Thursday, February 7, 2013

डोळे, स्मरणशक्ती आणि रक्तशुद्धीसाठी गाजर उपयोगी

मधुमेहातही लाभदायक
आपल्या स्वयंपाकघरात कित्येक वस्तू औषधीप्रमाणे काम करु शकतात. आपण मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. भाज्यांच्या टोपलीत गाजरे सुकून जातात किंवा फ्रिजमध्ये इतके दिवस पडून राहतात की परत न आणण्याच्या निर्णयाने त्यांना फेकून दिले जाते. गाजर हे असे कंदमुळ आहे, ज्याच्या नियमित सेवनाने कित्येक आजारांना आपल्यापासून दूर ठेवता येऊ शकते. सर्व वयाच्या व्यक्तींनी गाजराचे नियमित सेवन केल्यास अनेक रोगांपासून संरक्षण तर मिळतेच पण सौंदर्यही टिकून राहते. नियमित गाजर खाणाऱ्यांना म्हातारपणी होणारे त्रास होत नाहीत. गाजरामध्ये कित्येक चमत्कारिक प्रभाव दिसून येतात.
1. गाजरामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्याने ते आतड्यांना स्वच्छ ठेवते. गाजर चावून चावून खाल्ल्यास ऍसिडिटीमुळे आतड्यांमध्ये होणाऱ्या कीड्यांपासून सुटका होते. आतड्यातील मल पण गाजरामुळे साफ होतो.
2. गाजरामध्ये अधिक प्रमाणात व्हिटॅमिन "ए' असल्यामुळे नियमितपणे गाजर खावे. कित्येक वर्षांपासून गाजर खात असलेल्या लोकांचा अनुभव आहे की, यामुळे नेत्रज्योती तीक्ष्ण होते, चष्मा लागत नाही आणि असल्यास नंबर कमी होतो.
3. चहाप्रमाणेच रोज एक ग्लास गाजराचा ज्यूस प्याल्यास स्मरणशक्ती वाढते आणि अकाली वृद्धत्व येत नाही.
4. गाजराच्या नियमित सेवनाने छाती आणि मानेवर कोड होत नाही आणि असल्यास दूर होण्याचीही शक्यता असते.
5. गाजराच्या रसात अर्ध्या प्रमाणात पालकाचा रस, चिमूटभर सैंधव मीठ आणि जिरे मिसळून नियमितपणे घेतल्यास मधुमेह होत नाही आणि असल्यास हळूहळू त्याचा प्रभाव कमी होऊ लागतो.
6. जेवल्यानंतर ब्रश केल्याने दातांना कीड लागत नाही हे खरे आहे, पण त्याचप्रमाणे दुपारच्या जेवणानंतर गाजराचा रस पिल्याने दातांना कीड लागत नाही आणि दातांमधून रक्त निघण्याचे बंद होते.
7. वृद्धत्वात येणाऱ्या अशक्तपणात गाजर आणि गाजराच्या रसाचे सेवन खूपच लाभदायक असते.
8. गाजराचा रस कावीळीच्या रुग्णासही खूप उपयोगी मानला जातो.
9. तोंड आले असेल तर गाजराचा रस काही वेळ तोंडातल्या तोंडात फिरवून गिळल्याने बरे वाटते.
10. नवजात शिशुच्या मातेला दूध कमी येत असेल, तर भरपूर गाजर खायला दिल्यास दूध वाढते.
11. गाजरामध्ये व्हिटॅमिन "ए' प्रमाणेच बी कॉम्प्लेक्स खूप जास्त प्रमाणात असते. यामुळे पचनक्रिया मजबूत बनते. लहान मुलांना गाजर खायला दिल्याने ते निरोगी रहातात.
12. गाजर खाल्ल्याने मानसिक आणि शारीरिक शक्ती वाढते आणि जीवनातील निराशात्मक वातावरण दूर होण्यास मदत मिळते.
13. अंड्यापेक्षाही जास्त शक्ती आणि इतर लाभ गाजराने मिळू शकतात. अंडे कित्येक वेळा नुकसानही करु शकते, पण गाजराचे सेवनाने फक्त लाभच होतो.
14. विवाहित स्त्रियांनी गाजर आवर्जून खावे. गाजरामुभे गर्भाशयात काही दोष असल्यास ते दूर होऊ शकतात.
15. गाजर रक्त शुद्ध करते. गाजराने रोग प्रतिकारशक्ती वाढते.
16. गाजराचा रस चेहऱ्यावर लावल्यास त्वचेचा रंग स्वच्छ आणि उजळ होतो. कापसाने गाजराचा रस चेहऱ्यावर आणि मानेवर लावावा. 20 ते 25 मिनिटे ठेवून थंड पाण्याने धुवावा. त्वचेत आकर्षक चमक पहायला मिळेल.
17. गाजराची कित्येक व्यंजने बनतात. उदाहाणार्थ गाजराची भाजी, गाजराचे लोणचे, कोशिंबीर, रायता आणि सर्वांत प्रिय म्हणजे गाजराचा हलवा.
18. ताजी आणि गडद रंगाची गाजरे घ्यावी आणि गाजराच्या रसामध्ये बर्फाचा उपयोग करु नये. मध, आवळा, आले, मिरी आणि मिठाचा वापर करु शकता.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive