मीठ आणि दारु ह्यांचे सेवन कमी करा । रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलला नियंत्रित करण्यासाठी मीठाचे आणि दारुचे सेवन कमीत-कमी प्रमाणात करा । धूम्रपान बंद करा । धूम्रपान केल्याने कर्करोगासमवेत अनेक आजारांचा धोका असतो । ह्याला सोडण्याचे पूर्ण प्रयत्न करा । रोज व्यायाम करा । आपल्या रोजच्या नित्यकर्मामध्ये व्यायामाला समाविष्ट करणे । नियमित व्यायाम केल्यामुळे तुम्ही ह्दयविकार, बृहदआंत्र-कर्करोग, रक्तदाब आणि मधुमेहासारख्या आजारांपासून वाचवू शकता । हल्की-फुल्की शारीरिक क्रिया करावी । जिना चढणे, बागकाम, घरातील छोटे-मोठे काम किंवा नृत्य करण्यासारखे हल्की-फुल्की शारीरिक क्रिया अवश्य करावी । ह्यामुळे शरीर लवचिक बनते । जर सतत ताप येत असेल तर त्याची पाहणी/तपासणी जरुर करावी । हिवताप, काळा आजार यक्ष्मा ह्यांची सुरूवात तापापासून होते । उन्हाळा सुरु झाला आहे । शिळे अन्न आणि रस्त्याच्या कडेला विकले जाणारे पदार्थ खाऊ नये । मुलांना फास्ट फूड, कुरकुरे,आइसक्रीम खायला देऊ नका । अनेक जुलाब झाल्यामुळे मीठ आणि साखर ह्यांचे मिश्रण किंवा ओआरएस पाजावे । स्वच्छ पाणी जास्तीत-जास्त प्यावे । सतत तापाने त्रासलेला आहे । काळा-आजार हिवताप किंवा तीव्रताप येऊ शकतो । माझा मुलगा जुलाब आणि ताप ह्या दोन्हींनी त्रासलेला आहे । सर्वप्रथम ओआरएसचे मिश्रण पाजावे । त्यानंतर शिशूला कुठल्याही बाल रोगतज्ञाकडे लवकर दाखवावे । अडीच-तीन वर्षापासून दर दोन-तीन महिन्यांनी ताप येत जातो । एवढेच नाहीतर जीभेवर पांढरा थर जमा होतो । पाण्याचे प्रमाण जास्त घ्या आणि मूत्र तपासणी करा । काळा-आजाराचे प्राथमिक लक्षण काय आहे । काही दिवसापासून हलकासा ताप आहे । तापाची पाहणी करा । आणि इतर आवश्यक तपासणीनंतरच कालाजार प्रमाणित होऊ शकतो । मेटासिनची गोळी दिल्याने ताप उतरतो आणि पुन्हा १०३ पर्यंत ताप चढतो । एक्सरे, टीसी-डीसी साधारण आहे । चार-चार तासाने ताप मोजा । जर १०० पेक्षा जास्त ताप असेल तर पॅरासिटामलची गोळी द्या आणि कोणत्यातरी औषधतज्ञाचा सल्ला घ्या । एच आई वी काय आहे । हा कसा होतो । सुरक्षेचे उपाय सांगा । हा एक प्रकारचा वायरस आहे । ह्याचा प्रसार प्रामुख्याने असुरक्षित लैंगिक संबंध, संसर्गित सुई, संसर्गित रक्त आणि आईकडून बाळांना होतो । ह्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक क्षमता कमी होत जाते । अस्थी-क्षयरोगाचे लक्षण काय आहे । ह्याचा उपचार काय आहे । हाडांमध्ये वेदना, सतत ताप, जरी कमी झाला तरी हा ताप संध्याकाळी वाढतो ।त्रासाबरोबर हाडांमध्ये वक्रता आली तर हे अस्थी-क्षयरोगाचे लक्षण आहे । ह्याच्यामुळे हाडे कमकुवत होतात आणि झिजू लागतात । ह्या परिस्थितीमध्ये अर्धांगवायू होऊ शकतो । ह्याच्या तपासणीसाठी डिजिटल एक्सरे, एमआरआई करा ।क्षयरोगाचे औषध एक वर्षापर्यंत घ्या । आणि तज्ज्ञ चिकित्सकाचा परामर्श घ्या । रात्री झोपताना अंगावर एक चादर आवश्य घ्या । तसेच पंखा कमीत-कमी चालवा । ह्याच्याने जर स्वतःला बरे वाटत नसेल तर एन्टीएलर्जिक गोळ्या दहा दिवसापर्यंत घ्या । मुलांना घामोळ्या झाल्या आहेत काय करावे? अतिसाराचे घरगुती उपचार काय आहे? एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे साखर आणि एक चिमुटभर मीठ घलून उकळवून द्या । उन्हामुळे काळा-आजार रोग होतो का? गर्मीमध्ये ह्याचा प्रकोप वाढला जातो का? काळा आजार वाळुमक्क्षीच्या चावण्याने होतो । ह्याचा उपचार सर्व इस्पितळांत आहे । ह्याच्यासाठी आत्ता गोळीसुद्धा उपलब्ध आहे । एखाद्या मुलाला डांग्या खोकला झाला तर काय केले पाहिजे । बाळाला डीपीटी लस द्यावी । कुठल्याही विशेषज्ञ चिकित्सकाला दाखवावे तसेच खोकल्यासाठी कफची तपासणी करा । आपल्या डोळ्यांच्या काळजीबाबत तुम्ही किती जागरुक आहात । दर सहा महिन्यांनी डोळ्यांची तपासणी चष्मा किंवा कॉण्टॅक्ट लेन्स ह्यांची निगा नियमित डोळे धुणे । परंतु ह्या सगळ्यांबरोबर जर तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्यावर थोडेसे लक्ष द्या । एवढेच नाही तर तुमच्या डोळ्यांची दृष्टी चांगली होऊ शकते । तर आपण नेत्ररोगांपासूनसुद्धा वाचू शकाल । लिवरपूल विद्यापीठातील नेत्र-शल्यचिकित्सा विभागाचे अध्यक्ष व विख्यात नेत्रविकार-संशोधक डॉ । इयान ग्रीयरसन म्हणतात । आहारात विटामिन सी आणि ओमेगा-3 तेल व काही विशेष वनस्पतींचे प्रमाण वाढवल्याने सर्वसाधारणपणे आंधळेपणास कारणीभूत होणार्याि मोतीबिंदू व ग्ल्युकोमा ह्यांसारख्या व्याधींपासून वाचले जाऊ शकते ।/दूर राहता येते । चला तर जाणून घेऊ या की दृष्टी निरोगी ठेवण्यासाठी आपला आहार कसा असावा । दृष्टी तीक्ष्ण राहावी ह्यासाठी आपण आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा । पालक, ब्रोकोली, मोड आलेले कडधान्य अशाप्रकारे हितकारी ठरु शकतात । ह्यात ल्यूटिन, जीजेनथिनसारखे दोन महत्त्वाचे तत्त्व असतात, जे दृष्टिला तीक्ष्ण बनविण्यासाठी जबाबदार असतात । अमेरिकेच्या राष्ट्रीय नेत्रसंस्थेच्या (नॅशनल आई इंस्टीट्यूटच्या) ६ वर्षांनंतरच्या अभ्यासामध्ये हे सिद्ध झाले आहे की हे तत्त्व वृद्धांना आंधळेपणापासून वाचवते । ह्यामुळे सगळ्यांनी रोज शंभर ग्रॅम हिरव्या भाज्या कच्च्या पानांच्या (सलाडच्या) रुपात खाल्ल्या पाहिजेत । न्याहारीमध्ये रोज दोन ते तीन अंडी अवश्य खा । बिलबेरी किंवा ब्लॅकबेरी एंथोसाइनिन आंधळेपणा किंवा मोतीबिंदूपासून वाचवते । शोधामध्ये हे सुद्धा आढळले आहे की डोळ्यांमध्ये रक्त आणि पोषक तत्त्व पोहचविणार्याड पेशींना मजबूत बनवते । म्हणून, न्हारी किंवा फळांच्या सलाडबरोबर तुम्ही बिलबेरी किंवा ब्लॅकबेरीसुद्धा खाऊ शकता । जर तुम्ही मांसाहारी आहात तर डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी माशांच्या सेवनापेशा कोणताही उपाय चांगला नाही । मासे खाण्याने एवढेच नाही तर तुमची त्वचा, केस, बुद्धी निरोगी राहते तर दृष्टीसुद्धा तीक्ष्ण बनते । माशामध्ये आढळला जाणारा ओमगा थ्री फॅट डोळ्यांना ग्ल्युकोमा आणि म्हातारपणामध्ये दृष्टी दुर्बळ होण्याचा धोका कमी करतात । एवढेच नाही तर ते आपल्याला कोरड्या/शुष्क नेत्र लक्षणापासून (ड्राय आई सिंड्रोम) बचावते । एका दुसर्यात आभ्यासामध्ये सांगितले गेले आहे की कोरड्या/शुष्क नेत्र लक्षण ह्यासारख्या डोळ्याच्या तक्रारीमुळे त्रासलेल्या महिला आठवड्यात पाचवेळा ट्यूना मासा खाऊन हा त्रास ६८ टक्के कमी करु शकतात । भारतीय पदार्थांमध्ये सुकामेवा इत्यादींचा वापर पूर्वीपासून होत आलेला आहे । परंतू काय तुम्हाला हे माहित आहे का बदाम, काजू, अक्रोड, किशमिश/मनुके इत्यादी हा सर्व सुकामेवा पौष्टिक होण्याबरोबरच डोळ्यांनासुद्धा खूप हितकारी आहेत । ह्यामध्ये विटामिन ई विपुल प्रमाणामध्ये आढळले जाते, जे एवढेच नाही तर मोतीबिंदू, अनेकप्रकारचा अंधळेपणा आणि इतर नेत्रविकारांपासून वाचवण्याशिवाय पाराबैंगनी किरणातून पोहचणार्या नुकसानाने सुद्धा डोळ्यांचे रक्षण करते । रोज न्याहारीच्या किंवा जेवणाच्यावेळी गोड पदार्थामध्ये सुक्यामेव्याचे बारीकबारीक तुकडे/चुरा टाकून/भुरभुरवून खाण्यास सुरुवात करा । गोष्ट वजन कमी करण्याची असो किंवा त्वचेची निगा राखण्याची, खाण्यामध्ये ताजे फळ खाण्याचा सल्ला सगळ्या गोष्टींमध्ये दिला जातो । तर बरे, डोळ्यांसाठी का ह्यांना सोडले पाहिजे । विटामिन सी चा भरपूर आहार घेतल्याने ग्ल्युकोमा, मोतीबिंदू आणि अंधळेपणाचा धोका बर्याच मर्यादेपर्यंत कमी केला जाऊ शकतो । डोळ्यांना निरोगी बनविण्यासाठी आहारामध्ये फळ, भाज्यांचा समावेश करणे पुष्कळ आहे । ह्या सुद्धा वस्तुंचा अपल्या आहारामध्ये समाविष्ट करुन आपण डोळ्यांना कमकुवत होण्यापासून वाचवू शकतो । ह्याच्याशिवाय, दूध पिणे, गाजर खाणे हे हितकारी ठरु शकते । विटामिन सी चा भरपूर आहार घेतल्याने डोळ्यांची निगा राखण्यासाठी मदतगार ठरु शकतो । खाण्या-पिण्यामध्ये पाळलेली थोडीशी दक्षतासुद्धा तुमच्या डोळ्यांमध्ये नवीन प्राण टाकू शकतात । योगाने ताब्यात येऊ शकतो अर्धांगवायू/लकवा अर्धांगवायू सर्वसाधारणपणे शरीराच्या उजव्या किंवा डाव्या भागाच्या स्नायू व शिरांची क्रियाशीलता तसेच गतिशीलता कमी करतो किंवा संपुष्टात आणतो ।ह्या समस्येला लकवा अथवा अर्धांगवायू असे म्हणतात । अर्धांगवायू आर्धे शरीर, संपूर्ण शरीर किंवा फक्त चेहर्या पर्यंत होतो । ह्या समस्येचे मुख्य कारण उच्च रक्तदाबाचे अधिक वाढणे, मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या बनने, अत्याधिक आनंद किंवा दुःखाची स्थिती इत्यादी आहे । यौगिक अभ्यासाने ह्या रोगावर निश्चितच विजय मिळविला जाऊ शकतो । जरी योग ह्या अडचणींचे कायमचे समाधान करत असला, तरी हा वेळ खाऊ आणि श्रमाचा आहे । ह्यामुळे सुरुवातीला औषधांचे सेवन केले पाहिजे आणि बरोबरच योगाचा अभ्यास केला पाहिजे । इथे ह्या हेतु मुख्य यौगिक निदान सादर आहे । सुरुवात सूक्ष्म व्यायामाने करा ह्याचा अभ्यास झोपूनच केला जाऊ शकतो । त्याच्यानंतर जशी-जशी परिस्थिति सुधारत जाईल, अभ्यासामध्ये पवनमुक्तासन, वज्रासन, शशांकासन, मकरासन इत्यादी जोडून घ्या । जेव्हा परिस्थिति आणखी चांगली होईल तेव्हा अभ्यासात जानुशिरासन, सुप्तवज्रासन, त्रिकोणासन, उत्तानपादासन, गोमुखासन आणि अर्धमत्स्येंद्रासन इत्यादी जोडून घ्या । जेव्हा परिस्थिति आणखी चांगली होईल तेव्हा अभ्यासात जानुशिरासन, सुप्तवज्रासन, त्रिकोणासन, उत्तानपादासन, गोमुखासन आणि अर्धमत्स्येंद्रासन इत्यादी जोडून घ्या । इथे जानुशिरासनाच्या सरावाच्या पायर्याा सादर आहेत - दोन्ही पायांना समोरच्या बाजूस पसरुन बसा/दोन्ही पाय पसरुन बसा उजव्या पायाला गुडघ्यात मोडून ह्याच्या तळव्याचा डावा घोटा मांडीला चिकटवा आणि टाच जनेंद्रियाच्या खाली ठेवा । दोन्हीं हातांना उजव्या पायाच्या पंज्याजवळ घेऊन जात असताना समोरच्या बाजूला इतके वाका की डोके जमिनीला स्पर्श करेल । ह्या स्थितिमध्ये आरामदायक अवधीपर्यंत ठेवून परत पूर्व स्थितिमध्ये या । हीच क्रिया दूसरीकडेसुद्धा करा । साइटिका तसेच स्लिप डिस्कच्या रुग्णाने ह्याचा अभ्यास करु नये । बुद्धी आणि केंद्रीय तांत्रिक तंत्राला क्रियाशीलता तसेच तंत्रिका तंत्राला क्रियाशील आणि समतोल करण्यासाठी नाडीशोधन आणि उज्जाई प्राणायाम रामबाणची भूमिका पार पाडते । कंभुक च्याशिवाय ह्याचा अभ्यास योग्य मार्गदर्शनाखाली आपल्या क्षमतेनुसार करा । ह्या समस्येचे मूळ कारण मानसिक तणाव आणि भावनात्मक असमतोल आहे । योगनिद्रा : ह्या समस्येचे मूळ कारण मानसिक तणाव आणि भावनात्मक असमतोल आहे । सगळ्या चिंता, दुख, कष्ट तसेच खेद/शोक आणि भितीपासून मनाला मुक्त करण्यासठी स्मरण सर्वश्रेष्ठ पद्धत आहे । दररोज दहा ते वीस मिनटांपर्यंत ह्याचा अभ्यास अवश्य करा । साधे, सुपाच्य, पौष्टिक आहार खा, कोंड्यासहित पीठाच्या भाकरी, जुने तांदूळ, भरडलेले धान्य, मूगाची दाळ खा । फळ तसेच हिरव्या भाज्यांचे सेवन करा । भारी, जड अन्न, चहा, कॉफी, तंबाकू, अमली पदार्थ व उत्तेजक पदार्थांना वर्ज्य करा । आंबट वस्तूंच्या/पदार्थांच्या सेवनापासून वाचा । नाकाच्या नाकपुड्यांमध्ये रोज सकाळ-संध्याकाळ अक्रोडचे तेल लावा । आंघोळीनंतर रेषेदार टॉवेलने/पंचाने शरीराला वरुन खालपर्यंत पुसा । आंघोळीसाठी गरम पाण्याचा उपयोग करा । नेहमीच्या जीवनात तंत्रविज्ञानाच्या वाढत्या मध्यस्तीमुळे आम्हांला खूप आळशी बनवले आहे । सहध्वनी, महाजालाने जीवन सोपे तर झाले आहे । परंतु ह्याचे तोटेसुद्धा आहेत । एखादा संकेत वा गुपित जर एका टिकटिकच्या अंतरावर असेल तर कोणी आपल्या बुद्धीला का त्रास देईल । परंतु पुढे चालून ह्या सवयी खासकरुन/प्रामुख्याने बुद्धी स्मरण ठेवण्याच्या शक्तीवर/क्षमतेवर दुष्परिणाम करु शकतात । मेंदूचा जेवढा जास्त वापर करु तो तेवढाच तल्लख आणि सक्षम बनेल । ब्रेन एक्सरसाइज/मस्तिष्क कवाईत ह्याच फंड्यावर काम करत आहे । रोजचे सामान्य काम थोडेसे वेगळे केले तर आपल्या मेंदूचा प्रत्येक तो भाग कार्यक्षम होऊ लागेल ज्याचा आधी वापरच केला जात नव्हता । डोळे बंद करुन कपडे बदलणे, कोणता नविन विषय किंवा नविन खेळ शिकणे । विजेचे बटण वरती करण्यासारख्या कामासाठी सरळ हाताऐवजी उलट्या हाताचा उपयोग करणे अशासारख्या पद्धती स्वीकारुन मेंदूच्या बंद खिडक्या खोलू शकतो । कोणतीही गोष्ट तेव्हा बर्यानच काळापर्यंत लक्षात राहते जेव्हा तिच्यावर लक्ष दिले जाते । जे काही लक्षात ठेवायचे आहे त्याला लक्षपूर्वक वाचा आणि पुढे जाण्या आधी आठ सेकंदापर्यंत लक्ष केंद्रित करा । मग पहा कोणतीही वस्तु कशी लक्षात राहत नाही । कोणतीही वस्तु लक्षात ठेवण्याची किंवा शिकण्याची प्रत्येकाची आपली पद्धत असते । काही लोक चांगल्याप्रकारे पाहून शिकणारे असतात । हे ते लोक आहेत जे कोणत्याही वस्तुला बघून किंवा वाचून शिकतात ।/ जे कोणत्याही वस्तुला बघून किंवा वाचून शिकतात हे ते लोक आहेत तेच काही लोक चांगल्याप्रकारे ध्वनी माध्यमातून शिकणारे असतात जे ऐकून शिकतात । तुमच्यासाठी कोणती पद्धत अनुकूल आहे ह्याला ओळखा आणि लक्षात ठेवण्यासाठी त्याचाच उपयोग करा । जरी तुम्ही पाहून शिकणारे (दृक माध्यमातून शिकणारा) असलात तरी लक्षात ठेवण्यासाठी वाचून अभ्यासा । कवितासारखे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर आणखीदेखील चांगले होईल । माहितीला कुठल्याही रंग, सुगंध, चव ह्यांच्याशी जोडून लक्षात ठेवण्याची सवय लावा । नविन माहितीला कोणत्याही जुन्या माहितीशी जोडून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा । कोणत्याही माहितीला शब्द आणि चित्रांच्या माध्यमातून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा । तक्ता, संक्षिप्त रूपात लक्षात ठेवण्यातसुद्धा मदतगार सिद्ध होईल । काही चांगल्या सवयीं लावूनसुद्धा बुद्धीला तल्लख ठेवले जाऊ शकते । नियमित व्यायामाने/कवायतीने मस्तिष्कला जास्त ऑक्सीजन मिळते ज्याच्याने स्मरणशक्ती कमी होण्याचा धोकासुद्धा कमी होत जातो । बरोबरच असे काही रासायनिक स्रावित असतात की जे मेंदूच्या पेशींचा अंत होण्यापासून वाचवतात । तणाव मेंदूला एकाग्र चित्त होऊ देत नाही । जास्त तणावाने हार्मोन/संप्रेरक कॉर्टिसॉल मेंदूच्या अश्वमीनला गंभीर नुकसान पोहचवतात । चांगली झोप घेतल्याने मेंदू टवटवीत राहतो । झोप पूर्ण न झाल्यामुळे दिवसभर थकवा राहतो आणि कोणत्याही कामात लक्ष/मन केंद्रित करणे कठीण होऊन जाते । सिगारेट पिल्याने मस्तिष्कापर्यंत ऑक्सीजन पोहचवणार्याह धमन्या आकुंचन पावतात ।ज्याच्याने मेंदू कमकुवत होऊ लागतो । फळ, भाज्यांचे पुरेशा प्रमाणात सेवन तब्ब्येतीबरोबरच मेंदूसाठी देखील पुष्कळ हितकारी सिद्ध होते । जीवनसत्त्व ब, बी १२, बी ६ फोलिक अॅसिड/आम्लयुक्त खाद्य पदार्थ जसे पालक, हिरव्या भाज्या, स्ट्रॉबेरी, टरबूज-खरबूज सारखे रसदार फळ, सोयाबीन ह्यांच्यापासून स्मरणशक्ती तल्लख होते । नसांना हानी पोहचवणार्या् होमोसिसटीनला हे नष्ट करते । लाल रक्त कणिका बनवण्यामध्ये मदत करतात जे मस्तिष्कापर्यंत ऑक्सीजन पोहचवतात । टमाटो, ग्रीन टी, ब्रोकली आणि ऊसामध्ये विटामिन ई, सी आणि एंटीआक्सीडेंट आढळतात । हे शरीर आणि बुद्धीमध्ये ऑक्सीजनचा प्रवाह वाढवते ज्याच्यामुळे बुद्धीची क्रियाशीलता वाढते । मासे, अक्रोड आणि बदाम खाल्यानेसुद्धा से भी बुद्धी तेज होते । एचआईवीचा अर्थ आहे ' ह्यूमन इम्यूनो डिफिशंसी व्हायरस (मानवाची रोग प्रतिकार शक्ती कमी करणारे विषाणु) एचआईवी शरीराच्या प्रतिरक्षण प्रणालीला आघात पोहचवतो । प्रतिरक्षण प्रणाली आमच्या शरीराच्या आतील असे व्यवस्थांचे तंत्र आहे, जे संक्रमणापासून आमची रक्षा करते । प्रतिरक्षण प्रणाली सुरक्षा तंत्र शरीरात रोगवाहक किंवा 'बाहेरील हल्लेखोरांसारखे व्हायरस, जीवाणू इत्यादींची ओळख करतात आणि त्यांचा अंत करतात । ’एचआईवी’ एक व्हायरस आहे, जे प्रतिकार क्रिया, विशेषकर सीडी४ पेशींवर हल्ला करतात आणि त्यांना नष्ट करतात । सीडी-४ पेशी विभिन्न विकारांनी शरीराच्या बचावास मदत करते । काय होते, जेव्हा एखाद्या व्यक्तीला एचआईवी संक्रमण होते । सीडी-४ पेशींमध्ये घुसून एचआईवी प्रजननाच्याद्वारे आपली संख्या मोठ्या वेगाने वाढवतो आणि ह्या दरम्यान पेशीमध्ये इतके नविन व्हायरस निर्माण होतात । सीडी-४ पेशी खंडित होतात । सीडी-४ कोशिका खंडित झाल्यामुळे अनेक व्हायरस रक्त-प्रवाहामध्ये प्रवेश करतात । ह्याच्यानंतर एचआईवी इतर सीडी-४ पेशींवर हल्ला करतात, आणि ही प्रक्रिया सतत पूर्वोक्त केली जाते । एचआईवी जास्त करुन सीडी-४ पेशींना नष्ट करतात आणि अशाप्रकारे संक्रमित माणसाची प्रतिकार क्रिया नष्ट होते । एचआईवीची तपासणी आवश्य करा । एच आई वी तपासणी सोपी, सुरक्षित तसेच जन आरोग्य केंद्रांवर उपलब्ध आहे । कोणत्याही माणसाला एड्स झाल्यावर निम्न दुष्परिणाम समोर येतात । माणूस सतत आजारी पडू लागतो आणि निरंतर दुर्बळ होत जातो । माणसाला संक्रमण मोठ्या सहजतेने होऊ लागते । प्रतिकार क्षमता कमी झाल्यामुळे हे माणसाला हे संक्रमण मोठ्या सहजतेने दाबून धरते । एड्सच्या बरोबर राहणार्याय लोकांचा विरोध करु नका । एच आई वी आणि एड्सच्या विरुद्ध देशाच्या महायात्रामध्ये सहभागी व्हा । सामुदायिक सेवा केंद्र एच० आई० वी० एड्सच्या संक्रमित तसेच अप्रभावित लोकांसाठी आहे । इथे एच० आई० वी० संक्रमित व्यक्तींची संपूर्ण काळजी व मदत केली जाते, ज्याच्याने प्रभावित कुटुंबातील सदस्य एक प्रतिष्ठित व संपूर्ण जीवन जगू शकतात । सर्वसाधारणपणे पैप मुलींनमध्ये १५ वर्षाच्या वयानंतर होऊ लागतो । आज पोटाच्या आणि छातीच्या अनेक विकारांना दूर करण्यासाठी एक छोटेसे छिद्रच पुरेसे आहे आणि ह्या क्रियेसाठी 'लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया’ किंवा 'की होल’ किंवा 'बटन होल शस्त्रक्रिया’ ह्यानावाने ओळखले जाते । यकृतामध्ये पथरी झाल्यामुळेर यकृत काढून टाकण्यासाठी आंत्रपुच्छमध्ये सूज आल्यावर आंत्रपुच्छ काढून टाकण्यासाठी जठररसव्रण/पेप्टीक अल्सरचा रोग दूर करण्यासाठी श्वास पटलांतर्गला दुरुस्त करण्यासाठी इंग्वाईनल अंतर्गलच्या/हार्निआ उपचारासाठी ह्याच्याशिवाय छातीमधील काही व्याधींनासुद्धा ह्या क्रियेने दूर केले जाऊ शकते । मसलन कर्करोग (पोट), यकृताचे रोग, आतड्यांचा आजार इत्यादी पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत ह्या क्रियेचे अनेक फायदे आहेत । बटन होल शस्त्रक्रियेत रुग्णाला ऑपरेशन नंतरचा त्रास खूप कमी होतो । टाके न लागल्यामुळे रुग्णालयात जास्त दिवस राहण्याची गरज पडत नाही/भासत नाही । बटन होल शस्त्रक्रियेत पोटाच्या आतील अवयवांना इजा होण्याची शक्यता खूप कमी असते । कारण की आतील दृश्य दूरचित्रवाणीच्या पटलावर विस्तारित होऊन दिसते आणि मुळरुपापेक्षा अधिक स्पष्ट दिसते । फक्त चार लहान छिद्र झाल्याकारणाने ह्या जख्मा पिकणे किंवा संक्रमित होण्याचा वाव पुष्कळ कमी होतो । सर्वसाधारण शस्त्रक्रियेच्या नंतर रुग्ण जवळजवळ एक आठवडा बिछान्यात पडून राहतो । अशावेळी त्याला फुफ्फुसदाह/शोषणी फुफ्फुसशोथ होणे, शिरांमध्ये रक्ताच्या गुठळ्या बनणे ह्यांसारख्या गुंतागुंतींचा सामना करावा लागू शकतो । लॅपरोस्कोपिक क्रियेमध्ये ह्या शक्यता नगण्य/क्षुद्र आहेत । लॅपरोस्कोपिक क्रियेमध्ये साधारण चिकित्सकाच्या तुलनेत दुप्पट वेळ लागतो । रोग्याला जास्त भूल देणारे औषध द्यावे लागते, ज्याचे आपले नुकसान आहे । शल्यचिकित्सकाच्या क्षेत्रात 'की होल शस्त्रक्रिया' एक क्रांतीकारी आविष्कार आहे । आणि ह्याच्यापेक्षा जास्तीत जास्त रोगी लाभ प्राप्त करत आहे । एच ।आई ।वी । त्या व्हायरस किंवा विषाणूना म्हणतात, जे माणसाच्या आतील/माणसांमधील आजारापासून वाचवणारी क्षमता कमी करू शकतात । एड्स त्या स्थितीला म्हणतात, ज्याच्यात आजाराशी लढण्याची क्षमता बिलकुल कमी किंवा नष्ट होते । एचआइवी/एड्सचा अजूनपर्यंत कोणताच उपचार नाही ।परंतु ह्याच्यापासून पूर्णपणे वाचू शकतो । एड्सचा पहिला रोगी भारतात १९८६ मध्ये मिळाला/आढळला । १९८६ ते सन २००२ पर्यंत एच ।आई ।वी । बरोबर जगणार्याह लोकांची संख्या जवळजवळ पंचेचाळीस लाख झाली आहे । एड्स ह्यांच्यामुळे पसरतो । असुरक्षित लैंगिकसंबंधामुळे एड्स पसरतो । एच ।आय ।वी संसर्गित रक्त चढवल्याने एड्स पसरतो । न उकळलेली सुई किंवा आधी उपयोगात आणलेल्या सुईच्या वापराने एड्स पसरतो । एच ।आय ।वी संसर्गित आईकडून तिच्या बाळाला एड्स पसरतो । एड्स ह्यांच्यापासून पसरत नाही । स्पर्श केल्याने आपापसातील सरमिसळ/व्यवहाराने एड्स पसरत नाही । बरोबर राहिल्याने किंवा उठल्या बसल्याने एड्स पसरत नाही । बरोबर जेवल्याने, एक दूसर्यारचे कपडे घतल्याने किंवा एकाच स्नानगृहाचा वापर केल्याने एड्स पसरत नाही । एचआयवी विषाणू शरीरातील आजाराशी लढण्याच्या शक्तीला हळूहळू नष्ट करतात । ताप उतरत नाही, अतिसार थांबत नाही, वजन कमी होते । तोंडातील पुळ्या बर्या होत नाहीत आणि औषधे काम करत नाहीत ।/तोंड येणे बरे होत नाही आणि औषधे काम करत नाहीत । कर्करोग, फुफ्फुसदाह इत्यादी आजार जडतात । एचआयवीची तपासणी अवश्य करा । एड्समुळे असे अनेक लक्षण दिसू लागतात की जे एड्स होण्याचा आभास होतो । काही महत्वपूर्ण लक्षणांचा तपशील खाली दिला जात आहे । एक महिन्यापासून सतत ताप येणे । एक महिन्यापासून सतत जुलाब होणे । एक महिन्यापासून सतत खोकला येणे । शरीराचे वजन एकाएकी १० टक्के कमी होणे । तोंडामध्ये सतत जखम किंवा तोंड येणे । शरीरात सतत चट्टे किंवा फोड्या येणे । क्षयरोग ज्याच्यात औषधाचा परिणाम होत नाही । एकापेक्षा जास्त ठिकाणी लाळग्रंथींचा आकारमान वाढणे । स्तनावर किंवा शरीरामध्ये इतर अनेक गाठी किंवा सूज । एड्सपासून रक्षण तसेच त्याचा प्रचार विस्तार असे अनेक आजार आहेत ज्यांचा उपचार नाही । पौष्टिक आहार आणि स्वस्थ जीवनशैली स्वीकारा । धूम्रपान, मद्यपान, नशीली औषधांचे सेवन करु नका । तन-मन दोन्हीं प्रसन्न राहतील । शारीरिक स्वच्छतेवर लक्ष द्या । फक्त सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा । रुग्णालयात एचआयवीबरोबर जगणार्यार लोकांना वेगळे करणे/ किंवा उपचार न करणे अपराध आहे । एचआयवीबरोबर जगणार्याब लोकांची गुप्तता राखून ठेवणे अनिवार्य आहे । एचआयवीबरोबर जगणार्याब लोकांना आणि त्यांच्या कुटूंबियांना सल्ला/मार्गदर्शन देणे आवश्यक आहे । चिकित्सकाला/डॉक्टरला सगळे रुग्ण समान आहेत तर दूजाभाव कसा एचआयवी/एड्स संसर्गरोग नाही । संसर्गित व्यक्ती १०-१५ वर्षापर्यंत सामान्य जीवन जगतात । संसर्गित व्यक्तीबरोबर भेदभाव अत्याचार आहे, आणि हमारी अनभिज्ञताचा/अजाणतेपणाचा संकेत । कार्यालय, घर, मित्र ह्यांच्यामध्ये त्यांच्याबद्दल पहिल्यासारखीच वागणूक असली पाहिजे । भारतात दृष्टिहीनांचा व्यापकता दर १ ।४ टक्के आहे, ह्या व्यापकता दराला ० ।३ टक्क्यावर आणण्यासाठी भारत सरकारद्वारे वर्ष १९७६ मध्ये राष्ट्रीय दृष्टिहीनता निवारण कार्यक्रमाचा आरंभ केला गेला । आंधळेपणाचे मुख्य कारण म्हणजे मोतीबिंदू आहे । जे एकुण अंधत्वाचे जवळजवळ ५५ टक्के आहे । राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमाच्या अंतर्गत दृष्टिहीन व्यक्तींसाठी खासकरुन मोतीबिंदूने ग्रासलेल्यांना शस्त्रक्रियेद्वारा ऑपरेशन करुन लाभांवित केले जात आहे । मोतीबिंदू ऑपरेशनच्या गुणवत्तेवर विशेष ध्यान दिले जात आहे । ज्याच्यासाठी सगळ्या जिल्हा चिकित्सालयामध्ये चांगल्या चिकित्सालयाला माइक्रस्कॉपिक केंद्रामध्ये परिवर्तित केले जात आहे । आंधळेपणाचा व्यापकता दर कमी करण्यासाठी शिक्षा सत्राच्या सुरुवातीला १०-१४ वर्षाच्या शाळातील विद्यार्थ्यांच्या नेत्र परीक्षणाचा कार्यक्रम मोहिमेच्या रुपात चालवला जात आहे । तसेच दृष्टि दोषाने ग्रासलेल्या गरीब विद्यीर्थ्यांसाठी विनामूल्य चष्मे विकले जात आहेत । नेत्र परीक्षण कार्यक्रमामध्ये सगळ्या सरकारी, गैरसरकारी ऐच्छिक संस्थांचा सक्रिय सहभाग घेतला जात आहे । आंधळेपणाचा व्यापकता दर कमी करण्यासाठी भारत सरकारद्वारे नेत्र विभागाशी संबंधित कर्मचार्यांवना विविध स्तरावर प्रक्षिशिण दिले जात आहे । आंधळेपणाचे मुख्य कारण म्हणजे मोतीबिंदू ५५ टक्के आहे, दृष्टि दोष १९ टक्के, काळा मोती ४ टक्के कॉर्नियल पैथॉलाजी ७ टक्के, अन्य 15 टक्के, आहेत । जेव्हा साधारण स्वच्छ लेंस किंवा त्याच्या कॅपस्यूल अंधक किंवा दुधाळ होतात ज्याच्यामुळे उजेड डोळ्याच्या आतमध्ये पोहचू शकत नाही । अशावेळी रुग्णाला अंधक किंवा कमी दिसू लागते । मोतीबिंदूने गांजलेल्या रोग्यांची ओळख करुन चिकित्साधिकारी तसेच नेत्र सहाय्यक आपल्या चिकित्सालयात/क्षेत्रामध्ये स्क्रीनिंग करतात । तत्पश्चात/त्यानंतर मोतीबिंदूवाल्या रुग्णांना सुसज्जित रुग्णालयात नेत्र शल्यकद्वारे शस्त्रक्रिया केली जाते । ६ आठवड्यानंतर चष्म्याची तपासणी केली जाते । जिल्हा अंधत्व निवारण समित्यांद्वारे व्यापक प्रचार प्रसार करुन सरकारी, गैरसरकारी खाजगी तसेच ऐच्छिक संस्थांच्या माध्यमातून शिविर लावले जातात । मोतीबिंदूचा उपचार केवळ शल्य चिकित्सेद्वारेच संभव आहे । इन्ट्रा कॅप्सूलर कॅटरेक्ट एक्सट्रेक्शन कार्यामध्ये पूर्ण लेंस कॅपस्यूल काढले जाते । शस्त्रक्रियेनंतर तपासणीच्या उपरांत चष्म्याचा प्रयोग केला जातो । शस्त्रक्रियेच्या दरम्यान लेंस प्रत्यारोपण डोळ्याचा पुढील भाग, नेत्रपटलाच्या समोर केले जाते । इक्स्ट्रा कॅनसूलर कॅटरेक्ट एक्सट्रेक्शन कार्यामध्ये समोरील कॅपस्यूलचा भाग किंवा पूर्ण लेंस मॅटर काढून घेतले जाते । आणि मागील कॅपस्यूल सुरक्षित सोडून दिला जातो । कॅपस्यूलर वैग मध्ये लेंस बसवले जातात । कार्यामध्ये ६ मिमी ।ची एक टनल बनवली जाते । बाकी कार्य च्या सारखे होते । कार्यामध्ये टाके लावले जात नाही । काळ्या मोतीबिंदूमध्ये बिंदू नेत्र तंत्रिका हळूहळू नष्ट होते । डोळ्यांमध्ये पाण्याचा दबाव जास्त असल्यामुळे किंवा नेत्र तंत्रिकामध्ये रक्त पुरेशा प्रमाणात न पोहचल्यामुळे असे होते । काळ्या मोतीबिंदूपासून होणार्याा अंधत्वाला थांबवले जाऊ शकते ।जर ह्याची लवकर माहिती मिळाली । तर ह्याचा नियमित उपचार व तपासणी होत राहिल । जेव्हा डोळ्यामध्ये अतिरिक्त दबाव जास्त असेल जर कुटूंबात कोणाला काळा मोतीबिंदू असेल अधिकांश रुग्णांमध्ये डोळ्यातील पाणी जाण्याचा भाग मोकळा असतो परंतु काही कारणाने पाणी कमी जाते । आतील दबाव वाढला जातो ।आणि नेत्र तंत्रिका नष्ट होते, हळूहळू रुग्ण आजूबाजूच्या वस्तुंना पाहू शकत नाही, जर वेळेवर उपचार केला नाही तर दृष्टीसुद्धा जाऊ शकते । ज्यांचे प्रमुख लक्षण समोर आल्यावर रुग्णाला डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली पाहिजे । उजेडात इंद्रधनुष्यासारखे रंगीत गोळे दिसून येणे । विशेष लेंस किंवा यंत्राद्वारे नेत्र तंत्रिकाची तपासणी करुया की किती हानी पोहचली आहे । फिल्ड टेस्ट ज्याच्यामध्ये समोर बघताना बाजूच्या वस्तु बघण्याच्या क्षमतेची तपासणी होते । एक विशेष लेंसद्वारे पाणी बाहेर जाण्याच्या भागाला बघू शकतो । प्रशिक्षण तपासणी केंद्राची सूची जिथे काळ्या मोतीबिंदूचे प्रशिक्षण केले जाऊ शकते । जीवनसत्त्व अ च्या कमीने कॉर्नियल कमकुवत तसेच जखम होते । ज्याच्याने शेवटी अंधत्व येते । जीवनसत्त्व अ ची कमी खसरे तसेच कुपोषणच्या स्थितीमध्ये आणखी जास्त होते । जीवनसत्त्व अ च्या कमीने रातआंधळेपणा होऊ शकतो, खाण्यामध्ये जीवनसत्त्व अ च्या मात्राची कमी सतत जुलाब तसेच कुपोषणामध्ये जीवनसत्त्व अ ची व्यग्रता कमी होणे । खसरे च्यावेळी व नंतर जीवनसत्त्व अ ची मागणी अधिक होणे । कमी उजेडात दिसून येते । श्वेत पटल कोरडा होतो । बिटोटस स्पोटस - श्वेत पटलाचे श्वेत दाग दिसून येतात । रातआंधळेपणापासून वाचण्यासाठी चौलाई चण्याचा साक, मेथीचा साक, पालक, कोबी, खोथंबीर, गाजर पपई आंबा इत्यादीचे सेवन । आईला दूधासाठी प्रोत्साहित करणे । गोवरची लस वेळेवर देणे/टोचणे । जीवनसत्त्व 'अ' चा खुराक (१ लाख आई ।यू ।) गोवरच्या लसीकरणाच्यावेळी तसेच ३ वर्षापर्यंत (२ लाख आई । यू ।) ३ महिन्याच्या अंतरावर द्यावे । मुलांना पौष्टिक आहार देण्याची आवश्यकता आहे, कारण की कुपोषणामुळे होणार्याा पारपटल अंधत्वापासून वाचवले जाऊ शकते । रूबेलामुळे होणारे कन्जानाईटल कॅटरेक्टसाठी वेळेवर लसीकरण करण्याची आवश्यकता आहे । डोळ्यामध्ये इजा झाल्यामुळे जवळजवळ २०-४० टक्के मुलें एका डोळ्यानी आंधळे होतात । डोळ्याच्या सुरक्षेबद्दल लोकांना शिक्षित करण्याची आवश्यकता आहे ।कारण फटाके, औद्योगिक अपघात आणि ट्रॅफिक अपघातामुळे होणार्याि/येणार्या अंधत्वापासून वाचवले जाऊ शकते । रोहों पासून डोळ्यांच्या रक्षणासाठी पर्यावरणाच्या सफाई यंत्रणेकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे । तसेच उपचार वेळेवर करण्याची गरज आहे । हळूहळू तसेच न दुखता एक किंवा दोन्हीं डोळ्यांमध्ये एक महिना किंवा वर्षामध्ये दृष्टित हळूहळू कमी येणे । करडा किंवा सफेद पुतळी (प्यूपिल) होणे । जेव्हा प्रकाश दृक-पटलावर पडत नाही । एक तर तो दृक-पटलाच्या पुढे किंवा दृक-पटलाच्या मागे पडतो । जेव्हा प्रकाशाची किरणे दृक-पटलाच्या आधी एकत्रित होतात । अधिकांश रुग्णांमध्ये डोळ्यातील पाणी जाण्याचा भाग मोकळा असतो परंतु काही कारणाने पाणी कमी जाते । आतील दबाव वाढला जातो ।आणि नेत्र तंत्रिका नष्ट होते, हळूहळू रुग्ण आजूबाजूच्या वस्तुंना पाहू शकत नाही, जर वेळेवर उपचार केला नाही तर दृष्टीसुद्धा जाऊ शकते । ज्यांचे प्रमुख लक्षण समोर आल्यावर रुग्णाला डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली पाहिजे । रुग्ण जवळील वस्तु विघ्नरहित बघू शकतात परंतु लांबच्या वस्तू पाहण्यास त्रास होतो । रुग्ण वस्तुंना पाहण्यासाठी डोळ्याच्या जवळ आणतात । वर्गामध्ये विद्यार्थी काळ्याफळ्याच्या अगदी जवळ बसण्याचा प्रयत्न करतात । जेव्हा प्रकाशाची किरणें दृक-पटलाच्या मागे एकत्रित होतात ।हे जास्त तर तरुण मुलांमध्ये पाहिल्या जाते । डोकेदुखी डोळ्यात जडपणा वाचण्यास त्रास डोळ्याच्या मासंपेशींच्या कमकुवतपणामुळे लेंस आपला आकार बदलू शकत नाही वाचताना किंवा जवळील काम करताना प्रकाशाची किरणे दृक-पटलाच्या मागे पडतात । हे ४० वर्ष आणि त्याच्यापेक्षा अधिक वयामध्ये आढळून येते । लांबून वाचणे लिहिणे व कोणतेही जवळील काम करताना अस्पष्टपणा । जर कोणत्याही प्रकाशाची किरणे डोळ्याच्या पडद्याच्या समोर किंवा मागे एका बिंदूवर केंद्रित होत नाही ज्याच्यामुळे अस्पष्ट दिसते । दूर किंवा जवळचे पाहण्यात अस्पष्टता, डोके दुखणे, डोळे लाल होणे । वृत्तचितीच्या आकाराचा चष्मा सतत घालायचा आहे । कर्करोग एक जीवनशैलीतून उत्पन्न होणारा आजार आहे । कर्करोग आपल्या चुकीच्या आचार, विचार व्यवहार आणि आहारातून उत्पन्न होतो । अधिक सिगरेट पिल्याने फफ्फुस, श्वास नलिकेंचा कर्करोग अधइक होतो । जसे - जसे आपण प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होत आहोत आणि संक्रमित रोगांपासून सुटलो । तसे-तसे आपल्या जीवनशैलीतील बदलावामुळे कर्करोग व ह्दयरोग ह्यांच्या संख्येत वाढ होत आहे । जपानमध्ये हा आजार नंबर एक वर आहे । विकसित देशांमध्ये हा आजार दूसर्याढ नंबरवर, आणि विकासशील देशांमध्ये हा तिसर्या नंबरवर आहे । भारतात आठमधील एक व्यक्ती आपल्या वयात कधी ही कर्करोगाने त्रस्त होऊ शकतो । आपल्या देशात जीवनशैली, परंपरा, धर्म विविध असल्याकारणाने हा आजार वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रकारे आढळला जातो । देशातील सगळ्या आकड्यांचे आकलन करुन पाहिले आहे शहरात ४० टक्के स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग आणि स्तन कर्करोग आढळतात । ग्रामीण स्त्रिया ह्या दोन्हीं ६० ते ६५ टक्क्याच्या आत आहेत । पुरूषांमध्ये धूम्रपान आणि प्रदूषणाने फुफ्फुसाचा व श्वासनलिकेचा कर्करोग अधिक आढळतो तसेच गुटखा, पान पराग, खैनी, सुरतीमुळे तोंड व पोटाचा कर्करोग होण्याची अधिक संभवना/शक्यता आहे । कर्करोग काय आहे ? कर्करोग एका आजाराचे नाव आहे । कर्करोगामध्ये शरीरातील पेशी आपोआपच गुणात्मक पद्धतीने वाढ करतात आणि शरीराच्या नियमांना न पाहिल्यासारखे करतात । पेशी शरीराच्या दूसर्याख भागामध्ये सुद्धा पोहचते । पेशी एक ग्रंथी किंवा जखमेचे रूप घेते, आणि आपल्या संर्पकात येणार्या सगळ्या तंत्रांना नष्ट करुन टाकते । कर्करोग १००० पेक्षा अधिक आजारांचा एक समूह आहे । जरी प्रत्येक आजार एक दूसर्याधपासून अगदी भिन्न असतात, परंतु मूलतः सगळे कर्करोग शरीराच्या काही कोशिकांमध्ये अव्यवस्थाच्या परिणामस्वरुप असतात । सामान्यतः सुसाध्य अर्बुदाला शल्य चिकित्साद्वारे काढले जाते आणि ह्यांची पुन्हा होण्याची शक्यता/संभवना नसते । असाध्य अर्बुद कर्करोग असतात । असाध्य अर्बुद जवळचे ऊतक आणि अंग ह्यांना नष्ट करतात । कर्करोगाच्या पेशी शरीराच्या इतर भागामध्ये पसरु शकतात किंवा रोगव्यापी करु शकतात,ज्यामुळे नविन अर्बुद निर्माण होऊ शकतात । कारण की कर्करोग पसरु शकतो, ह्यामुळे आवश्यक आहे की चिकित्सकाने झटकन शोधून काढले पाहिजे की अर्बुद बनले आहे, आणि हा कर्करोग आहे । कर्करोग आहे हे कळताच ह्याचा इलाज सुरु करता येतो । कर्करोगामुळे असे अनेक लक्षण दिसून येतात जे कर्करोग असल्याचा आभास देतात । काही महत्वपूर्ण लक्षणांचे विवरण खाली दिले जात आहे । कर्करोगामुळे असे अनेक लक्षण दिसून येतात जे कर्करोग असल्याचा आभास देतात । कोणतीही जखम जी अधिक काळापासून भरलेली नाही । छातीवर किंवा शरीरामध्ये इतर कुठेही गाठ किंवा सूज । शरीराच्या कोणत्याही भागातून किंवा अंगातून असामान्य रूपाने रक्त किंवा लस येणे । सतत अधिक काळापर्यंत खोकला येणे किंवा आवाज जड होणे/आवाज बसणे । अन्न गिळताना किंवा शौचास त्रास होणे, सतत अपचन किंवा बद्धकोष्ठता असणे । आतड्यांच्या सामान्य सवयीमध्ये बदल । तीळ किंवा मसाचा आकार, रंग किंवा रुपात अचानक बदल । तसे, असे लक्षण केवळ कर्करोगामुळेच निर्माण होत नाही, ह्यांचे अनेक कारण सुद्धा असू शकतात । ह्यामुळे ह्यांना पाहताच कर्करोग मानले नाही पाहिजे । दोन आठवड्यापर्यंत हे लक्षण राहिल्याने ह्यांना चिकित्सकाला दाखवा । ह्याच्यात कोणतीच शंका नाही की भारतामध्ये आढळणारे बहुतेक कर्करोग (६०-७० टक्के) रोगांची ताबोडतोब ओळख संभव आहे । आवश्यकता आहे, ह्याच्या बद्दल माहिती वाढवण्याची तसेच प्रत्येक व्यक्तीला आपली स्वतःची काळजी घेण्याची । कर्करोगाची ताबोडतोब ओळख करुन, ६०-७० टक्के कर्करोग रुग्णांना मुळापासून ठीक करणे आता संभव आहे । एवढेच नाही तर ताबोडतोब ओळख आणि झटकन उपचाराचे मूल्यसुद्धा उशीरा उपचाराच्या तुलनेत खूप कमी आहे । कर्करोगाच्या लक्षणांपासून सतर्क होण्याशिवाय सगळ्या स्त्रियांनी आणि पुरूषांनी नियमितपणे आपली तपासणी केली पाहिजे । सामान्य परीक्षणाद्वारे काही प्रकारच्या कर्करोगांची ओळख कुठल्याही चिन्हाच्या दिसून येण्या आधीच केले जाऊ शकते । कुठल्याही चिन्हाच्या दिसून येण्या आधीच चिकित्सक मुख, स्तन, गर्भाशयग्रीवा(सर्विक्स) त्वचा, मोठे आतडे, मलाशय, पुरस्थ-ग्रंथी (प्रोटेस्ट), अंडकोश(टेस्टिकल) इत्यादी कर्करोगांचा शोध लावू शकतात । ग्रीवाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये होणारा एक सर्वसामान्य कर्करोग आहे । भारतात स्त्रियांमध्ये होणारा एकुण कर्करोगांमध्ये ४० टक्के कर्करोग गर्भाशयग्रीवाचे असतात । लाळ ग्रंथी, लाळ धमनीद्वारे एक दूसर्यासशी जोडलेल्या असतात ।आणि एक सफेद पातळ द्रव बनवतात जीला लसीका म्हणतात । लसीका धमनींचे जाळे रक्त धमनींसारखे पूर्ण शरीरामध्ये पसरलेले असते । लसीका ग्रंथी कर्करोग पेशींना चाळून आपल्यापर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतात । कर्करोग वाढल्यावर तो असे करु शकत नाही आणि लसीकाद्वारे कर्करोग शरीराच्या एका भागातून दूसर्याव भागापर्यंत पसरु लागतो । ह्या कारणांमुळे शल्यचिकित्सक सर्वसाधारणपणे गर्भाशयग्रीवाच्या आजूबाजूच्या लसीका ग्रंथींनासुद्धा काढून घेते । गर्भाशयग्रीवाचा कर्करोग रक्त प्रवाहाद्वारे सुद्धा पसरु शकतो । त्वचेमध्ये खासकरुन तीळ व मस कुठल्याही प्रकारची नविन वाढ किंवा बदलासाठी नियमितपणे तपासणी करावी । कोणत्याही बदलास लगेच चिकित्सकाला दाखवा । सामान्य चिकित्सा तपासणीच्या दरम्यान चिकित्सकाला व्वचाची सुद्धा तपासणी केली पाहिजे । मोठी आतडी आणि मलाशयच्या कर्करोगाचा लवकर शोध लावण्यासाठी नियमित चिकित्सक तपासणी करणे महत्त्वपूर्ण आहे । मलाशयाची तपासणी करण्यासाठी चिकित्सक हातमोजा घातलेले बोट मलाशयात टाकून, रोगाचे निदान लावू शकतात । ५० वर्षाच्या वयानंतर, प्रत्येक व्यक्तीची वार्षिक तपासणी आवश्यक आहे । मोठ्या आतड्याच्या कर्करोगामुळे मलाबरोबरच रक्त येऊ शकते । निश्चित निदानासाठी विस्तृत तपासणी आवश्यक आहे ५० वर्षाचे आयुष्य पार करणार्या व्यक्तीचे मलाशय आणि मोठ्या आतड्यांची तपासणी करण्यासाठी चिकित्सकाला ३ ते ५ वर्षाच्या अवधीमध्ये अवग्रहाभ (मलाशयाची द्विनेत्री तपासणी) केली पाहिजे । चिकित्सकाद्वारे पुरःस्थ ग्रंथिच्या कर्करोगाचा प्राथमिक स्थितीमध्ये शोध लावण्याची अत्यंत विश्वसनीय पद्धत चढलेल्या बोटांचे परिक्षण आहे । ४० वर्षापेक्षा जास्त आयुच्या सगळ्या व्यक्तींची वार्षिक तपासणी आवश्य केली गेली पाहिजे । वार्षिक तपासणी अवश्यक पुरःस्थ ग्रंथीमध्ये अनियमित किंवा असामान्य कठोर क्षेत्राचा शोध लागू शकतो । आणि माहिती केली जाऊ शकते की हा अर्बुद आहे की नाही । अंड ग्रंथीच्या कर्करोगाचा शोध जास्त तर माणूस स्वतः करु शकतात । प्रत्येक मास स्वतः तपासून पुरुष आपल्या अंड ग्रंथींमध्ये परिवर्तनाचा शोध लावू शकतात । गरम पाण्याने आंघोळ करताना किंवा त्याच्यानंतर, जेव्हा अंडकोश शिथिल असते, त्याच्या तपासणीची सर्वात चांगली वेळ असते, कारण की ह्या परिस्थितीमध्ये कोणत्याही परिवर्तनाचा सहजतेने शोध लावला जाऊ शकतो । अंड ग्रंथीच्या स्वंय परीक्षणाने जर सूज, गाठ किंवा कोणत्याही इतर प्रकारच्या दोषांचा, खासकरुन अंड ग्रंथीला स्पर्श केल्याने असामान्य वेदना, वेदना किंवा मोठेपणा जाणवत असेल तर चिकित्सकाला दाखवले पाहिजे । चिकित्सकाद्वारे अंड ग्रंथींची तपासणीसुद्धा व्यक्तीच्या नियमित वार्षिक चिकित्सक तपासणीचा भाग असला पाहिजे । तोंडाच्या कर्करोगाच्या चिन्हांसाठी तोंडाची नियमितपणे तपासणी आवश्यक आहे । तोंडाच्या ऊतकांचे परिवर्तन कर्करोगाची प्राथमिक स्थिती होऊ शकते । तोंडाच्या ऊतकांच्या परिवर्तनाला सहजपणे पाहिले आणि अनुभवले जाऊ शकते । दंत चिकित्सकाने प्रत्येक रूग्णाच्या तोंडाची संपूर्ण पणे तपासणी करावी । हिरड्या, ओठ आणि गाल ह्यांच्या रंगात होणार्या परिवर्तनावर लक्ष दिले गेले पाहिजे । खुरण्ड (खपली) भेग, सूज, रक्त स्त्राव तोंडाच्या कोणत्याही भागामध्ये गाठ किंवा लाळ ह्यांबद्दल विशेष लक्ष दिले पाहिजे । चिकित्सक किंवा दंतचिकित्सकाकडे जाऊन तपासणी अवश्य करुन घ्या । जर तुम्ही तंबाखू, पान, पानमसाला किंवा जर्द्याचे सेवन करत असाल तर तपासणी करणे आवश्यक आहे । तुम्ही स्वतः सुद्धा आरशात तुमचे स्वतःहाचे तोंड बघू शकतात आणि कोणतेही परिवर्तन दिसू लागताच चिकित्सकाचा सल्ला घेऊ शकता । सगळ्या महिलांना स्तनाचा स्वतः परीक्षणाचा ढंग जाणून घेतला पाहिजे । आणि प्रत्येक महिन्याला आपल्या छातीचे स्वतः परीक्षण केले पाहिजे । मासिकस्त्राव अवधीच्या काही दिवसानंतर स्तनांचे परीक्षण करणे योग्य असते । जेव्हा स्तन मोठे किंवा दुखण्याची शक्यता अजिबात नसते । मासिकस्त्राव बंद झाल्यावर सुद्धा स्त्रियांनी प्रत्येक महिन्याला स्वतः परीक्षणासाठी एक दिवस (कधी ही) नियुक्त केला पाहिजे । ४० वर्षापेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांसाठी हे परीक्षण खासकरुन महत्त्वपूर्ण असते । ४० वर्षापेक्षा जास्त वयामध्ये स्तन कर्करोगाचा धोका वाढतो । जर कोणत्याही स्त्रीच्या स्तनात गाठ किंवा कोणत्याही प्रकारच्या परिवर्तनाचा आभास होतो तर तिला चिकित्सकाशी संर्पक केला पाहिजे । स्तनाच्या जवळजवळ ८० टक्के गाठी कर्करोग नसतात । परंतु एक चिकित्सकच ह्याची बरोबर ओळख करु शकतो । स्त्रियांची चिकित्सक तपासणी करता वेळी स्तनामध्ये गाठ किंवा स्तन खूप मोठे झाल्यासारखे अशा कोणत्याही असामान्य परिवर्तनाची तपासणी आवश्य केली गेली पाहिजे । स्तनाचा मैमोग्राम अर्थात एक्सरे/क्ष-किरण अर्बुद किंवा परिवर्तनाचा शोध लागला जातो । ज्याच्याने एक चिकित्सक सावधगिरीने तपासणी करुन सुद्धा पकडू शकत नाही । ४० वर्षाच्या वयानंतर प्रत्येक स्त्रीला १ ते २ वर्षाला मैमोग्राम केला पाहिजे । स्त्रीचे वय ५० वर्ष झाले तर प्रत्येक वर्षी मैमोग्राम करणे आवश्यक आहे । ज्या महिलांच्या आईंना, बहिणींना, मावश्या इत्यादींना कर्करोग आहे त्यांना २५-३० वर्षाच्या आयुपासूनच वार्षिक स्तनाची तपासणी तसेच मैमेग्राफी केली पाहिजे । कर्करोगाची तपासणी विकृतीशास्त्र परीक्षणाद्वारे केली जाते । एफ । एन । ए । सी ।, बायोपसीच्याद्वारे ह्या पेशींना सूक्ष्मदर्शकयंत्रामध्ये पाहिले जाते । इतर चाचणीनेसुद्धा कर्करोगाचा शोध लावला जाऊ शकतो । जसे एक्सरे, सी । टी । स्कॅन, एम । एम । आर ।, अल्ट्रासाउड प्रशिक्षण तपासणी केंद्राची सूची जिथे कर्करोगाचे प्रशिक्षण केले जाते । शल्य चिकित्सक कर्करोगाच्या चरणावर निर्भर असते । जर कर्करोग मर्यादित आणि प्राथमिक चरणात आहे तर प्रभावित क्षेत्राच्या बरोबर काही सामान्य क्षेत्रामध्ये सुद्धा हटवले जाते । प्रयत्न केला जातो की कर्करोगाचा कोणताही कण राहता कामा नये । जर कर्करोगाने इतर क्षेत्रांमध्येसुद्धा प्रवेश केला आहे तर कर्करोगाचा आकार कमी करण्यासाठी त्याच्यापासून निर्माण होणार्याय त्रासाला कमी करण्यासाठी शल्य चिकित्सा केली जाते । क्ष-किरणाद्वारे कर्करोग पेशींना जाळले जाते । रेडियों धर्मीच्या आधी कर्करोगाचे क्षेत्र, फैलाव रुग्णाची क्षमता, कर्करोगाच्या आधारावर क्ष-किरणाची वेळ, चरण, क्षेत्र शक्ती ह्यांचे आंकलन केले जाते । पुन्हा व्वचावर चिन्ह लावले जाते । क्ष-किरणाच्या दरम्यान कोणत्याही दुसर्या व्यक्तीचा त्या खोलीमध्ये प्रवेश वर्जित आहे । रेडियों धर्मी क्ष-किरणापासून कोणताच त्रास होत नाही । कधी-कधी व्वचा लाल होऊ शकते किंवा रुग्णाला उल्टी होऊ शकते । औषधांद्वारे काही कर्करोगाला पूर्णपणे ठीक केले जाऊ शकते जसे रक्ताचा कर्करोग आणि गाठींचा कर्करोग हे औषध कर्करोग पेशींना नष्ट करतात । सामान्य पेशीसुद्धा ह्या औषधाने प्रभावित होऊ शकतात । पेशींच्या प्रभावित होण्यामुळे रुग्णाचे केस, नख पडू शकतात । रक्त कमी होऊ शकते ज्याच्यामुळे थकवा जाणवतो । जर रुग्ण नियमित सायकल, बरोबर प्रमाणात औषध घेतले आणि स्वास्थ्य आहार खाल्ला तर पूर्णपणे ठीक होतो । उपचाराच्यावेळी सतत रक्ताची तपासणी केली पाहिजे, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ जेवण घेतले पाहिजे । कोणत्याही आजारी व्यक्तीबरोबर बसले नाही पाहिजे कारण की औषधांनी प्रतिरोधक शक्ती बरीच कमी होते । कर्करोगाच्या नाईलाज रुग्णांना पेलियेटिव केअर मध्ये ठेवले जाते ।ज्याच्यामुळे त्याच्या शारीरिक, मानसिक, त्रास कमी करता येतो । रुग्णालयातील यादी जिथे कर्करोगाच्या उपचाराची सोय आहे । कर्करोगापासून संरक्षण तसेच जागरूकता । तंबाखू व तंबाखूंशी संबंधित वस्तूंपासून संरक्षण किंवा परित्याग/प्रदूषण नियत्रंण । शुद्ध साधारण शाकाहारी आहार, प्रत्येक दिवशी ताज्या हिरव्या पालेभाज्या व ताज्या फळांचे सेवन करा । प्रत्येक दिवशी कमीत कमी आर्धा तास व्यायाम/वेगात चालणे/खेळणे । अधिक मिरची तळलेले, भाजलेले, मांस, तूप, दारु ह्यांमध्ये कमी करणे १८ वर्षाच्या आधी शारीरिक संबंध बनवू नका । आपल्या जोडीदाराबद्दल एकनिष्ठ राहणे/जनन अंगांना स्वच्छ ठेवणे । बालकाला बर्यारच काळापर्यंत आपले दूध पाजणे । संभोगच्यावेळी निरोधचा वापर करा । समाजात जागरुकता धूम्रपान व तंबाखुपासून होणार्याय नुकसानाची महिती द्या । स्वतःला स्वच्छ ठेवण आणि वाईट सवयींपासून दूर ठेवणे । सरकारी व गैर-सरकारी विभाग समाजिक संस्था ग्रामीण व शहरी जीवनशैलीला सुधारण्यासाठी प्रेरित करणे । स्तन व मुख ह्यांची तपासणी करण्यासाठी माहिती देणे व ३५ वर्षांनंतर वर्षातून एकदा आपल्या आरोग्याची तपासणी करून घेणे । बालवाडी कार्यकर्तीला कर्करोगासंबंधी लक्षणे व स्व स्तन, मुखाची तपासणी, संरक्षणसंबंधी माहिती दिली गेली आहे । कनिष्ठ विद्यालयात कर्करोग, त्याची लक्षणे, तंबाखुचे तोटे, स्व-स्तन संरक्षणासंबंधी माहिती दिली गेली आहे । कर्करोग नोंदणीकृत राज्याच्या सर्व चिकित्साकेंद्रांत अधिक्षकाने बेस रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, वैद्यकीय विद्यालय व खाजगी रुग्णालय ह्यांना एक कर्करोग रजिस्ट्रार बनवायला सांगितले आहे । कर्करोग नोंदणी कार्यालयात ते आपल्या बाह्य विभागात आलेले कर्करोगीची नोंदणी करतील व प्रत्येक महिन्यात हा अहवाल महानिदेशालयात पाठवतील । कर्करोग नोंदणी कार्यालयात आपल्याला कळेल की राज्यात कर्करोगाने पीडित व्यक्तिंची संख्या किती आहे व कोणत्या विभागात कोणता कर्करोग जास्त प्रमाणात आढळतो । कांजण्या (चिकन पॉक्स/व्हॅरिसेला) कांजिण्या ह्या विषाणूजन्य आहेत ज्या वेरिसिला (व्ही । जेड । व्ही ।)च्या संपर्कातून होतात । ताप व संपूर्ण शरीरावर विशिष्ट प्रकारच्या पुटकुळ्या येणे ही कांजिण्यांचे लक्षणे आहेत । हवेतील निहित थेंबांद्वारे विषाणू सामान्यपणे एका व्यक्तिकडून दुसर्याल व्यक्तिमध्ये पसरतो । कांजिण्या झालेल्या व्यक्तीच्या खोकल्याने किंवा शिंकल्याने सभोवतालच्या परिसरात शिंतोडे उडाल्याने हा आजार पसरतो । कांजिण्या किंवा हर्पिसच्या थेट संर्पकाद्वारे सुद्धा हे पसरु शकतो । कारण की ओल्या जखमेत संसर्गजन्य द्रव असते । काही गोष्टीत हे संसर्गित गर्भवती आईकडून तिच्या न जन्मलेले किंवा नवजात शिशुलासुद्धा लागू शकते । पुटकुळ्या येण्याच्या आधी काही दिवसापर्यंत आणि सगळ्या जखमांवर खपली तयार होण्याच्या आधीपर्यंत म्हणजे त्याच्या सुकण्यापर्यंत कांजिण्या सर्वाधिक स्पर्शजन्य असतात जे बहुधा चट्ट्यांना आरंभ होण्याच्या एक अठवड्यानंतर होतात । ताप, अंग थरथरणे, ओकारी आणि उल्टी सगळ्यात स्वच्छ और सुविख्यात लक्षण आहे हे पुटकुळ्या आणि अत्यंत खाजयुक्त चट्टे येणे । जास्त प्रमाणातील मुलांना २००-३०० पुटकळ्या निघतात ज्यानंतर खपली किंवा पापुद्रा बनतो । कांजिण्या मुलं आणि मोठ्या, पुरूष आणि महिला ह्या दोघांनाही होऊ शकतात । जास्त प्रमाणातील लोक लहानपणी किंवा किशोरावस्थाच्या दरम्यान कधी ना कधी कांजिण्यांचा शिकार होतात । परंतु अगोदर कधी कांजिण्या न झालेल्या प्रौढ जर अशा केसीच्या संपर्कात येतात तर त्यांना संसर्गाचा धोका असतो व प्रौढावस्थेत त्यांना कांजिण्या होऊ शकतात । मुलांच्या तुलनेत कांजिण्या किशोर आणि वयस्कर ह्यांमध्ये अधिक गंभीर असतात । ताप हा अधिक जास्त काळ रहातो । संक्रमित व्यक्तिंना शाळा किंवा कामापासून दूर ठेवल्याने विषाणुंचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत मिळते परंतु लक्षीकरण हा कांजण्यांच्या त्रासापासून वाचण्याचा एक प्रभावी उपाय आहे । घरासाठीइम् देवासाठी मातासाठी बंगलासाठी घराच्या घराच्याँ घरांच्या घराँच्या अन्दर आवा तनी पढ़ा लिखा एवं बिस्तरामध्ये सोवा घरसाटी मुलगाच्या मुलगांच्या
Thursday, February 7, 2013
रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलला नियंत्रित करण्यासाठी मीठाचे आणि दारुचे सेवन कमीत-कमी प्रमाणात करा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Popular Posts
-
Click here to see Original Photo Chhatrapati Shivaji Maharaj - Great Maratha King
-
Click here to see Original Photo Chhatrapati Shivaji Maharaj - Great Maratha King Shiwaji weapons
-
1 Land, Politics And Trade In South Asia: 2 Leadership In 21st Century: 3 Truth Is Multi Dimensional-CD Sri Sri Ravishankar Art 4 What ...
-
Click here for More articles Rashichakrakar Sharad Upadhye - Bhakti Sagar आखाडा का बखेडा? : शरद उपाध्ये - Rashichakra Sharad Upadhy...
-
Kokanatala Malvani Garana Garhana marathi garhane कोकणात देवाला गार्हाणं घालण्याची रीत अजूनही प्रचलीत आहे.चांगल्या प्रसंगी देवाची आठव...
-
आषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराक...
-
स्त्रीला गरोदर कसे करावे ? पाहण्यासाठी येथे या मातृत्व प्रत्येक विवाहीत स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तस...
-
Marathi Bold Actress Amruta Khanvilkar When Amruta Khanvilkar was the losing fina...
-
CLICK HERE TO VIEW THIS INFORMATION
-
सुरस कथा मार्केटिंगच्या Dhirubhai Ambani Marketing Story in Marathi कथा धिरुभाई अंबानी यांचे वडील गुजरातमधे ग्रामीण भागात प्राथमीक शीक...
Total Pageviews
Categories
- Mehandi Designs (1)
- rail chakra (18)
- rel chakra (17)
- relchakra (18)
Blog Archive
-
▼
2013
(871)
-
▼
February
(36)
- Bal Keshav Thackeray: the most reliable documentary
- Narendra Modi's autobiography
- PENGUIN NEW TITLE
- Rajiv Gandhi Equity Savings Scheme
- E-books in regional laguage
- Questions and answers Intel Or AMD processor?
- मायक्रोसॉफ्टचा एक डाव रडीचा...
- Duplicate Android
- Free Calling is increasing - Skype, Nimbuzz, Fring
- list of handbooks in Indian edition.
- list of mass media books
- India’s cultural arm in UK faces cash crunch
- ‘God particle’ found, Cern takes a break for next ...
- ‘Paid news’ could now cost publication its registr...
- 500 structures at Madhya Pradesh's 12th century si...
- State MPs will push for uniform cable TV rates
- Ebay India customer care phone no.
- PENGUIN NEW TITLE
- New titles
- योग वसंत पंचमी आणि व्हॅलेंटाइनचा - Vasant Panchami...
- JUST RECEIVED STOCK DTD.12.02.2013
- चिरंतन शिक्षण : जादुई शाळा
- New titles
- New titles
- डोळे, स्मरणशक्ती आणि रक्तशुद्धीसाठी गाजर उपयोगी
- पोटात तीव्र/जोरात दुखते ।
- अंडे आणि चीजचे सेवन सोडून केवळ अंड्याचासफेद भाग खा ।
- राईचे रोपटे हे वनौषधीच्या जातीचे असते ।
- शारिरीक आजार हे मानसिक आजारांपासून उद्भवतात (होतात...
- आपले डोळे मौल्यवान आहेत । त्यांचे रक्षण करा ।
- भारत सरकारद्वारे राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना
- खूप ताप, खूप अंगदुखी, डोके दुखी, सांधेदुखी, डोळे द...
- एक महिन्यापासून सतत जुलाब होणे
- कर्करोगाच्या पेशी शरीराच्या इतर भागामध्ये पसरु शकत...
- रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलला नियंत्रित करण्यासाठी मीठ...
- Tanvi Express Courier & Cargo contact numbers
-
▼
February
(36)
No comments:
Post a Comment