देवाने मनुष्याला दिलेली दृष्टीची देणगी काही कारणाने कमजोर झाली किंवा त्यामध्ये दोष निर्माण झाला , तर त्याला पूरक म्हणून निर्माण झालेली ही चष्म्याची कृत्रिम दुनिया आता ' चष्मिश ' ' ढापण ' अशा खोचक विशेषणांच्यापुढे गेली आहे. कोणत्याही वयात डोळ्यांवर चष्मा असला , तरी आता भुवया उंचावत नाहीत. चष्मा म्हणजे नजरेला लागलेली ' दृष्ट ' नसून नेत्र कार्यक्षमता वाढविणारी दूर ' दृष्टी ' आहे.
......
चाळीशी उलटली , की दोन डोळ्यांचे चार डोळे झालेच म्हणून समजण्याची पद्धत एकेकाळी होती. वयानुरूप लागणारा चष्मा काहीजणांना दृष्टीदोषामुळे लवकर लागायला लागला आणि त्यानंतर काळ बदलला , तशी चष्म्यानेही फॅशनच्या दुनियेत प्रवेश केला. चष्मा असला , तरीही आपली नजर स्पष्ट आहे हे दाखवण्यासाठी तो बाजूला ठेवण्याचा काळ चष्म्याच्या केसमध्ये केव्हाच बंद झाला. आता कॉलेजची पायरी चढल्यानंतर ' स्कॉलर ' दिसण्यासाठी आणि त्याहीपेक्षा फॅशन ट्रेंडचा(fashion trend) हिस्सा म्हणूनही चष्म्याची फ्रेम चक्षूंवर धारण करण्याचा जमाना आहे.
वीस-पंचवीस वर्षांपूर्वी ऑप्टिशियन्सकडे(opticians) जाण्याचे प्रसंग क्वचित येत. त्यातही चाळिशीनंतरचा चष्म्याकडे आभूषण म्हणूनच पाहण्याची सवय. त्यामुळे साधी फ्रेम आणि त्याला सुयोग्य काचा , यापलीकडे वेगळा विचार नसे. फूल व्ह्यू (full view)आणि पेंटो (pento)अशा दोनच स्वरूपात तेव्हा चष्मे असत. त्या काळी फ्रेमही अगदी साध्या होत्या. काही वर्ष नायट्रेटपासून बनवलेल्या फ्रेमला अधिक मागणी होती ; पण त्या ' हायली फ्लेमेबल(highly flamable) ' असल्याने सरकारने त्यावर बंदी घातली. त्यानंतर , सर्व फ्रेम सेल्युलाइड (celluloid) स्वरूपात आल्या. त्यासाठी मोठे शिट येत , त्यातून फ्रेम(frame) तयार होत. यामध्ये , बराच भाग वाया जात असल्याने त्यापासून पुन्हा काही चष्मे बनविले जात आणि ते आरोग्यशिबिर , नेत्रशिबिरांत(eye) देत.
बायफोकल हा प्रकार भारतात रुजवण्याचे श्रेय भालचंद्र गानू आणि दादा गानू यांच्याकडे जाते. त्यांनी फ्यूज्ड पद्धतीने बायफोकलचे (bifocal)उत्पादन सुरू केले. बायफोकल काचा भारतात आणण्याचा मान गानू बंधूंना जातो. या काचांच्या चष्म्यांना तेव्हा सर्वाधिक मागणी होती. त्यानंतर , उन्हाचा त्रास कमी व्हावा म्हणून ' डे अँड नाइट ' काचांची मागणी वाढली. गॉगलसह अशा काचा चष्म्यामध्ये बसवून देण्यासाठी ऑप्टिशियन्सकडे रीघ लागू लागली. यामध्ये , स्वाभाविकच हिंदी चित्रपटसृष्टी आणि नेत्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी चित्रपट किंवा सभांमध्ये वापरलेला चष्मा किंवा गॉगलची (goggle)क्रेझ लगेच पसरायची. त्याच स्वरूपाचे चष्मे , गॉगलना पसंती असे. ही क्रेझ प्रत्येक पिढीत कायम असल्याचे दिसते. म्हणजे , ' बाजीगर ' मध्ये शाहरूख खानने वापरलेल्या गॉगलला अभूतपूर्व मागणी होती. अजूनही विचारणा होते ; परंतु आता तसे गॉगलच येत नाहीत.
गेल्या दहा-पंधरा वर्षांत या व्यवसायता आमूलाग्र बदल झाले. कम्प्युटरचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. कम्प्युटरवर सातत्याने काम करून डोळ्यांचे आजार होऊ नयेत , यासाठी ' झिरो नंबर ' चे चष्मे वापरण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला आयटी क्षेत्रातील बहुसंख्य तरुण-तरुणी याचा वापर करत. फॅशन तरुणांमध्ये पसरली , की त्याचा वेगाने विस्तार होतो. त्यामुळे नंबर नसूनही आकर्षक चष्मे ' स्कॉलर ' दिसण्यासाठी आणि अर्थातच ' इम्प्रेस ' करण्यासाठी वापरात येऊ लागले. कॉलेज लाइफमध्ये गॉगलची क्रेझ तर सर्वश्रुत आहेच. त्यामुळे ' रे-बॅन ' घेणाऱ्यांची चौथी पिढी सध्या अस्तित्वात आहे. त्याशिवाय आणखीही काही नवीन ट्रेंड निर्माण होत असतात. पूर्वी एखादा ट्रेंड पाच-दहा वर्षांपेक्षा अधिक काळ कायम राहायचा. मात्र , सध्या त्यामध्ये झपाट्याने बदल होतात. दोन-तीन वर्षांत नवा ट्रेंड रुजतो , त्याची मागणी वाढते. त्यानंतर पुन्हा एखादा नवीन ट्रेंड ' सेट ' होतो. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे फ्रेमपासून काचांच्या स्वरूपापर्यंत अनेक नवीन प्रयोग झाले. अल्ट्रा-व्हायलेट (यूव्ही) किरणांपासून संरक्षक काचांची निर्मिती झाली. काचांचे वजन , तुटफूट याला पर्याय म्हणून प्लॅस्टिक अर्थात सीआर ३९ या प्लॅस्टिकच्या चष्म्यांचा काचांचा वापर वाढला.
दृष्टीदोषावर चष्म्याऐवजी लेन्स वापरणाऱ्यांची संख्या आधी मर्यादित होती. त्यांची निगा राखणे , त्यांचा व्यवस्थित सांभाळ करणे जिकीरीचे असे. मात्र , काँन्टॅक्ट लेन्समध्येही आता खूप प्रगती झाली. त्यामुळेच वेगवेगळ्या ' आय कलर ' च्या लेन्सपासून ' डेली डिस्पोजेबल ' लेन्सपर्यंत वाटचाल झाली. आता २४ तास एक लेन्स लावून दुसऱ्या दिवशी दुसरी असा पर्यायही आहे. बायफोकल काचांमध्ये मर्यादा होती. म्हणजे फक्त दूर किंवा जवळ अशा दोन अंतराचेच काम त्यामुळे व्हायचे. आता दूर , जवळ आणि मधले अंतरसुद्धा स्वच्छ पाहण्याच्या प्रोग्रेसिव्ह-मल्टिफोकल काचा आहेत.
पूर्वी मेटल फ्रेम वापरणाऱ्यांची संख्या मोठी होती. विशेषत: , वरिष्ठ सरकारी अधिकारी , नेते आणि उच्चभ्रू अशा फ्रेम्सना प्राधान्य देत. मेटल फ्रेमबरोबर सध्या फ्रेमरहित (रिमलेस) चष्म्यांचा वापरही वाढला आहे. अनेक जगप्रसिद्ध कंपन्या भारतात अशा फ्रेम्स पुरवित आहेत. पूर्वी ऑप्टिशियन्सना स्वत: फ्रेम करण्यासाठी बराच वेळ लागे. आता सुधारणांमुळे या वेळेची बचत होत आहे. सर्व फ्रेम , काचा या रेडिमेड स्वरूपात येत असल्याने ऑप्टिशियन्सना ग्राहकांसाठी अधिक वेळ देता येत असून , त्यांना ' व्हॅल्यू अॅडेड ' सेवा पुरविण्याची संधीही मिळाली आहे.
डोळ्याच्या डॉक्टरांनी लिहून दिलेला नंबरचा चष्मा बनवून आणण्यासाठी , त्यासाठी फ्रेम , त्याच्या काचा सिलेक्ट करण्यासाठी आणि अगदीच कधी-कधी चष्मा दुरुस्त करण्यासाठी , तो तुटला असेल , तर बदलून घेण्यासाठी एवढ्यापुरतीच ऑप्टिशियन्सच्या दुकानाची पायरी चढावी लागत होती. आता मात्र ऑप्टिशियन्सच्या दुकानात ' आय टेस्टिंग ' ही होते. जुन्या काळातील काही गोष्टींचा वापर पुन्हा नव्या काळात केला जात असल्याची अनेक उदाहरणे सध्या आसपास दिसत आहेत. त्यामध्ये , चष्माव्यवसाय अपवाद कसा ठरेल ? त्यामुळेच जुन्या काळाप्रमाणे ' वे फेअरर ' ( अर्थात अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे फ्रेम) याची सध्या सर्वाधिक चलती आहे. या स्वरूपाच्या फ्रेम कॉलेज , कॉर्पोरेट ऑफिस , शिक्षणसंस्था अशा सगळ्या ठिकाणी दिसतात. पूर्वी केवळ स्थानिक ऑप्टिशियन्सकडे सर्वाधिक गर्दी असायची ; परंतु आता परदेशातील कंपन्यांची ऑप्टिशियन्सची ' चेन ' ( साखळी दुकाने) मोठमोठ्या शहरांत सुरू झाली आहेत. ऑप्टोमेट्रिस्टद्वारा डोळ्यांचा नंबर काढणे , ऑटोरीफ्रॅक्टोमीटरने डोळ्यांचा नंबर काढणे , या गोष्टी आता प्रचलित झाल्या आहेत.
देवाने मनुष्याला दिलेली दृष्टीची देणगी काही कारणाने कमजोर झाली किंवा त्यामध्ये दोष निर्माण झाला , तर त्याला पूरक म्हणून निर्माण झालेली ही चष्म्याची कृत्रिम दुनिया आता ' चष्मिश ' ' ढापण ' अशा खोचक विशेषणांच्यापुढे गेली आहे. कोणत्याही वयात डोळ्यांवर चष्मा असला , तरी आता भुवया उंचावत नाहीत. चष्मा म्हणजे नजरेला लागलेली ' दृष्ट ' नसून नेत्र कार्यक्षमता वाढविणारी दूर ' दृष्टी ' आहे...!

No comments:
Post a Comment