Wednesday, February 20, 2013

PENGUIN NEW TITLE



ISBN13
name
currency
price
AUTHOR1
order
PUBLISHER
BINDINGTYPE
CATEGORY
SUBJECT
9780143419662
THE TCS STORY & BEYOND
INR
499
RAMADORAI S.

PENGUIN PORTFOLIO
Paperback
Others
NON FICTION
9781906694982
EVERY SEVENTH WAVE
INR
250
GLATTAUER DANIEL

PENGUIN UK
Paperback
Others
FICTION
9780670086566
Their Language of Love
INR
499
Sidhwa, Bapsi

PENGUIN VIKING
Hardback
Others
FICTION
9780670086764
BLIND SPOT
INR
599
Banaji Mahzarin R.

PENGUIN VIKING
Hardback
Non Fiction
REFERENCE
9780143104209
THE SECRET GARDENER
INR
299
Swaminathan, Kalpana

PENGUIN INDIA
Paperback
ADULT OTHER
FICTION
9780241950333
TUESDAYS GONE
INR
350
French, Nicci

PENGUIN UK
Paperback
Thriller
SUSPENSE
9780718152772
TWO EVILS
INR
550
Tracy, P J

MICHAEL JOSEPH
Tradepaperback
Fiction
Crime & Mystery
9780718194550
Allen Carrs EASY WAY TO Stop Smoking
INR
399
Carr, Allen

PENGUIN UK
Paperback
Non Fiction
MEDICINE
9780718194727
Allen Carrs THE EASYWEIGHT TO Lose Weight
INR
399
Carr, Allen

PENGUIN UK
Paperback
Non Fiction
DIET
9780143419631
Real Time
INR
299
Chaudhuri, Amit

PENGUIN INDIA
Paperback
Others
FICTION
9780140148121
Crow Eaters
INR
300
Sidhwa, Bapsi

PENGUIN INDIA
Paperback
ADULT OTHER
FICTION LITERARY
9780140117677
Ice Candy Man
INR
250
Sidhwa, Bapsi

PENGUIN INDIA
Paperback
ADULT OTHER
FICTION LITERARY
9780718195373
Ladybird Stories for 2 Year Olds
INR
199
NA

LADYBIRD
Hardcover
CHILDREN
Early Learning / Early Learning Concepts
9780718195380
Ladybird Stories for 3 Year Olds
INR
199
NA

LADYBIRD
Hardcover
CHILDREN
Early Learning / Early Learning Concepts
9780718195397
Ladybird Stories for 4 Year Olds
INR
199
NA

LADYBIRD
Hardcover
CHILDREN
Early Learning / Early Learning Concepts
9780718195403
Ladybird Stories for 5 Year Olds
INR
199
NA

LADYBIRD
Hardcover
CHILDREN
Early Learning / Early Learning Concepts
9781846147517
CHINAS SILENT ARMY
INR
599
Cardenal Juan Pablo & Araújo Heriberto

ALLEN LANE
Tradepaperback
Non Fiction
Politics & Government
9780141343747
Wheres Spot?
INR
299
Hill, Eric

Penguin Puffin (UK)
Board Book
CHILDREN
Picture Books
9780141343754
Whos There, Spot?
INR
299
Hill, Eric

Penguin Puffin (UK)
Board Book
CHILDREN
Picture Books
9780723268932
Spots Opposites
INR
299
Hill, Eric

Penguin Puffin (UK)
Board Book
CHILDREN
Picture Books
9780723268949
Spot Counts to 10
INR
299
Hill, Eric

Penguin Puffin (UK)
Board Book
CHILDREN
Picture Books
9780723268956
Spots ABC: A First Alphabet Book
INR
299
Hill, Eric

Penguin Puffin (UK)
Board Book
CHILDREN
Picture Books

Monday, February 18, 2013

Rajiv Gandhi Equity Savings Scheme


राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग्स स्कीमबद्दल...


शेअर बाजाराविषयी अज्ञान आणि अनामिक भीती यामुळे अनेकदा लहान गुंतवणूकदार या गुंतवणूक प्रकारापासून लांब राहणे पसंत करतात. परंतु , त्यांनीही शेअर्समध्ये पैसे गुंतवावेत , त्यातून लाभ मिळवावेत आणि शेअर बाजारात पैसा खेळता राहावा म्हणून सरकारने ही नवी योजना सुरू केली आहे. त्याची थोडक्यात माहिती.
......................


लहान गुंतवणूकदारांना देशातल्या भांडवल बाजारात पैसे गुंतवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग्स स्कीम सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत , नव्या रिटेल गुंतवणूकदारांना इन्कम टॅक्समधून एकदा सवलत मिळेल. या योजनेसाठी पात्र असलेल्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवलेल्या रकमेवर पहिल्या आर्थिक वर्षात कलम ८०-सीसीजीनुसार ५० टक्क्यांपर्यंत वजावट मिळेल आणि ही सवलत ५० हजार रुपयांपर्यंतच्या रकमेवर मिळेल.

योजनेचे स्वरूप
सर्वप्रथम , डिमॅट खाते उघडल्यानंतर त्याचा वापर राजीव गांधी योजनेसाठी करायचा असल्याचे गुंतवणूकदाराने डिपॉझिटरीला कळवणे गरजेचे आहे. त्यानंतर , गुंतवणूकदाराला विकत घ्यायचे असलेले शेअर्स डिपॉझिटरी वर्षभरासाठी निश्चित करते. दुसऱ्या वर्षी , गुंतवणूकदाराला २० हजार रुपयांच्या शेअर्सची विक्री करता येईल , पण त्याच वेळी त्याने तितक्याच रकमेचे अन्य शेअर्स खरेदी करणे आवश्यक आहे. तिसऱ्या वर्षापर्यंत , ५० हजार रुपयांपर्यंतच्या शेअर्समध्ये गुंतवणूक असावी लागेल. करसवलतीच्या दृष्टीने , डिपॉझिटरीकडून व्यवहारांची खातरजमा केली जाते आणि करसवलत मिळण्यासाठी गुंतवणूकदाराने आपल्या गुंतवणुकीच्या नोंदी ठेवायला हव्यात. २०१२-१३ आर्थिक वर्षासाठी राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग्स स्कीममध्ये गुंतवणूक करता येईल आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय बघत असलेल्या गुंतवणूकदारांनी या योजनेत गुंतवणूक करून या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यायला हवा.

प्रादेशिक भाषांतल्या जाहिरातींमार्फत या योजनेचा प्रसार केला जाणार आहे. तसेच , विविध सेमिनार आयोजित करूनही या योजनेविषयी जाणीवजागृती केली जाईल. यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांची मदतही घेतली जाईल.

पात्रतेचे निकष
या योजनेअंतर्गत कर सवलत केवळ ' नव्या रिटेल गुंतवणूकदारां ' ना मिळणार आहे. हे गुंतवणूकदार म्हणजे ज्यांचे आर्थिक वर्षातील उत्पन्न १० लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे. या योजनेची अधिसूचना मिळेपर्यंत डिमॅट खाते उघडलेले नसलेल्या किंवा डेरिव्हेटिव्ह विभागात कोणतेही व्यवहार केले नसलेल्या कोणत्याही निवासी व्यक्तीचा समावेश ' नव्या रिटेल गुंतवणूकदारां ' मध्ये होतो. तसेच , योजनेची अधिसूचना मिळण्यापूर्वी डिमॅट खाते उघडलेल्या , परंतु अधिसूचना मिळेपर्यंत इक्विटी वा डेरिव्हेटिव्ह विभागात कोणतेही व्यवहार न केलेल्या व्यक्तीलाही ' नव्या रिटेल गुंतवणूकदारां ' मध्ये समाविष्ट केले जाईल.

गुंतवणूक कालावधी
पात्र शेअर्समध्ये गुंतवणूक करून ठेवण्याचा कालावधी तीन वर्षे आहे. पहिल्या वर्षी निश्चित लॉक-इन कालावधी आहे , तर दुसऱ्या वर्षी लवचिक लॉक-इन कालावधी असेल. लवचिक लॉक-इन कालावधीमध्ये गुंतवणूकदारांना विशिष्ट अटींचे पालन करून शेअर्सचे व्यवहार करता येतील. याबद्दलच्या सविस्तर अटी इन्कम टॅक्स विभाग आणि सेबीच्या परिपत्रकात नमूद केल्या आहेत.

गुंतवणुकीस पात्र सिक्युरिटीज
एनएसईने ठरवलेल्या ' सीएनएक्स-१०० ' मध्ये किंवा बीएसईने ठरवलेल्या ' बीएसई-१०० ' मध्ये समाविष्ट होणारे इक्विटी शेअर्स
केंद्र सरकारने महारत्न , नवरत्न वा मिनिरत्न अशा श्रेणींत विभाजन केलेल्या सरकारी कंपन्यांचे शेअर्स
' आरजीईएसएस ' मध्ये गुंतवणूक करण्यास पात्र असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे एक्स्चेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ) किंवा म्युच्युअल फंड योजना
' सीएनएक्स-१०० ' किंवा ' बीएसई-१०० ', तसेच विशिष्ट सरकारी कंपन्याच्या फॉलो-ऑन ऑफर.
पात्र असलेल्या ईटीएफ व म्युच्युअल फंडांच्या न्यू फंड ऑफर


E-books in regional laguage



प्रादेशिक भाषांतील ई-बुक





टेक्नोलॉजीच्या जमान्यात वाचन - लेखन आणि इतर अनेक बाबींमधील तंत्रेच बदलली . टेक्नोक्रांती झाल्यामुळे काम करण्याच्या पद्धतीतही अनेक बदल झाले . प्रत्यक्षात आता कुणीही कागदावर हाताने फारसे लिहित नाही . त्याची गरजच उरलेली नाही . पुस्तकांच्या बाबतीतही छापील पुस्तकाची जागा ' - बुक ' घेऊ लागले आहे .

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या जागतिक पुस्तक मेळाव्यातही ' - बुक ' ची दखल घेतली गेली . एक वेगळा विभाग ' - बुक ' च्या प्रकाशकांसाठी , निर्मात्यांसाठी ठेवण्यात आला होता . कम्प्युटर , इंटरनेटबरोबरच स्मार्टफोनवर एका क्लिकवर माहिती उपलब्ध झाली . सुरुवातीला इंग्रजी भाषेपुरतेच मर्यादित असणारे हे क्षेत्र आता जवळपास सर्व भाषांमध्ये विस्तारले आहे . स्मार्टफोन , आयफोन , अन्ड्रॉइड यांसारख्या फोनवर अनेक अॅप्लिकेशन्स आहेत . त्यात आता प्रादेशिक भाषांमधील पुस्तके डाउनलोड करण्याच्या अॅप्लिकेशनची भर पडणार आहे .

टॅबलेट आणि मोबाइलसाठी - बुक आणि - मॅगझिन्स पुरवणाऱ्या ' रॉकस्टँड ' या कंपनीने दिल्लीतील जागतिक पुस्तक मेळाव्यात प्रादेशिक भाषांमधील पुस्तकांच्या पहिल्या संचाचे अनावरण केले आहे . यामुळे प्रादेशिक भाषांमधील - पुस्तकेही फोनवर वाचता येणार आहेत . विविध प्रकाशनांची इंग्रजी पुस्तके ' - बुक ' वर उपलब्ध आहेत . आता प्रादेशिक भाषांमधील पुस्तकांची मागणी यामुळे वाढणार आहे . केवळ ' प्रिंट कॉपीं ' च्या विक्रीवर होणाऱ्या नफ्याची गणिते आता केव्हाच मागे पडली आहेत . ' अॅन्ड्रॉइड ' वर एका अॅप्लिकेशनद्वारे ही पुस्तके डाउनलोड करता येतील .

' रॉक असाप रिटेल प्रायव्हेट लिमिटेड ' चे संस्थापक संचालक प्रवीण राजपाल यांनी या अॅप्लिकेशनची माहिती दिली . ते म्हणाले , ' हिंदी , गुजराती , मराठी यांसारख्या प्रादेशिक भाषांमधील पुस्तके यामुळे सर्वांना मिळणार आहेत . एकूण १८ भाषांमध्ये आम्ही पुस्तके प्रसिद्ध करत आहोत .' यासाठी अॅन्ड्रॉइड फोनवर एक अॅप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल . हे अॅप्लिकेशन मोफत डाउनलोड करता येईल . डाउनलोड केलेले पुस्तक कायमस्वरूपी वापरता येईल . इंटरनेट अॅक्सेस नसला , तरी डाउनलोड केलेले पुस्तक वाचता येणार आहे . नाइट रीडिंग मोड , फॉण्ट साइजमध्ये बदल करणे , पुस्तक वाचताना नोट्स काढण्याची सोय यांसारखी वैशिष्ट्ये या अॅप्लिकेशनमध्ये आहेत . एवढेच नव्हे , तर वाचायचा आपल्याला कंटाळा आला , तर वाचून दाखवण्याची सोय या अॅपमध्ये आहे . पुस्तक डाउनलोड करण्याची किंमत ही छापील पुस्तकाच्या किमतीपेक्षा फार कमी आहे . सर्वांत स्वस्त पुस्तक हे ' चाचा चौधरी कॉमिक बुक ' असून पुस्तकाची किंमत केवळ एक रुपया आहे .

कंपनीने नुकतेच देशातील पन्नास प्रकाशकांशी ' टाय - अप ' केलेले आहे . विविध भाषांमधील आणखी एक हजार पुस्तके त्यामुळे कंपनीच्या संग्रहात दाखल झाली आहेत . सध्या ' रॉकस्टँड ' कडे वीस लाख पुस्तके आहेत . आर्थिक फायद्यांबरोबरच वाचनसंस्कृती वाढीला लागावी हा या बदलत्या आणि प्रगतीशील तंत्रज्ञानाचा उद्देश आहे . हे सर्वांनी लक्षात घेऊन टेक्नॉलॉजीचा वापर वाचून समृद्ध होण्यासाठी करावा .

फोटोग्राफरसाठी

फोटोग्राफी हा अनेकांचा छंद असतो . हातात कॅमेरा घेऊन भटकंती करत फोटो काढणे हे अनेकांचे स्वप्न असते . काहींपर्यंत अद्ययावत ज्ञान पोहोचत नाही किंवा मनातील शंकांना उत्तरे देण्यासाठी तज्ज्ञ मिळत नाहीत . त्यांच्यासाठी http://digital-photography-school.com/ ही वेबसाइट मदतीला येऊ शकते . या ठिकाणी फोटोग्राफीसंदर्भातील विविध लेख , कॅमेरांचे रिव्ह्यू आणि इतर बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत .






Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive