माणसाचं आयुष्य म्हणजे
आठवणींचा चक्रव्यूह. आयुष्यभर त्या आपल्याला घेरून असतात आणि वेढून बसतात.
येणाऱ्या दिवसागणिक हा चक्रव्यूह मोठा आणि जटिल होत जातो. आठवणी
प्रत्येकाच्याच असतात पण सर्वांनाच त्या व्यक्त करता येतात असे नाही. काही
मात्र या बाबतीत भाग्यवान असतात. कवितेचा आधार घेऊन आपल्या मनातील भावनांना
शब्दरूप देतात. कवी मनोहर रणपिसे यांनीही आपले भावविश्व अंतर्यामी या
गजलसंग्रहाच्या माध्यमातून मांडले आहे. ते म्हणतात-
वेचले काटे फुलांना टाळले मी
बहर दुःखाचे असे सांभाळले मी
तसेच हे बहर काव्याचे आहेत , म्हणूनच न कोमेजणारे आहेत.
यूआरएल फाऊंडेशनचा उपविभाग असलेल्या सोमनाथ प्रकाशनच्या वतीने दरवर्षी गजलसंग्रह प्रकाशित केला जातो. गजलकार मनोहर रणपिसे यांचा ' अंतर्यामी ' हा आठवा गजलसंग्रह आहे.
संग्रहातील पहिलीच गजल एका शरीरविक्रय करणाऱ्या महिलेचे भोग मांडणारी आहे. तिची व्यथा , खेद आणि संताप व्यक्त करणारी आणि असे नशीब देणाऱ्या त्या परमेश्वरालाच आव्हान देणारी ही तिची गजल आहे. ती म्हणते..
ही प्रथा पुढच्या पिढीला मी आता देणार नाही
मी मुक्याने भोगण्याचा वारसा सांभाळलेला...
' तू ' गिऱ्हाईक बनून माझ्या एकदा कोठीवरी ये
नरक बघ असतो कसा तू आमुच्या नशिबी दिलेला..
जीवनावर बोलताना कवी म्हणतो ,
जीवन म्हणजे काय ? कळेना , कधी असे , कधी तसे ते
कधी वाटते एक समस्या , कधी वाटते एक पर्वणी..
तऱ्हेतऱ्हेचे ऋतू भोगले , वादळ-पाऊस-ऊन सोसले
जगण्याच्या वेलीवर आले मग कवितेचे फूल उमलुनी!
मानवी मनाची स्पंदनं अचूक टिपणाऱ्या एकूण ९० गजल या संग्रहात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
...............................................................................
अंतर्यामी
मनोहर रणपिसे
प्रकाशक - सोमनाथ प्रकाशन
पृष्ठं - १०४
किंमत - १०० रु.

No comments:
Post a Comment