आत्मसंरक्षणाच्या
प्रेरणे-नंतर
मानवी
जीवनातील
अत्यंत
प्रभावी
प्रेरणा
म्हणजे
कामप्रेरणा.
हिचा परिचय
अगदी
बालवयातच मला
झाला; कारण
रामायण,
महाभारत आणि
श्रीकृष्ण
चरित्र
यातल्या कथा
मी वाचल्या
होत्या किंवा
मला
सांगितल्या
गेल्या
होत्या आणि
त्यात ही
अत्यंत
प्रभावी
प्रेरणा मला
नाना
संदर्भात व
स्वरूपात
भेटली होती.
मत्स्यगंधाच्या
सौंदर्याने
मोहित होऊन
तिच्याशी
कामक्रीडा
करणारा पराशर
ऋषी, यमुनेत
स्नान करायला
गेलेल्या
गोपींची
किनाऱ्यावरची
वस्त्रे
लपविणारा
श्ाीकृष्ण,
त्यानं
गोपींशी
केलेल्या
क्रीडा आणि
पुढे त्याची व
रुक्मिणीची
प्रेमकथा,
अहिल्येला
फसवून तिचा
संभोग घेणारे
देव,
विश्वमित्राचा
अप्सरेनं
केलेला
तपश्चर्याभंग...
जाऊ दे. अशी
यादी करत
राहिलो तर दहा
पानं तरी सहज
भरतील.
पुराणातच
नव्हे, तर
इतिहासातदेखील
अशा असंख्य
प्रेमकथा
आहेत.
त्यामुळे
कामप्रेरणा
किती प्रभावी
आहे, माणसाला
मोहित करणारी
आहे ते मला
कळलं आणि तिचा
परिचय व्हावा,
तिचा अनुभव
घ्यावा असं
मला वाटू
लागलं.
माझ्या जीवनात ती विचित्र प्रकारे आली. आमच्या गावाजवळच्या आवास गावात एक नागोबाचं देऊळ होतं. तेथे दरवषीर् जत्रा भरत असे. त्यावेळी आम्ही गावात असलो तर जत्रेला जात असू. गावच्या माझा मित्र बापू मला सांगायचा की, त्या देवळात नागोबा प्रत्यक्ष असतो आणि कधी कधी भाविकांच्या दृष्टीस पडतो. तो म्हणे मनगटाएवढा जाड आहे आणि त्याच्या अंगावर केस आहेत.
नंतर काय झालं, तो नागोबा माझ्या स्वप्नात आला आणि माझ्यावर प्रसन्न होऊन मला त्याच्या अंगाला हात लावायला देऊ लागला. इतकंच नव्हे तर माझ्याबरोबर माझ्या बिछान्यात झोपू लागला. त्याच्या आणि माझ्या मैत्रीच्या अनेक कथा माझ्या मनानं निर्माण केल्या आणि त्या कथा सारख्या माझ्या मनात घोळत राहू लागल्या.
त्या वयात माझ्या मनात एक स्वप्नसृष्टी निर्माण होत होती. त्या सृष्टीत नंतर एका लावण्यवती स्त्रीनं प्रवेश केला. तिचंही त्या नागोबावर प्रेम होतं आणि ती, मी आणि तो नागोबा यांच्या अनेक कथा माझ्या मनात निर्माण होत होत्या किंवा माझं मन त्या निर्माण करीत होतं.
कामप्रेरणेची जागृती अशाप्रकारे माझ्या मनात सुंदर स्वप्नसृष्टीच्या रूपानं होत असता माझ्या वर्गातल्या मुलांच्याही मनात ती जागृती होत होती; पण ती अगदी वेगळ्या प्रकारे होत होती. निदान मला तसं तेव्हा वाटलं. ते लैंगिक अनुभवाविषयी अतिशय टवाळपणे बोलायचे आणि ख्व्या ख्व्या करून हसायचे. प्रत्यक्ष लैंगिक समागम कसा असेल ते हातवारे करून दाखवायचेे. रस्त्यातून सुंदर स्त्री जाताना दिसली की, तिच्याविषयी अश्लील बोलायचे. आपलं अमक्या पोरीवर इंप्रेशन पडलं असं सांगायचे. तिच्यावर आपण लाइन मारतो आहे असं म्हणायचे आणि अमकी पोरगी आपल्यावर खुश झाली, तमकी आपल्याकडे पाहून हसली असं सांगायचे. काही तर आपण त्याच्याही पुढे गेलो असं हलक्या आवाजात सांगायचे. लैंगिक जागृतीविषयी असं बोलणं मला आवडत नसे आणि असेही. त्यांचं बोलणं ऐकलं म्हणजे अंग शिरशिरायचं.
रोमिओ अँड ज्युलियट या नाटकात शेक्सपिअरनं प्रीतीच्या या दुहेरी आविष्काराचं अतिशय वास्तव आणि प्रत्ययकारी दर्शन घडवलं आहे. पण मध्येच तिच्याविषयी टवाळखोर शेरे कोणीतरी मारतं आहे, असं दाखवलं आहे. पहिल्यांदा ते नाटक वाचताना मला हे चमत्कारिक, रसभंगकारक वाटलं. पण नंतर ते किती वास्तवदशीर् आहे ते पटलं. शेक्सपिअर हा फार थोर लेखक आहे, याचा पुन्हा प्रत्यय आला.
त्या काळात मी दोन पातळ्यांवर जगत असे. एक व्यावहारिक पातळी किंवा वास्तवाधिष्ठित पातळी आणि दुसरी स्वप्नांच्या विश्वातली पातळी.
पुढे मी मोठा झालो. माझा प्रेमविवाह झाला तेव्हा स्वप्नांच्या विश्वातून मी बाहेर पडलो; पण तरी मी सतत मनाच्या एका पातळीवर कल्पित विश्वात असतो. माझं मन सतत काहीतरी कल्पित असं निर्माण करीत असतं. याचं उदाहरण एका व्याख्यानात विद्यार्थ्यांना सांगितलं होतं आणि ऐकून ते खळखळून हसले होते.
त्याचं काय झालं, मी गोव्यात एका हॉटेलात उतरलो असताना मला कोकिळेचं कुहू-कुहू कंुंजन ऐकू आलं. मग त्याच्या मागोमाग कावळ्याचा कर्कश आवाज ऐकू आला. मग दबक्या आवाजात दुसऱ्या कावळ्याचं ओरडणं ऐकू आलं. याचा माझ्या मनानं असा अर्थ लावला की, कोकिळेचं कुहू कुहू असं कुंजन ऐकून कावळी कर्कश आवाजात आपल्या नवऱ्याला सांगू लागली. 'पहा, किती दुर्बळ कुंजन आहे या कोकिळेचं आणि मी पहा कशी जोरदार आवाजात ओरडते आहे. मग श्रेष्ठ कोण, कोकिळा की मी? मीच श्ाेष्ठ आहे हे कोणीही कबूल करील.' तेव्हा तिचा नवरा असलेला कावळा दबक्या आवाजात म्हणाला, 'हो. हो.'
असं माझं मन अखंडपणे कथांची निमिर्ती करीत असतं. आता कथा लिहायची आहे, काय बरं लिहावी, असा सुदैवानं मला प्रश्नच पडत नाही. या स्वप्नसृष्टीचं मूळ कामप्रेरणेत आहे.
- गंगाधर गाडगीळ

No comments:
Post a Comment