ ते अगदी आत्ताची ‘उंच माझा
झोका’ इ. सीरिअल्सच्या पात्रांच्या ज्वेलरी डिझायिनगचं काम त्यांनी केलंय.
सीरिअल्समधल्या ज्वेलरी डिझायिनग आणि कॉस्च्युमसाठीचं त्यांचं स्वत:चं
युनिट आहे. तसंच इतर अनेक डिझायनर्सबरोबरही त्यांनी काम केलंय. त्या
म्हणाल्या, सीरिअलसाठी दागिने डिझाइन करताना किंवा खरेदी करताना
एक्सक्लुझिव्ह असणं महत्त्वाचं आहे. यासाठी मार्केट रिसर्चही करावा लागतो.
मराठी आणि िहदी सीरिअल्समध्ये आता फारसा फरक राहिला नाहीये. पूर्वी या
दोन्ही भाषांच्या सीरिअल्सच्या बजेटमध्ये फरक असायचा, पण आता सगळंच चित्र
बदललंय. आता मराठीतही लूक आणि ज्वेलरीला हिंदीएवढंच महत्त्व दिलं जातं.
त्यामुळेच मराठीतली पात्रंही दागिन्यांच्या चमचमाटाने झळाळून उठताना दिसत
आहेत. ऐतिहासिक किंवा पौराणिक सीरिअल्स करताना क्रिएटिव्हिटीला खूप जास्त
वाव असतो आणि सध्या चित्रपटांप्रमाणे सीरिअल्ससाठीही
ज्वेलरी देण्यासाठी ज्वेलर्स स्वत:हून पुढे येत आहेत. लहान पडद्याचं एकंदर
लोकांमध्ये असलेलं आकर्षण, त्याचा ग्राहकवर्गावर होणारा सकारात्मक परिणाम
याचंचं हे प्रतीक आहे.
सध्या दागिने आणि एकूण गेट-अपसाठी बरंच गाजत असलेलं
मराठी पात्र म्हणजे स्टार प्रवाहवरील ‘पुढचं पाऊल’ मालिकेतील राजलक्ष्मी
किंवा आक्कासाहेब. अस्सल कोल्हापुरी कुटुंबातील आक्कासाहेबांच्या
दागिन्यांना सध्या खूपच पसंती मिळत आहे. त्यांचं भलंमोठं मंगळसूत्र,
कोल्हापुरी साज, बोरमाळ व थोडेसे ट्रेंडी झुमके. यामुळे कोल्हापुरी
दागिन्यांना परत ग्लॅमर मिळालंय. अर्थात काही जण असंही सांगतात की, खास
आक्कासाहेबांच्या दागिन्यांना बघण्यासाठी ही मालिका बघितली जाते. याबाबत
राजलक्ष्मी अर्थात हर्षदा खानविलकर म्हणाल्या की, ‘‘याचं सर्व श्रेय मी
आमच्या पूर्ण टीमला देते. एखादं पात्रं कसं दिसतंय, त्याचं व्यक्तिमत्त्व
कसं आहे हे प्रेक्षकांच्या मनावर पहिलं इम्प्रेशन निर्माण करत असतं आणि
प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं की, आपणही छान सजावं, गजरा माळावा, पण ते
तिला रोजच्या आयुष्यात शक्य होत नाही. प्रत्येक नवऱ्याचीसुद्धा आपल्या
बायकोला असं नटलेलं-थटलेलं पाहण्याची इच्छा असते आणि अशा दागिने परिधान
केलेल्या स्त्रीला जेव्हा ती स्त्री किंवा तिचा नवरा पडद्यावर बघतो तेव्हा
स्वाभाविकच ते त्यांना भावतं. यातच आमचं यश आहे आणि या स्तुतीमुळे
आम्हालासुद्धा चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असतं.’’ |
No comments:
Post a Comment