'मी' मी आहे. मी आज आहे.
याचे मला ठाम भान आहे. याचा सरलार्थ असा, मी माझ्यातल्या प्रस्तुततेचा शोध
सातत्याने घेणे. 'मी'वर चढलेली निरर्थक पुटे काढणे. मी वाढतोय, यात
प्रस्तुतता किती आहे हे तपासता आले पाहिजे. मला कुणीतरी अक्षरओळख करून
देते. मी कुणाला हाक देतो. मला अनाम साद येते. माझ्यातल्या गप्पपणाला आकार
येऊ पाहतो. तो मला कदाचित सहन होत नाही. मी मौनाचा भंग करतो. काहीही करू
बघतो. या साऱ्यात मला काही नेमके हवे असते ते व्यक्त करता येत नाही. मी नको
नको म्हणताना जे येते ते मी माझ्यात कशाला घेतोय तेच कळेनासे होते. मी
झापडबंद होतो. झापडीलाच विश्वाचा अधिपती समजतो. त्यामुळे त्याला आजची
प्रस्तुतता कळत नाही. आजची ग्राह्यता पचत नाही. कारण प्रस्तुतता सदैव
वर्तमानकाळाशी संबंधित असते. त्या आजचे मूल्य मला कळले पाहिजे. आज मी जो
जगतोय तो नव्या तंत्रज्ञानाच्या माऱ्यात नि नव्या आकर्षक जाहिरातींच्या
भोवऱ्यात. या साऱ्यात 'मी'ला कंपनी करून कुठेही व कसेही विकणे सुरू आहे.
'मी'ला खरी कंपनी हवीय ती आजच्या सार्थ विहंगमावलोकनाची. तांत्रिकतेच्या
अंध हव्यासापायी सृजनाचा डोह दूर राहतो. तंत्रालाच सर्जनशीलता मानून आज
दर्शन निर्माण करण्याऐवजी प्रदर्शनांचा सोस माजवीत आपण उठवळ उत्सवी झालो
आहोत. प्रदर्शनांच्या नावाखाली पैशाच्या उलाढालीने तृप्त व्हायचे. त्यामुळे
आजची संस्कृती काय आहे? सांस्कृतिक भान म्हणजे काय? यातले नेमके प्रश्न
काय आहेत ते समजावून घेणे मी आवश्यक मानले पाहिजे आणि मला स्वत:च्या काळाचे
मूल्यात्मक भान आले पाहिजे.
आज खरा समजला तो संतांना. संतांनी वर्तमान-काळाचा सूक्ष्म अभ्यास केला. 'स्व'त सर्वांचा 'स्वत:' ओळखला. स्वत: ज्या काळात वावरले त्या काळाच्या मागण्या त्यांनी अभ्यासू मनाने पूर्ण केल्या. या संदर्भात त्यांनी दोन बाबी प्रमाण मानल्या. एक, 'स्व'चे समग्र पक्के आकलन. दोन, परिस्थितीचे अचूक भान. यातून आज कळतो. 'अभ्यासोनि प्रकटावे' हे समर्थ रामदासांनी दिलेले आजचे भान सार्थ आहे. 'पै ज्ञान ते गा बरवे' हे संत ज्ञानदेवांचे जीवनाचे आजचे भान मोलाचे आहे. जगण्याचे सूत्र यात आहे. ज्ञानाने माणूस अंतर्मुख होतो. शिकण्यातून तो सामूहिक बनतो. संघटितपणाची जाणीव येते. सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर जे आघात-प्रत्याघात झाले, तेही अभ्यासता येतात. पारतंत्र्याच्या काळातल्या अभ्यासाची दिशा आणि स्वातंत्र्याच्या काळातले बदलते वातावरण याची मीमांसा 'आज करता येते. या मीमांसेची मीमांसा करता आली तर 'आज'ला किती परिमाणे आहेत हे लक्षात येते. 'आज' हा आपल्याला यातून किती किती देतोय याचा अंदाज घेता थक्क होतो. आजची विविधता विकसनशील आहे हेही ध्यानात येते. ती तितकीच जटिल आहे. 'आज' पूवीर्पेक्षा नको तिथे तीव्र संवेदनशील झाला आहे. संवेदनांचा धंदा झाला आहे.
हे सारे अनुभवून तरीही असे वाटते, अजून चैत्रपालवी आहे. विविध वृक्षांचा मोहोर आहे. पक्ष्यांचे पंचांग पहाटे वाचायला मजा येते. चैत्र येताच कोकिळ भल्या वासंतिक गारव्यात गातो. तांबडे फुटले की कोंबडे आरवते. फिरता फिरता खेड्यातल्या वाटेत हंबर ऐकू येतो. 'पाण्यासाठी दाही दिशा/ आम्हा फिरवीसी जगदीशा' असे म्हणण्याची 'आज'ची अवस्था आहे. तरीही माध्यान्हाच्या झळांत मातीत खेळणाऱ्या नागव्या बाळकृष्णाला बघितले की ऊन मौन ठरते. 'पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान,' अशी अंतर्मनाची हाक आतून येते. तुमचा विश्वास तुमच्यात निर्माण होतो. मुख्य म्हणजे आपण असल्याचे ज्ञान होते. नि हे जे माझ्या आसपास घडतेय ते ते आज आहे असे जाणवते.
माझ्या अस्तित्वाच्या असंख्य स्पर्शांना कधी कधी वावटळी येतात. त्यात मला दिसत नाही. मी माझे डोळे चोळतो. अडकलेल्या कचऱ्याला आतमध्ये घालतो. तो पुढे कुठे जातो ते कळेनासे होते. एखादे उमललेले फूल आपल्याच नादात पंचमहाभूतांशी खेळते. त्याचा खेळ नेणिवेत चालतो. फुलाला खुडू नये असे वाटते. फुलाला त्याचे काहीही नसते. तेव्हा तिथे एकच असतो. तो म्हणजे आज. फुलाला एक पक्के ठाऊक आहे. आज मी फुलतोय. बस. मला आनंद द्यायचा आहे. इतकेच. फुलाचा आज एवढा आपल्याला कळला तरी पुरे. किमान आपला कामचुकारपणा संपेल. मग पहा, आज सुंदर होईल. तो शिव होऊन तुमच्यात रमेल. फक्त आपण नितळ व्हाल ना?
- यशवंत पाठक

No comments:
Post a Comment