अँड्रॉइडच्या बनावट(Duplicate Android) आवृत्तीचा शिरकाव
अँड्रॉइडने गेल्या काही दिवसांमध्ये मोबाइलच्या क्षेत्रामध्ये क्रांती केली आहे. अन्य कंपन्यांच्या महागड्या आणि तुलनेने किचकट असणाऱ्या अॅप्सपेक्षा अगदी मोफत असणारे अँड्रॉइड अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. अगदी काही हजार रुपयांपासूनच्या मोबाइल हँडसेटमध्ये अँड्रॉइड उपलब्ध होते. सर्व रेंजमधील मोबाइल आणि अॅप्सची न संपणारी यादी यांमुळे अँड्रॉइडने प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये हक्काची जागा मिळवली आहे. ही घोडदौड सुरू असतानाच, अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी एक धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. अँड्रॉइडच्या सारख्याच एका बनावट सॉफ्टवेअरने या क्षेत्रामध्ये प्रवेश केला आहे. हे सॉफ्टवेअर तुमच्या स्मार्टफोनमध्ये अवैध पद्धतीने प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे स्मार्टफोनधारकांनी बेनामी एसएमएसपासून सावध राहण्याची सूचना कम्प्युटर आणि इंटरनेट सुरक्षा संस्थांकडून देण्यात आला आहे.
कम्प्युटर सुरक्षेच्या क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या ' कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया ' ने (सीईआरटी-इन) या बनावट सॉफ्टवेअरला ' सुपरक्लीन ' किंवा ' ड्रॉइडक्लीनर ' असे नामकरण करण्यात आले आहे. अँड्रॉइड मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या काही नामांकित अॅप्सच्या माध्यमातून हा मालवेअर स्मार्टफोनमध्ये प्रवेश करतो. त्यानंतर स्मार्टफोनच्या एसडीकार्डमध्ये svchosts.exe, folder.ico, Autorun.inf या एक्झिक्युटेबल फाइल्स इन्स्टॉल होतात. हा स्मार्टफोन कम्प्युटरला जोडल्यानंतर कम्प्युटरमधील डेटा अॅक्सेस करतात आणि त्यातून आपल्या कम्प्युटरवर लक्ष ठेवले जाण्याचाही धोका आहे. त्याचबरोबर हे सॉफ्टवेअर स्मार्टफोनमध्ये स्टेटस बदलते, एसएमएस तपासते, कॉन्टॅक्टचे सर्व तपशील तपासले जातात, आणखी वैयक्तिक माहितीच्या माध्यमातूनही अफरातफर करते, अशी माहिती देण्यात आली आहे. यातून एखाद्या अनोळखी नंबरवर एसएमएस किंवा फोन जाण्यासही सुरुवात होते. त्यामुळे आपल्या स्मार्टफोनवरून एखाद्या अनोळखी नंबरवर फोन गेल्याचे किंवा एसएमएस गेल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने स्मार्टफोनची तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोबाइलच्या प्रमुख कंपन्यांकडूनच हे सॉफ्टवेअर काढून टाकणे आणि फोन पूर्ववत करणे, शक्य आहे. त्यामुळे अँड्रॉइडच्या या बनावट अॅप्लिकेशनपासून स्मार्टफोनला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment