Monday, February 18, 2013

Questions and answers Intel Or AMD processor?

* मला नवीन सॅमसंगचा मोबाइल घ्यायचा आहे. पण मी ज्या परिसरात राहतो तेथे काणतेही ब्रॅण्डेड दुकान नाहीए. अशावेळी मी तिथून मोबाइल घेतला तर तो ओरिजिनल आहे हे मी कसे ओळखायचे ?


उत्तर - मोबाइल ओरिजिनल कंपनीचा आहे का , हे तपासण्यासाठी तुम्ही आयएमईआय नंबर व्हेरिफाय करणे गरजेचे आहे. तुमच्या मोबाइलवर * # ०६ # टाइप केलं की , तुम्हाला १५ आकडी आयएमईआय नंबर मिळेल. हा नंबर मेसेजमध्ये टाइप करून तो ५३२३२ किंवा ५७८८६ वर एसएमएस करा. यानंतर तुम्हाला ' आयएमईआय नंबर चेक , फोन इज जेन्युइन सॅमसंग फोन ' असा मेसेज येईल. जर तो मोबाइल ओरिजिनल नसेल , चोरलेला असेल , सेकंड हॅण्ड असेल तर त्या संदर्भातील माहितीही या मेसेजमधून मिळेल.

* माझ्या कम्प्युटरमध्ये विंडोज एक्सपी आणि विंडोज ७ या दोन ऑपरेटिंग सिस्टिम्स आहेत. यापैकी मला विंडोज एक्सपी हवे आहे. तर , मी काय करू ?

उत्तर : तुम्ही अपडेटेड ऑपरेटिंग सिस्टिम नको म्हणताय या मागचे कारण समजले असते तर काही पर्याय सांगता आला असता. परंतु , जर तुम्हाला विंडोज ७ डी-इन्स्टॉल करायची असेलच तर त्यासाठी तुम्हाला कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन रिकव्हरी या ऑप्शनमध्ये जावं लागेल. तेथे जर रिकव्हरीचा पर्याय असेल तर त्यावर क्लिक करून तुम्ही विंडोज ७ डी-इन्स्टॉल करू शकता. जर ऑपेटिंग सिस्टिम लोड करताना हा पर्याय सेट केला नसेल तर , तुम्हाला डी-इन्स्टॉल करता येणार नाही. मग यासाठी तुम्हाला विंडोज ७ ची ओरिजनल सीडी वापरून हे काम करावे लागेल. त्यावरील ' युजिंग द कस्टम इन्स्टॉलेशन ऑप्शन आणि फॉरमॅटिंग हार्ड डिस्क ' मध्ये जाऊन ते डी-इन्स्टॉल करावे लागेल. हे सर्व करण्यापूर्वी तुमच्या सर्व फाइल्सचा बॅकअप घेऊन ठेवावा.

* मला फोटोशॉप वापरता येईल असा लॅपटॉप घ्यायचा आहे. माझं बजेट ४० हजार रुपये आहे. यात कोणती ऑपरेटिंग सिस्टिम वापरता येईल ?

उत्तर - फोटोशॉप आणि कोरल ड्रॉ यासारखे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी तुम्हाला हाय कॉन्फिगर्ड कम्प्युटर घ्यावा लागणार यात काही वादच नाही. शक्यतो अॅडव्हान्सचं ओएस घ्या. ज्यामुळे तुम्हाला त्या सॉफ्टवेअरमधील सर्व पर्याय मनसोक्त वापरता येतील. असूसचा पर्याय तर डेस्कटॉपसाठी चांगला असू शकत नाही. राहिलेल्यापैकी एचपी किंवा डेल यापैकीच एखादा तुम्हाला योग्य पर्याय ठरू शकेल. एचपीच्या पॅविलिऑनचा तुम्ही विचार करू शकता. यामध्ये आठ जीबी रॅम , हार्ड डिस्क तुम्हाला हवी इतकी पण कमीत कमी ५४० जीबीची आहे. आता टीबीच्या हार्डडिस्कही आल्या आहेत. प्रोसेसर आय थ्री किंवा आय फाइव्हचा पर्याय चांगला राहील. यामध्ये तुम्ही जी ऑपरेटिंग सिस्टिम घ्याल ती हायटेक असू द्या. अर्थात एचपीचे कम्प्युटर विंडोजला सपोटेर्बल असल्यामुळे यात तुम्हाला विंडोज एक्सपीपासून ते विस्टा , विंडोज ७ पर्यंतचे पर्याय मिळतील पण या ओएस घेताना त्या ६४ बाइट्सवाल्या घेणे योग्य ठरेल. डेलमध्ये म्हणाल तर डिझाइन्स सॉफ्टवेअर्सच्या दृष्टीने प्रीसिशन सीरिजमधील कम्प्युटर योग्य ठरतील. यामध्ये तुम्हाला क्वाड कोर क्सीऑन प्रोसेसर मिळू शकतो. याशिवाय आठ जीबी रॅम , ग्राफिक कार्ड हे फिचर्सही अपडेटेड असल्यामुळे याचाही तुम्ही विचार करू शकता. हे सर्व कम्प्युटर तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला मिळू शकतील.

* एएमडीचा प्रोसेसर घ्यायचा की , इंटेलचा ? या दोघांमध्ये काय फरक असतो ?

उत्तर - इंटेल अर्थात इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स कॉपोर्रेशन ही कंपनी १९६८मध्ये स्थापन करण्यात आली असून जगातील सर्वात मोठी सीपीयू उत्पादक कंपनी आहे. तर एएमडी अर्थात अॅडव्हान्स मायक्रो डिवाइस ही कंपनी १९६९मध्ये स्थापन करण्यात आली असून ही दुसऱ्या क्रमांकावरची कंपनी आहे. सध्या या दोन्ही कंपन्यांमध्ये तगडी स्पर्धा आहे ती त्यांच्या प्रोसेसरमध्ये. इंटेलचा ब्रॅण्ड हा अर्थात एएमडीपेक्षा मोठा असल्याने त्याचा भाव नेहमीप्रमाणेच वधारलेला असतो. या दोघांमध्ये मुख्य फरक आहे तो केच मेमरीचा. इंटेलच्या प्रोसेसरमध्ये एलव्हीएल२ केच मेमरी असते. ही मेमरी सीपीयूच्या मागे असून त्याच्यामुळे आपल्या कम्प्युटरचा वेग वाढतो. गेमिंग , फोटोशॉप आणि म्युझिक एडिटिंग अशा सॉफ्टवेअरसाठी आपल्याला या केच मेमरीचा अधिक वापर होतो. यामुळे इंटेल प्रोसेसर नेहमीच उजवा ठरतो. अर्थात एमडीची किंमत कमी असली तरी जर तुम्हाला गेमिंग वैगरेसाठी कम्प्युटर वापरायचा नसेल तरच हा प्रोसेसर आपण वापरू शकतो. या प्रोससरनुसार तुमचे ग्राफिक कार्डही बदलणार. कारण एमएमडी एटीआयला चांगला सपोर्ट करते तर इंटेल एनविडियाला चांगला सपोर्ट करते. यामुळे आपण आपला कम्प्युटर कशासाठी वापरणार आहोत हे निश्चित करून मगच कोणता प्रोसेसर घ्यायचा हे निश्चित करावे लागेल. कारण तुम्हा दोन चांगल्या पर्यायातून सवोर्त्तम पर्याय निवडायचा आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive