Thursday, July 5, 2012

Words after death

शोकसमाचारातून शब्दप्राप्ती
एन. डी. आपटे

एखाद्या प्रसिद्ध माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर लिहिलेल्या गुणवर्णनपर इंग्रजी मजकुरातून पुष्कळ वेळा चांगले शब्द, चांगले वाक्प्रचार मिळून जातात. अशा काही शब्दांची ओळख-
एखाद्या प्रसिद्ध माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर लिहिलेल्या गुणवर्णनपर इंग्रजी मजकुरातून पुष्कळ वेळा चांगले शब्द, चांगले वाक्प्रचार (= idioms) मिळून जातात. टोनी जूड (Tony Judt) या थोर इतिहासकाराचे ६ ऑगस्ट २०१० या दिवशी निधन झाले. त्यांच्याबद्दल ‘टाइम’ या साप्ताहिकाच्या Milestones या सदरात मायकेल एलिअट यांनी म्हटले होते, ''He was a historian of the very first order.'' म्हणजे ते पहिल्यात पहिल्या दर्जाचे इतिहासकार होते. त्यांनी पुढे म्हटले, ''He had no stars in his eyes about Europe'' म्हणजे ते युरोपबद्दल भोळसटपणे आदर्शवादी किंवा आशावादी नव्हते (त्यांच्या मनात युरोपबद्दल भ्रामक कल्पना नव्हत्या.) पण युरोपबद्दल त्यांना जरूर गर्व होता. To have stars in one's eyes या idiom चा युरोपच्या संदर्भातील अर्थ be naively (= भोळेपणाने) idealistic or optimistic म्हणजे युरोपबद्दल भोळेपणाच्या भावनेने idealistic or optimistic म्हणजे आदर्शवादी किंवा आशावादी असणे असा आहे. एलिअट म्हणतात, ‘‘जो युरोप दुसऱ्या महायुद्धाने केलेली राखरांगोळी, फॅसिझम आणि कम्युनिझम यांना पुरून उरतो, पुन्हा ताठ मानेने उभा राहतो त्याबद्दल जूड यांच्यासारख्या इतिहासकाराला वाटणारा गर्व किंवा अभिमान सार्थ होता. त्यांच्या युरोप- प्रेमाला वस्तुस्थितीचा भक्कम आधार होता. त्यात भाबडेपणाचा भाग नव्हता.’’ या idiom ला ‘आनंदाची, रोमान्सची भावना’ हा पण अर्थ आहे. या अर्थाचे एक वाक्य पाहा : ''Vandana gets stars in her eyes when she thinks of her boyfriend''. दुसरे वाक्य : ''Raju had stars in his eyes when he talked about the millions who would buy his new product''. केवळ कल्पनाविलासात रमणाऱ्या, डोक्यात भ्रामक किंवा खुळचट कल्पना (= fanciful ideas) बाळगणाऱ्या लोकांचे 'starry-eyed' असे वर्णन करतात.
रॉबर्ट बटलर यांचे ४ जुलै २०१० या दिवशी वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. बटलर यांनी 'ageism' हा शब्द रूढ केला (म्हणजे He coined it) आणि वृद्ध माणसांबद्दलच्या prejudice ला किंवा discrimination ला विरोध केला.
Ageism या नामाची (एजिझम्) व्याख्या, ''prejudice (= पूर्वग्रह) or discrimination (= भेदाभेद/ पक्षपात) against a particular age group especially the elderly म्हणजे विशेषत: वयस्कर/ ज्येष्ठ माणसांबद्दलचे पूर्वग्रह, पक्षपात अशी आहे. वयस्कर माणसाबद्दलच्या पूर्वग्रहांना, पक्षपाताला म्हणजे ageism ला उत्तर देताना ते म्हणायचे, ''The elderly can be as productive, engaged, open to ideas and fun, as the younger folk''. इथे engaged म्हणजे, occupied, busy, greatly interested (= committed) असा अर्थ घ्यायचा. त्याचा असा विश्वास होता की, ''By eating well, exercising and staying connected we might extend our already increased longevity''. म्हणजे चांगले अन्नपदार्थ खाऊन, व्यायाम करून आणि अनेकांशी संबंध ठेवून आपण आपली आधीच वाढलेली आयुर्मर्यादा आणखी वाढवू शकू. ‘व्हॅनिटी फेअर’ या मासिकाच्या डिसेंबर २०११ च्या अंकातील सू मेंजर्सवरचा (Sue Mengers) मृत्युलेख स्वत: संपादक ग्रेडन कार्टर यांनी लिहिला आहे. हॉलिवूडमधील महिला एजंट म्हणून काम करणाऱ्या या प्रसिद्ध स्त्रीचे ऑक्टोबर २०१० च्या मध्यास वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले.
संपादक कार्टर लिहितात, ''Her death came after a lifetime of illnesses that would have felled an athlete half her age'' म्हणजे तिचा मृत्यू एका आजारांनी भरलेल्या आयुष्यानंतर आला- ‘‘ज्या आजारानी तिच्याहून निम्म्या वयाच्या खेळाडूला (अ‍ॅथलीटला) खाली पाडले असते.’’
To fell या क्रियापदाचा अर्थ to knock down a tree म्हणजे एखादे झाड तोडणे, खाली पाडणे असा आहे. दुसरा अर्थ ''to knock someone down with great force''. म्हणजे एखाद्याला जबरदस्त ताकदीने खाली लोळवणे, पाडणे असा आहे. एक वाक्य पाहा : ''Nari Contractor was felled by a rising delivery from Griffith that hit him on the head''. नरी कॉन्ट्रॅक्टरची ही दुखापत सर्व क्रिकेट शौकिनांना ठाऊक असेल.
सू मेंजर्स एजंट या नात्याने प्रसिद्ध अभिनेत्री आणि प्रसिद्ध दिग्दर्शक या दोघांचेही प्रतिनिधित्व करत असे. कार्टर म्हणतात, ''She wanted only above-the-line talent''. हॉलिवूडमध्ये एखाद्या अतिशय गुणवान अभिनेत्रीचे वर्णन या शब्दप्रयोगाने- (= above - the - line talent) करतात.
आता तीन शब्दांचे उच्चार सांगणार आहे.
एखाद्या दंतकथेला किंवा दंतकथेतील वीरासमान माणसाला legend असे म्हणतात. उच्चार ‘लेजंड’ असा आहे, लीजंड असा नाही.
Ghost म्हणजे भूत, उच्चार ‘गोस्ट’ असा आहे, घोष्ट असा नाही.
उच्चार या अर्थाचा pronunciation हा जो शब्द इंग्रजीत आहे, त्याचा उच्चार ‘प्रनन्सिएशन’ असा आहे.
आता उपयुक्त वाक्ये :
१. The test was a snap चाचणी परीक्षा फारच सोपी होती.
२. If you stand over me all the time it makes me nervous म्हणजे तू माझ्यावर सारखी बारीक लक्ष ठेवायला लागलीस तर मी नाउमेद होते. Stand over या फ्रेझचा अर्थ to watch or supervise closely असा आहे.
३. अनौपचारिक भाषेत bloke (ब्लोक) म्हणजे a man, = पुरुष. Sham is a really good bloke (= I like him a lot) केंब्रिजचा शब्दार्थकोश सांगतो की, असा पुरुष सामान्य दर्जाचा असतो. पुरुषच करतात त्या प्रकारच्या कृतींना. उदा. फुटबॉल खेळणे, मोटार, यंत्रसामग्री दुरुस्त करणे blokish activities असे म्हणतात.
४. What shines through in all works is her enthusiasm for life सर्व कामांतून काय प्रकट होत असेल तर तिचा आयुष्याबद्दलचा उत्साह!
५. He puffed away on his pipe.
६. He sat puffing away at his cigarette सिगरेटचे झुरके घेत तो तिथे बसला. Away या शब्दानंतर on किंवा at वापरता येते.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive