Margsheesh Month Datta Jayanti |
॥दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा॥
॥दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा॥
आज म्हणजेच शुक्रवारी (दि. १४ डिसें. २०१२ रोजी) मार्गशीर्ष महिन्याचा प्रारंभ होत आहे. याच महिन्यात दत्त जयंती येत असल्याने सर्व दत्तभक्तांमध्ये व दत्त परंपरेतील भक्तांमध्ये या महिन्याचे विशेष महत्व आहे. गीतेमध्ये तर स्वत: श्रीकृष्णाने म्हटले आहे, "मासाना मार्गशीर्षोऽयम्।" याचाच अर्थ असा की मार्गशीर्ष महिना माझेच (भगवान श्रीकृष्णाचे) स्वरूप आहे. स्कंद पुराणात देखील या महिन्याचा महिमा गायला आहे भगवान विष्णुला प्रसन्न करण्यासाठी उपासना करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल महिना आहे. त्याचप्रमाणे दत्त भक्तांसाठीसुद्धा भगवान दत्तात्रेयांची उपासना, आराधना करून त्यांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना अत्यंत योग्य आहे. मार्गशीर्ष शुद्ध ७ से मार्गशीर्ष १४ या सप्ताहात गुरुचरित्राचे पारायण केल्यास त्यास विशेष महत्व आहे. या सप्ताहाला "श्री गुरुचरित्र सप्ताह" असेही म्हणतात. यानंतर पुढील दिवशी म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. अशा या मार्गशीर्ष
महिन्याचे महत्व अपरंपार आहे. त्याचे जितके वर्णन करावे तितके कमीच. मी
माझ्या अल्पमतीने या महिन्याचा महिमा सांगण्याचा प्रयत्न केला. आपणां
सर्वांनी देखील या काळात भगवान दत्तात्रेयांची उपासना करून त्यांना प्रसन्न
करावे हीच इच्छा त्यापाठी आहे. तेव्हा आपणही इतर भक्तांशी हि पोस्ट शेअर
कराल अशी अपेक्षा बाळगतो. भगवान दत्तात्रेयांची आपल्यावर व आपल्या संपूर्ण
कुटुंबीयांवर सदैव कृपा राहो हीच दत्तचरणी प्रार्थना.
श्री गुरुदेव दत्त.
श्री गुरुदेव दत्त.
No comments:
Post a Comment