Thursday, February 7, 2013

कर्करोगाच्या पेशी शरीराच्या इतर भागामध्ये पसरु शकतात किंवा रोगव्यापी करु शकतात

कर्करोगाच्या पेशी शरीराच्या इतर भागामध्ये पसरु शकतात किंवा रोगव्यापी करु शकतात,ज्यामुळे नविन अर्बुद निर्माण होऊ शकतात ।
कारण की कर्करोग पसरु शकतो, ह्यामुळे आवश्यक आहे की चिकित्सकाने झटकन शोधून काढले पाहिजे की अर्बुद बनले आहे, आणि हा कर्करोग आहे ।
कर्करोग आहे हे कळताच ह्याचा इलाज सुरु करता येतो ।
कर्करोगामुळे असे अनेक लक्षण दिसून येतात जे कर्करोग असल्याचा आभास देतात । 
काही महत्वपूर्ण लक्षणांचे विवरण खाली दिले जात आहे ।
कर्करोगामुळे असे अनेक लक्षण दिसून येतात जे कर्करोग असल्याचा आभास देतात । 
कोणतीही जखम जी अधिक काळापासून भरलेली नाही ।
छातीवर किंवा शरीरामध्ये इतर कुठेही गाठ किंवा सूज ।
शरीराच्या कोणत्याही भागातून किंवा अंगातून असामान्य रूपाने रक्त किंवा लस येणे ।
सतत अधिक काळापर्यंत खोकला येणे किंवा आवाज जड होणे/आवाज बसणे ।
अन्न गिळताना किंवा शौचास त्रास होणे, सतत अपचन किंवा बद्धकोष्ठता असणे ।
आतड्यांच्या सामान्य सवयीमध्ये बदल ।
तीळ किंवा मसाचा आकार, रंग किंवा रुपात अचानक बदल ।
तसे, असे लक्षण केवळ कर्करोगामुळेच निर्माण होत नाही, ह्यांचे अनेक कारण सुद्धा असू शकतात ।
ह्यामुळे ह्यांना पाहताच कर्करोग मानले नाही पाहिजे ।
दोन आठवड्यापर्यंत हे लक्षण राहिल्याने ह्यांना चिकित्सकाला दाखवा ।
ह्याच्यात कोणतीच शंका नाही की भारतामध्ये आढळणारे बहुतेक कर्करोग (६०-७० टक्के) रोगांची ताबोडतोब ओळख संभव आहे ।
आवश्यकता आहे, ह्याच्या बद्दल माहिती वाढवण्याची तसेच प्रत्येक व्यक्तीला आपली स्वतःची काळजी घेण्याची ।
कर्करोगाची ताबोडतोब ओळख करुन, ६०-७० टक्के कर्करोग रुग्णांना मुळापासून ठीक करणे आता संभव आहे ।
एवढेच नाही तर ताबोडतोब ओळख आणि झटकन उपचाराचे मूल्यसुद्धा उशीरा उपचाराच्या तुलनेत खूप कमी आहे ।
कर्करोगाच्या लक्षणांपासून सतर्क होण्याशिवाय सगळ्या स्त्रियांनी आणि पुरूषांनी नियमितपणे आपली तपासणी केली पाहिजे ।
सामान्य परीक्षणाद्वारे काही प्रकारच्या कर्करोगांची ओळख कुठल्याही चिन्हाच्या दिसून येण्या आधीच केले जाऊ शकते ।
कुठल्याही चिन्हाच्या दिसून येण्या आधीच चिकित्सक मुख, स्तन, गर्भाशयग्रीवा(सर्विक्स) त्वचा, मोठे आतडे, मलाशय, पुरस्थ-ग्रंथी (प्रोटेस्ट), अंडकोश(टेस्टिकल) इत्यादी कर्करोगांचा शोध लावू शकतात ।
ग्रीवाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये होणारा एक सर्वसामान्य कर्करोग आहे ।
भारतात स्त्रियांमध्ये होणारा एकुण कर्करोगांमध्ये ४० टक्के कर्करोग गर्भाशयग्रीवाचे असतात ।
लाळ ग्रंथी, लाळ धमनीद्वारे एक दूसर्यासशी जोडलेल्या असतात ।आणि एक सफेद पातळ द्रव बनवतात जीला लसीका म्हणतात ।
लसीका धमनींचे जाळे रक्त धमनींसारखे पूर्ण शरीरामध्ये पसरलेले असते ।
लसीका ग्रंथी कर्करोग पेशींना चाळून आपल्यापर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतात ।
कर्करोग वाढल्यावर तो असे करु शकत नाही आणि लसीकाद्वारे कर्करोग शरीराच्या एका भागातून दूसर्याव भागापर्यंत पसरु लागतो ।
ह्या कारणांमुळे शल्यचिकित्सक सर्वसाधारणपणे गर्भाशयग्रीवाच्या आजूबाजूच्या लसीका ग्रंथींनासुद्धा काढून घेते ।
गर्भाशयग्रीवाचा कर्करोग रक्त प्रवाहाद्वारे सुद्धा पसरु शकतो ।
त्वचेमध्ये खासकरुन तीळ व मस कुठल्याही प्रकारची नविन वाढ किंवा बदलासाठी नियमितपणे तपासणी करावी ।
कोणत्याही बदलास लगेच चिकित्सकाला दाखवा ।
सामान्य चिकित्सा तपासणीच्या दरम्यान चिकित्सकाला व्वचाची सुद्धा तपासणी केली पाहिजे ।
मोठी आतडी आणि मलाशयच्या कर्करोगाचा लवकर शोध लावण्यासाठी नियमित चिकित्सक तपासणी करणे महत्त्वपूर्ण आहे ।
मलाशयाची तपासणी करण्यासाठी चिकित्सक हातमोजा घातलेले बोट मलाशयात टाकून, रोगाचे निदान लावू शकतात ।
५० वर्षाच्या वयानंतर, प्रत्येक व्यक्तीची वार्षिक तपासणी आवश्यक आहे ।
मोठ्या आतड्याच्या कर्करोगामुळे मलाबरोबरच रक्त येऊ शकते ।
निश्चित निदानासाठी विस्तृत तपासणी आवश्यक आहे ५० वर्षाचे  आयुष्य पार करणार्या  व्यक्तीचे मलाशय आणि मोठ्या आतड्यांची तपासणी करण्यासाठी चिकित्सकाला ३ ते ५ वर्षाच्या अवधीमध्ये  अवग्रहाभ (मलाशयाची द्विनेत्री तपासणी) केली पाहिजे ।
चिकित्सकाद्वारे पुरःस्थ ग्रंथिच्या कर्करोगाचा प्राथमिक स्थितीमध्ये  शोध लावण्याची अत्यंत विश्वसनीय पद्धत चढलेल्या बोटांचे परिक्षण आहे ।
४० वर्षापेक्षा जास्त आयुच्या सगळ्या व्यक्तींची वार्षिक तपासणी आवश्य केली गेली पाहिजे ।
वार्षिक तपासणी अवश्यक पुरःस्थ ग्रंथीमध्ये अनियमित किंवा असामान्य कठोर क्षेत्राचा शोध लागू शकतो । आणि माहिती केली जाऊ शकते की हा अर्बुद आहे की नाही ।
अंड ग्रंथीच्या कर्करोगाचा शोध जास्त तर माणूस स्वतः करु शकतात ।
प्रत्येक मास स्वतः तपासून पुरुष आपल्या अंड ग्रंथींमध्ये परिवर्तनाचा शोध लावू शकतात ।
गरम पाण्याने आंघोळ करताना किंवा त्याच्यानंतर, जेव्हा अंडकोश शिथिल असते, त्याच्या तपासणीची सर्वात चांगली वेळ असते, कारण की ह्या परिस्थितीमध्ये कोणत्याही परिवर्तनाचा सहजतेने शोध लावला जाऊ शकतो ।
अंड ग्रंथीच्या स्वंय परीक्षणाने जर सूज, गाठ किंवा कोणत्याही इतर प्रकारच्या दोषांचा, खासकरुन अंड ग्रंथीला स्पर्श केल्याने असामान्य वेदना, वेदना किंवा मोठेपणा जाणवत असेल तर चिकित्सकाला दाखवले पाहिजे ।
चिकित्सकाद्वारे अंड ग्रंथींची तपासणीसुद्धा व्यक्तीच्या नियमित वार्षिक चिकित्सक तपासणीचा भाग असला पाहिजे ।
तोंडाच्या कर्करोगाच्या चिन्हांसाठी तोंडाची नियमितपणे तपासणी आवश्यक आहे ।
तोंडाच्या ऊतकांचे परिवर्तन कर्करोगाची प्राथमिक स्थिती होऊ शकते ।
तोंडाच्या ऊतकांच्या परिवर्तनाला सहजपणे पाहिले आणि अनुभवले जाऊ शकते ।
दंत चिकित्सकाने प्रत्येक रूग्णाच्या तोंडाची संपूर्ण पणे तपासणी करावी ।
हिरड्या, ओठ आणि गाल ह्यांच्या रंगात होणार्या  परिवर्तनावर लक्ष दिले गेले पाहिजे ।
खुरण्ड (खपली) भेग, सूज, रक्त स्त्राव तोंडाच्या कोणत्याही भागामध्ये गाठ किंवा लाळ ह्यांबद्दल विशेष लक्ष दिले पाहिजे ।
चिकित्सक किंवा दंतचिकित्सकाकडे जाऊन तपासणी अवश्य करुन घ्या ।
जर तुम्ही तंबाखू, पान, पानमसाला किंवा जर्द्याचे सेवन करत असाल तर तपासणी करणे आवश्यक आहे ।
तुम्ही स्वतः सुद्धा आरशात तुमचे स्वतःहाचे तोंड बघू शकतात आणि कोणतेही परिवर्तन दिसू लागताच चिकित्सकाचा सल्ला घेऊ शकता ।
सगळ्या महिलांना स्तनाचा स्वतः परीक्षणाचा ढंग जाणून घेतला पाहिजे । आणि प्रत्येक महिन्याला आपल्या छातीचे स्वतः परीक्षण केले पाहिजे ।
मासिकस्त्राव अवधीच्या काही दिवसानंतर स्तनांचे परीक्षण करणे योग्य असते । जेव्हा स्तन मोठे किंवा दुखण्याची शक्यता अजिबात नसते ।
मासिकस्त्राव बंद झाल्यावर सुद्धा स्त्रियांनी प्रत्येक महिन्याला स्वतः परीक्षणासाठी एक दिवस (कधी ही) नियुक्त केला पाहिजे ।
४० वर्षापेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांसाठी हे परीक्षण खासकरुन महत्त्वपूर्ण असते ।
४० वर्षापेक्षा जास्त वयामध्ये स्तन कर्करोगाचा धोका वाढतो ।
जर कोणत्याही स्त्रीच्या स्तनात गाठ किंवा कोणत्याही प्रकारच्या परिवर्तनाचा आभास होतो तर तिला चिकित्सकाशी संर्पक केला पाहिजे ।
स्तनाच्या जवळजवळ ८० टक्के गाठी कर्करोग नसतात । परंतु एक चिकित्सकच ह्याची बरोबर ओळख करु शकतो ।
स्त्रियांची चिकित्सक तपासणी करता वेळी स्तनामध्ये गाठ किंवा स्तन खूप मोठे झाल्यासारखे अशा कोणत्याही असामान्य परिवर्तनाची तपासणी आवश्य केली गेली पाहिजे ।
स्तनाचा मैमोग्राम अर्थात एक्सरे/क्ष-किरण अर्बुद किंवा परिवर्तनाचा शोध लागला जातो । ज्याच्याने एक चिकित्सक सावधगिरीने तपासणी करुन सुद्धा पकडू शकत नाही ।
४० वर्षाच्या वयानंतर प्रत्येक स्त्रीला १ ते २ वर्षाला मैमोग्राम केला पाहिजे ।
स्त्रीचे वय ५० वर्ष झाले तर प्रत्येक वर्षी मैमोग्राम करणे आवश्यक आहे ।
ज्या महिलांच्या आईंना, बहिणींना, मावश्या इत्यादींना कर्करोग आहे त्यांना २५-३० वर्षाच्या आयुपासूनच वार्षिक स्तनाची तपासणी तसेच मैमेग्राफी केली पाहिजे ।
कर्करोगाची तपासणी विकृतीशास्त्र परीक्षणाद्वारे केली जाते ।
एफ । एन । ए । सी ।, बायोपसीच्याद्वारे ह्या पेशींना सूक्ष्मदर्शकयंत्रामध्ये पाहिले जाते ।
इतर चाचणीनेसुद्धा कर्करोगाचा शोध लावला जाऊ शकतो । जसे एक्सरे, सी । टी । स्कॅन, एम । एम । आर ।, अल्ट्रासाउड  
प्रशिक्षण तपासणी केंद्राची सूची जिथे कर्करोगाचे प्रशिक्षण केले जाते ।
शल्य चिकित्सक कर्करोगाच्या चरणावर निर्भर असते ।
जर कर्करोग मर्यादित आणि प्राथमिक चरणात आहे तर प्रभावित क्षेत्राच्या बरोबर काही सामान्य क्षेत्रामध्ये सुद्धा हटवले जाते ।
प्रयत्न केला जातो की कर्करोगाचा कोणताही कण राहता कामा नये ।
जर कर्करोगाने इतर क्षेत्रांमध्येसुद्धा प्रवेश केला आहे तर कर्करोगाचा आकार कमी करण्यासाठी त्याच्यापासून निर्माण होणार्याय त्रासाला कमी करण्यासाठी शल्य चिकित्सा केली जाते ।
क्ष-किरणाद्वारे कर्करोग पेशींना जाळले जाते ।
रेडियों धर्मीच्या आधी कर्करोगाचे क्षेत्र, फैलाव रुग्णाची क्षमता, कर्करोगाच्या आधारावर क्ष-किरणाची वेळ, चरण, क्षेत्र शक्ती ह्यांचे आंकलन केले जाते ।
पुन्हा व्वचावर चिन्ह लावले जाते ।
क्ष-किरणाच्या दरम्यान कोणत्याही दुसर्या  व्यक्तीचा त्या खोलीमध्ये प्रवेश वर्जित आहे ।
रेडियों धर्मी क्ष-किरणापासून कोणताच त्रास होत नाही ।
कधी-कधी व्वचा लाल होऊ शकते किंवा रुग्णाला उल्टी होऊ शकते ।
औषधांद्वारे काही कर्करोगाला पूर्णपणे ठीक केले जाऊ शकते जसे रक्ताचा कर्करोग आणि गाठींचा कर्करोग 
हे औषध कर्करोग पेशींना नष्ट करतात ।
सामान्य पेशीसुद्धा ह्या औषधाने प्रभावित होऊ शकतात ।
पेशींच्या प्रभावित होण्यामुळे रुग्णाचे केस, नख पडू शकतात ।
रक्त कमी होऊ शकते ज्याच्यामुळे थकवा जाणवतो ।
जर रुग्ण नियमित सायकल, बरोबर प्रमाणात औषध घेतले आणि स्वास्थ्य आहार खाल्ला तर पूर्णपणे ठीक होतो ।
उपचाराच्यावेळी सतत रक्ताची तपासणी केली पाहिजे, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ जेवण घेतले पाहिजे ।
कोणत्याही आजारी व्यक्तीबरोबर बसले नाही पाहिजे कारण की औषधांनी प्रतिरोधक शक्ती बरीच कमी होते ।
कर्करोगाच्या नाईलाज रुग्णांना पेलियेटिव केअर मध्ये ठेवले जाते ।ज्याच्यामुळे त्याच्या शारीरिक, मानसिक, त्रास कमी करता येतो ।
रुग्णालयातील यादी जिथे कर्करोगाच्या उपचाराची सोय आहे ।
कर्करोगापासून संरक्षण तसेच जागरूकता ।
तंबाखू व तंबाखूंशी संबंधित वस्तूंपासून संरक्षण किंवा परित्याग/प्रदूषण नियत्रंण ।
शुद्ध साधारण शाकाहारी आहार, प्रत्येक दिवशी ताज्या हिरव्या पालेभाज्या व ताज्या फळांचे सेवन करा । 
प्रत्येक दिवशी कमीत कमी आर्धा तास व्यायाम/वेगात चालणे/खेळणे ।
अधिक मिरची तळलेले, भाजलेले, मांस, तूप, दारु ह्यांमध्ये कमी करणे
१८ वर्षाच्या आधी शारीरिक संबंध बनवू नका ।
आपल्या जोडीदाराबद्दल एकनिष्ठ राहणे/जनन अंगांना स्वच्छ ठेवणे ।
बालकाला बर्यारच काळापर्यंत आपले दूध पाजणे ।
संभोगच्यावेळी निरोधचा वापर करा ।
समाजात जागरुकता
धूम्रपान व तंबाखुपासून होणार्याय नुकसानाची महिती द्या ।
स्वतःला स्वच्छ ठेवण आणि वाईट सवयींपासून दूर ठेवणे ।
सरकारी व गैर-सरकारी विभाग समाजिक संस्था ग्रामीण व शहरी जीवनशैलीला सुधारण्यासाठी प्रेरित करणे । 
स्तन व मुख ह्यांची तपासणी करण्यासाठी माहिती देणे व ३५ वर्षांनंतर वर्षातून एकदा आपल्या आरोग्याची तपासणी करून घेणे । 
बालवाडी कार्यकर्तीला कर्करोगासंबंधी लक्षणे व स्व स्तन, मुखाची तपासणी, संरक्षणसंबंधी माहिती दिली गेली आहे ।
कनिष्ठ विद्यालयात कर्करोग, त्याची लक्षणे, तंबाखुचे तोटे, स्व-स्तन संरक्षणासंबंधी माहिती दिली गेली आहे ।
कर्करोग नोंदणीकृत राज्याच्या सर्व चिकित्साकेंद्रांत अधिक्षकाने बेस रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, वैद्यकीय विद्यालय व खाजगी रुग्णालय ह्यांना एक कर्करोग रजिस्ट्रार बनवायला सांगितले आहे ।
कर्करोग नोंदणी कार्यालयात ते आपल्या बाह्य विभागात आलेले कर्करोगीची नोंदणी करतील व प्रत्येक महिन्यात हा अहवाल महानिदेशालयात पाठवतील ।
कर्करोग नोंदणी कार्यालयात आपल्याला कळेल की राज्यात कर्करोगाने पीडित व्यक्तिंची संख्या किती आहे व कोणत्या विभागात कोणता कर्करोग जास्त प्रमाणात आढळतो ।
कांजण्या (चिकन पॉक्स/व्हॅरिसेला)
कांजिण्या ह्या विषाणूजन्य आहेत ज्या वेरिसिला (व्ही । जेड । व्ही ।)च्या संपर्कातून होतात ।
ताप व संपूर्ण शरीरावर विशिष्ट प्रकारच्या पुटकुळ्या येणे ही कांजिण्यांचे लक्षणे आहेत ।
हवेतील निहित थेंबांद्वारे विषाणू सामान्यपणे एका व्यक्तिकडून दुसर्याल व्यक्तिमध्ये पसरतो ।
कांजिण्या झालेल्या व्यक्तीच्या खोकल्याने किंवा शिंकल्याने सभोवतालच्या परिसरात शिंतोडे उडाल्याने हा आजार पसरतो ।
कांजिण्या किंवा हर्पिसच्या थेट संर्पकाद्वारे सुद्धा हे पसरु शकतो । कारण की ओल्या जखमेत संसर्गजन्य द्रव असते ।
काही गोष्टीत हे संसर्गित गर्भवती आईकडून तिच्या न जन्मलेले किंवा नवजात शिशुलासुद्धा लागू शकते ।
पुटकुळ्या येण्याच्या आधी काही दिवसापर्यंत आणि सगळ्या जखमांवर खपली तयार होण्याच्या आधीपर्यंत म्हणजे त्याच्या सुकण्यापर्यंत कांजिण्या सर्वाधिक स्पर्शजन्य असतात जे बहुधा चट्ट्यांना आरंभ होण्याच्या एक अठवड्यानंतर होतात ।
ताप, अंग थरथरणे, ओकारी आणि उल्टी सगळ्यात स्वच्छ और सुविख्यात लक्षण आहे हे पुटकुळ्या आणि अत्यंत खाजयुक्त चट्टे येणे ।
जास्त प्रमाणातील मुलांना २००-३०० पुटकळ्या निघतात ज्यानंतर खपली किंवा पापुद्रा बनतो ।
कांजिण्या मुलं आणि मोठ्या, पुरूष आणि महिला ह्या दोघांनाही होऊ शकतात ।
जास्त प्रमाणातील लोक लहानपणी किंवा किशोरावस्थाच्या दरम्यान कधी ना कधी कांजिण्यांचा शिकार होतात ।
परंतु अगोदर कधी कांजिण्या न झालेल्या प्रौढ जर अशा केसीच्या संपर्कात येतात तर त्यांना संसर्गाचा धोका असतो व प्रौढावस्थेत त्यांना कांजिण्या होऊ शकतात ।
मुलांच्या तुलनेत कांजिण्या किशोर आणि वयस्कर ह्यांमध्ये अधिक गंभीर असतात ।
ताप हा अधिक जास्त काळ रहातो ।
संक्रमित व्यक्तिंना शाळा किंवा कामापासून दूर ठेवल्याने विषाणुंचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत मिळते परंतु लक्षीकरण हा कांजण्यांच्या त्रासापासून वाचण्याचा एक प्रभावी उपाय आहे ।

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive