* सीलिंक, पार्किंगच्या खोट्या पावत्यांचे रॅकेट
* दोन वर्षात कोट्यवधीचा घोटाळा उघड
* दोघांना अटक, अन्य आरोपींचा शोध सुरू
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
वांद्रे-वरळी सीलिंक, आरे रोड आणि भिवंडी बायपासवर आकारले जाणारे टोल तसेच, महापालिका आणि छत्रपती शिवाजी विमानतळ येथील पार्किंगच्या बनावट पावत्या छापून कोट्यवधींचा घपला करणारे रॅकेट क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने उद्ध्वस्त केले आहे. या प्रकरणी दोघा जणांना बुधवारी अटक करण्यात आली असून अन्य काही आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. गेले दोन वर्षे सुरू असलेल्या या घोटाळ्यामुळे कंत्राटदार आणि पर्यायाने सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
कफ परेड येथील झोपडपट्टीत राहणारा जगदंबाप्रसाद आणि बोरा बाजारातील प्रिंटर सोमनाथ माझी या दोघांना अटक करण्यात आली. माझी हा पश्चिम बंगालचा रहिवासी असून ए.ए. ऑक्शनरीज अॅण्ड कॉन्ट्रॅक्टर या कंपनीचा सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून जगदंबाप्रसाद यांच्याकडे कुलाबा आणि फोर्टमधील पार्किंग लॉटची जबाबदारी होती. कुलाब्यातील ताजच्या परिसरात वाहने पार्क करणाऱ्या कारचालकांशी साटेलोटे करून जगदंबाप्रसादने हा बनावट धंदा सुरू केला होता.
वांद्रे-वरळी सीलिंकचे एक दिवसाचे बनावट पास, विमानतळ परिसरात पार्किंगचा परवाना असलेल्या जीव्हीके कंपनीच्या पार्किंगच्या बनावट पावत्यांसह महापालिका पार्किंग लॉटच्याही बनावट पावत्या या दोघांकडून छापल्या जात होत्या. त्या स्वस्त दरात चालकांना दिल्या जात असल्यामुळे त्यांचाही फायदा होत असे. प्रॉपर्टी सेलचे सब इन्स्पेक्टर लक्ष्मीकांत साळुंखे यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बोरा बाजारातील प्रिंटिंग प्रेसवर इन्स्पेक्टर नंदकुमार गोपाळे यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात २८ लाखांच्या पावत्या जप्त करण्यात आल्या असून त्यात सीलिंकच्या ११४००, जीव्हीकेच्या ९७०२ आणि अन्य काही पावत्यांचा समावेश आहे.
सरकारी अधिकारी - कर्मचारीही ?
सीलिंकचे पास रोज वेगळ्या रंगाचे असल्यामुळे प्रत्येक दिवशी इथे एक माणूस पाठवून आजचा रंग कोणता याची माहिती घेऊन तसे बनावट पास वितरीत केले जात होते , अशी माहिती पोलिस सहआयुक्त ( गुन्हे ) हिमांशू रॉय यांनी दिली . या घोटाळ्यात काही सरकारी अधिकारी आणि कर्मचारीही सामील असल्याची शक्यता असल्याचे रॉय यांनी सांगि तले.

No comments:
Post a Comment