अनोळखी फेसबुक यूजरना घ्यावी लागणार तुमची परवानगी
फेसबुक पेजवरील एखादी कमेंट किंवा फोटोवरून उडणारा गोंधळ तसेच त्याचा गैरवापर आता रोखता येणार आहे. एखाद्या यूजरचे पोस्ट , फोटो पाहण्यासाठी त्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. यामुळे यूजरच्या खासगी आयुष्यातील फोटोक्षण अधिक सुरक्षित होणार आहेत. त्यासाठी प्रायव्हसी सेटिंग अधिक सुलभ करण्यात आले आहे.
आतापर्यंत ' फेसबुक ' च्या ' प्
' फेसबुक ' आणि सोशल नेटवर्किंग जगतातील आघाडीच्या अन्य कंपन्यांनी या नव्या ' टूल ' ची निर्मिती केली आहे. त्यामुळे यूजरनी ' फेसबुक ' सह अन्य साइटवर टाकलेली वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तीच्या हाती लागण्याची शक्यता आता दूर झाली आहे. ' फेसबुक ' वरील हे नवे बदल एका आठवड्यातच लागू होणार असले तरी , ते एक अब्जांहून अधिक यूजरपर्यंत पोहोचण्यासाठी कदाचित पुढील वर्ष उजाडण्याची वाट पाहावी लागणार आहे.
फ्रेंड्सची ' फोटोकॉपी ' आता बंद
प्रोफाइलवर ' टॅग ' करण्यात आलेला फोटो ठेवायचा अथवा नाही याचाही निर्णय यूजरला घेता येणार आहे. यापूर्वी' फेसबुक फ्रेंड्स ' यूजरच्या संमतीविना त्यांचे फोटो कॉपी करून त्याचा बिनदिक्कत वापर करायचे. मात्र आता असे प्रकार घडणार नाहीत. एखाद्या यूजरचा कोणताही फोटो घ्यायचा असल्यास , त्या यूजरची संमती घ्यावी लागणार आहे.
पोस्ट कुणी पाहिली तेही कळणार
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ' प्रायव्हसी शॉर्टकट ' नावाचा आयकॉन होमपेजच्या उजव्या बाजूला ठळकपणे दिसणार असून , त्यावर ' लॉक ' असणार आहे. त्यामुळे एका यूजरचे प्रोफाइल , त्यातील कोणता भाग , कोणता फोटो ,कोणती पोस्ट कोण पाहत आहे अथवा कोण पाहून गेले आहे , याची माहिती यूजरला मिळणार आहे.
प्रायव्हसी सेटिंग अधिक सोपी
यापूर्वी ' प्रायव्हसी सेटिंग ' करण्यासाठी ' टॅब सेटिंग ' मध्ये जाण्याची आवश्यकता भासायची. मात्र , नव्या ' टूल 'मुळे यूजरना ' गुगल प्लस ' प्रमाणे प्रत्येक कंटेटला ' ड्रॉप डाऊन मेन्यू ' द्वारा नियंत्रित करता येणार आहे. याशिवाय' होमपेज ' च्या सर्वात वरील बाजूला पुढील महिन्यापासून ' प्रायव्हसी एज्युकेशन पेज ' देण्यात येणार आहे. त्यामुळे ऑनलाइनचा वापर पूर्वीपेक्षा अधिक ' यूजरफ्रेंडली ' होणार आहे.
No comments:
Post a Comment