Thursday, December 13, 2012

बांगलादेशीकडे आधार कार्ड - Aadhar card given to bangladeshi




अनेक सरकारी योजनांचा दुवा ठरणारे आधार कार्डचीही आता बनवाबनवी होऊ लागल्याची घटना गोवंडीत उघडकीस आली आहे. ड्रायव्हिंग लायसन्सपासून पासपोर्टपर्यंत सरकारी पातळीवर ओळखपत्रासाठी 'आधार' ठरलेले हे कार्ड चक्क एका बांगलादेशी घुसखोराकडे आढळून आले आहे. या घटनेमुळे मुंबईत बस्तान बसवण्यासाठी आधार कार्डचा वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे.

Aadhar card
Aadhar card
गोवंडी शिवाजी नगर येथे ३० नोव्हेंबरला पोलिसांची विशेष शाखा आणि शिवाजी पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध संयुक्त कारवाई केली. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी हा भाग पिंजून काढत १४ पुरुष, सहा महिला आणि आठ मुलांसह २८ जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशींच्या नागरिकत्वाचे पुरावे तपासण्यात आले, तेव्हा मुंबईतील सरकारी कारभाराची लक्तरेच टांगली गेली. यातील काही बांगलादेशींकडे रेशनकार्ड तसेच पॅनकार्डही आढळली. पोलिसांसाठी धक्कादायक प्रकार मात्र पुढेच होता. एका बांगलादेशीकडे चक्क अनेक सरकारी योजनांसाठी दुवा ठरणारे आधार कार्डच आढळले. या घुसखोराने ते आपले ओळखपत्र म्हणून सादर केल्याने पोलिसही चक्रावले. अख्तर निजामुद्द‌िन शेख असे त्याचे नाव असल्याची माहिती आय ब्रँचचे इन्स्पेक्टर वसंत वखारे यांनी दिली.

 
 आधार 'पॅनकार्ड'चा

बांगलादेशी घुसखोर अख्तरने हे आधार कार्ड मिळवण्यासाठीही नामी शक्कल लढवली होती. सुरुवातीस त्याने आपल्या नावावर पॅनकार्ड मिळवले. पॅनकार्ड काढताना त्याने शिवाजीनगर येथील एका शाळेच्या दाखल्याचा वापर केला. मात्र पोलिसांच्या उलटतपासणीत त्याचे बिंग फुटले. भारताचा नागरिक असल्याचा पुरावा म्हणून पोलिसांनी त्याच्याकडे जन्माचा दाखला मागितला. मात्र तो सादर न करू शकल्याने त्याच्यावर संशय बळावला व बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने आधारकार्ड मिळवल्याचे उघड झाले. या प्रकारामुळे आधार कार्डच्या वितरण प्रक्रियेवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive