Wednesday, October 3, 2012

'राशीचक्र'कार आता नाटककार व कथाकारही Rashichakrakar Sharad Upadhye

गेल्या दहा वर्षांत रंगभूमीवर लोकप्रियतेचा विक्रम निर्माण केलेले ' राशीचक्र ' कार शरद उपाध्ये आता केवळ आध्यात्मिक/ज्योतिषविषयक पुस्तकलेखनावरच न थांबता , ललित लेखनाकडेही वळले आहेत! ते आता कथाकार आणि नाटककारही बनले आहेत...

बारा राशींनुसार माणसांच्या ढोबळमानाने बनत जाणाऱ्या स्वभावविशेषांचा विनोदाने परामर्श घेणाऱ्या ' राशीचक्र ' चा सोळाशेवा प्रयोग मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी मंदिरात सादर झाला. भारताचा केनियाबरोबरचा विश्वचषकासाठीचा क्रिकेट सामना त्या दिवशी असतानाही हा चमत्कार घडला. याबद्दलचे नवल प्रमुख पाहुणे-दूरदर्शनचे संचालक मुकेश शर्मा यांनी बोलूनही दाखवले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांच्या हस्ते या वेळी शरद उपाध्ये लिखित आणि स्वत:च्या रंगबहारतफेर्च प्रकाशित ' वंदना ' या कथासंग्रहाचे प्रकाशन झाले. ' जुन्या जमान्यातील प्रेमासाठी असीम त्याग करणाऱ्यांच्या , विरहाने व्याकुळणाऱ्यांच्या सोळा कथा यात संग्रहित करण्यात आल्या असल्याने , त्यातील नायिकांचे केस लांब लांब आहेत ' असा खुलासा लेखकाने (पुरुषांनी बायकांप्रमाणे लांब केस वाढवायच्या तर बायकांनी पुरुषांप्रमाणे तोकडे केस कापण्याच्या आजच्या जमान्याच्या संदर्भात) मिस्किलपणे केला..

याच वेळी ' ऑल दि बेस्ट ' या सदाबहार नाटकाचे दिग्दर्शक देवेंद पेम यांनी श्रोत्यांसमोर ती गोड धक्का देणारी घोषणा केली-उत्सवमूतीर् शरद उपाध्ये यांनी लिहिलेले ' प्रारब्ध ' हे दोन अंकी नाटक सध्या आपण दिग्दशिर्त करीत असून , ' राशीचक्र ' प्रमाणेच ' प्रारब्ध ' ही प्रेक्षकांच्या पसंतीस निश्चित उतरेल , असा विश्वास पेम यांनी व्यक्त करताच , टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

उपाध्ये यांची कन्या माधुरी देशपांडे यांनी रंगमंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे सपुष्प स्वागत केल्यानंतर , सूत्रसंचालक अशोक शेवडे यांनी , अन्य एक लोकप्रिय नाट्यकलाकार मच्छिंद कांबळी यांनाच प्रथम बोलण्याची संधी दिली.

' राशीचक्र ' द्वारे शरद उपाध्ये महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचले आहेत. तो कार्यक्रम ऐकणाऱ्या प्रत्येकालाच तो कार्यक्रम आपलाच वाटतो , यातच उपाध्ये यांच्या या एकपात्री कार्यक्रमाचे यश सामावले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे सोळाशेच काय-सोळा हजार प्रयोग जरी झाले , तरी ते असेच हाऊसफुल्ल होत राहतील ,' असा विश्वास कांबळी यांनी व्यक्त केला. भजनसम्राट अनुप जलोटा यांनी आपली दोन लोकप्रिय गाणी गाऊन उपाध्ये यांना स्वरवंदना दिली.

नरसोबाच्या वाडीला अध्यात्म भवन बांधून तिथे रुदयागादी कार्यक्रम करणाऱ्या उपाध्ये यांच्याप्रमाणेच दत्तभक्त असलेले मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे मुंबईभेटीला आलेल्या पंतप्रधानांच्या गडबडीतूनही वेळ काढून या कार्यक्रमाला आले होते. ' उपाध्ये यांच्या लोभातून गतवर्षी वाडीला जाण्याचा योग आला आणि यंदा त्या पुण्याईने मुख्यमंत्रीपद लाभले ' असे मन:पूर्वक सांगून ' प्रेक्षकाला खदखदून हसवणारा राशीचक्र हा कार्यक्रम ज्योतिषविषयक असला तरी , उपाध्ये त्याद्वारे अंध:श्ाद्धा जोपासत नाहीत ; उलट ते प्रेक्षकांना कर्तव्यपरायणतेचा संदेश देतात ,' असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. निरूपा उपाध्ये यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive