Wednesday, December 12, 2012

शरीरात विरघळणारा कंडोम

अवांछित गर्भधारणा आणि लिंगसांसर्गिक आजारांपासून मिळणार संरक्षण

वृत्तसंस्था, लंडन

एचआयव्हीची लागण आणि अवांछित गर्भधारण यापासून महिलांचे संरक्षण करणारा कंडोम तयार करण्यात यश मिळाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. हा कंडोम शरीरात विरघळतो आणि औषधे शरीरात सोडतो , असे वृत्त येथील ' डेली मेल ' ने दिले आहे.

हा कंडोम वीर्याला गर्भाशयात प्रवेश करण्यापासून रोखतो , तसेच एचआयव्हीविरोधी औषधे आणि हार्मोन्सयुक्त गर्भनिरोधके कालांतराने शरीरात सोडतो. या दोन्ही क्रियांसाठी स्वतंत्र यंत्रणा असल्यामुळे ते अधिक लाभदायी असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी हा कंडोम तायर केला आहे. तो विकसित करण्यासाठी या पथकाला दहा लाख डॉलरचे अर्थसाह्य देण्यात आले होते.

काय आहे तंत्रज्ञान ?

या कंडोममध्ये औषधे कापडाच्या अतिसूक्ष्म तंतूंसारख्या आकारात असतात. इलेक्ट्रोस्पिनिंग नावाचे तंत्रज्ञान वापरून तो तयार करण्यात आला आहे.
त्यासाठी औषधांचे द्रव विद्युतभारित हवेतून जाऊ दिले जातात. त्यामुळे त्यांचे नॅनो फायबर तयार होतात. या कंडोममधील एक धागा शरीरसंबंधांनंतर लगेच वितळून गर्भधारणा रोखतो. इतर धागे काही दिवसांमध्ये शरीरात विरघळतात. त्यातील औषधे शरीरात मिसळून गर्भनिरोधक गोळीप्रमाणे काम करतात. तसेच , लिंगसांसर्गिक आजारांनाही प्रतिबंध करतात.
...............
अवांछित गर्भधारणा आणि एचआयव्हीची लागण यापासून महिलांना स्वतःचा बचाव करता यावा , अशी एखादी वस्तू तयार करण्याचा आमचा उद्देश होता. आमच्याकडे औषधे होती फक्त ती शरीरात कशा प्रकारे सोडता येतील , हे शोधणे महत्त्वाचे होते.
- किम वुड्रो , वॉशिंग्टन विद्यापीठातील बायोइंजिनीअरिंगच्या प्राध्यापक
.............
एकापेक्षा जास्त औषधे नियंत्रित प्रमाणात शरीरात सोडणे या पद्धतीमुळे शक्य होते. प्रत्येक कामासाठी स्वतंत्र धाग्याची योजना करण्याचे यश आम्ही मिळवले आहे.
- कॅमेरून बॉल , सहसंशोधक

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive