Wednesday, February 13, 2013

योग वसंत पंचमी आणि व्हॅलेंटाइनचा - Vasant Panchami and Valentine Day

भारतीय संस्कृतीतील कामदेव(Kamdev) ( मदन ) रती(Rati) या जोडीतील मदन याचा जन्मदिवस (Birthday)म्हणून साजरी होणारी वसंत पंचमी(vasant Panchami) आणि प्रेमिकांचा दिवस मानल्या जाणाऱ्या व्हॅलेंटाइन डे(valentine day) चा अनोखा मिलाफ यंदा १४ फेब्रुवारीला (14th Feb)होणार आहे . तब्बल ४६ वर्षानंतर हा योग आल्याची माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा . कृ . सोमण यांनी दिली .

मदनाचा जन्म माघ शुक्ल पंचमी म्हणजेच वसंत पंचमीला झाला . भारतीय संस्कृतीत वसंतोत्सवाची सुरुवात याची दिवशी होते . १९६७मध्ये वसंत पंचमी व्हॅलेंटाइन डे एकाच दिवशी आले होते . वसंत ऋतु मदन यांचा घनिष्ठ संबंध असून दाम्पत्य जीवन सुखी होण्यासाठी वसंत पंचमीच्या दिवशी रती - मदनाची पूजा केली जाते , अशी माहिती दा . कृ . सोमण यांनी दिली . वसंत पंचमीच्या दिवशी लक्ष्मी सरस्वती यांचाही जन्म झाला , असे मानण्यात येते . या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा असल्याचे सोमण म्हणाले

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive