Monday, October 22, 2012

एका मिनिटात १०० अब्ज फोटो - Ramesh Raskar: Imaging at a trillion frames per second


Ramesh Raskar: Imaging at a trillion frames per second


एका मिनिटात १०० अब्ज फोटो


रमेश रासकर यांचा अभिनव प्रयोग


फोटोमध्ये आपल्याला पाहिजे तो क्षण टीपता येणं हे खऱ्या अर्थाने कौशल्य असतं . पण हे कौशल्य सगळ्यांनाच अवगत नसते . यावर आता टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तोडगा काढण्यात येणार असून रमेश रासकर यांनी प्रकाशाच्या वेगाने फोटोग्राफी करण्याची अनोखी संकल्पना मांडली आहे . यामध्ये एका मिनिटात १०० अब्ज फोटो काढण्याचे ध्येय आहे .

एका मिनिटात फोटो या जाहिरातींनी एकेकाळी सर्व फोटो स्टुडिओंचा दर्शनी भाग झाकला जायचा . मात्र डिजिटल कॅमेऱ्यांनी याचे मार्केट कमी केले . यानंतर अनेक अनोखे संशोधन होऊ लागले . पण या सर्वांच्या पलीकडे जाऊन रासकर यांनी एक मिनिटात १०० अब्ज फोटो काढता येऊ शकतील , अशी अनोखी संकल्पना मांडली . त्यांच्या या संकल्पनेमध्ये अमेरिकेतील मँचेस्टर इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीने ( एमआयटी ) रस दाखवला आहे . यासाठी त्यांना अभ्यासवृत्तीही देण्यात आली आहे .

प्रकाशाच्या वेगाला आव्हान देण्याचे अनोखे काम रासकर यांनी केल्याचे तेथील तज्ज्ञांचे म्हणणे आहे . रासकर यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेतील तज्ज्ञांची टीम हा अनोखा कॅमेरा बनवण्याची कामगिरी पार पाडत आहेत . रासकर यांनी मागील आठवड्यात टेकफेस्टच्या निमित्ताने मुंबई आयआयटीला भेट दिली आणि ही संकल्पना पुन्हा एकदा भारतीय विद्यार्थ्यांच्या समोर मांडली . त्यांच्या या व्याख्यानाला सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती .

वाइल्ड लाइफ फोटोग्राफीसाठी उपयुक्त

रासकर हे २००४पासून एमआयटीच्या कॅमेरा कल्चर ग्रुपमध्ये काम करत आहेत . त्यांनी कॅमेऱ्याचे अनेक पैलू शोधून काढले असून त्यातील सुमारे ४० संशोधनांवर त्यांचे स्वतःचे पेटंट आहेत . त्यांनी सर्वप्रथम नेत्र नावाचे मोबाइल डिवाइस बाजारात आणले आहे . यामध्ये आपण मोबाइलवरूनच आपण चष्म्याचा नंबर काढू शकतो . याशिवाय थ्रीडी कॅमेरा , लाइट फिल्ड कॅमेरा , स्कॅन मशीन अशा अनेक कॅमेऱ्यांचे त्यांनी संशोधन केले आहे . आता काम सुरू असलेल्या संशोधनामध्ये फोटॉन इमेजिंग टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे . यामुळे सेकंदाला १०० अब्ज फोटो काढता येणे शक्य होणार आहे . या कॅमेऱ्यात प्रत्येक क्षण टिपता येणार आहे . याचा सर्वाधिक फायदा वाइल्ड लाइफ फोटोग्राफीसाठी होईल , असे रासकर यांचे मत आहे .

टीईडीच्या व्हिडीओवर १० लाख हिट्स

इनोव्हेटिव्ह लोकांसाठी हक्काचं व्यासपीठ असलेल्या ' टीईडी ' या आंतरराष्ट्रीय फोरमवर रासकर यांनी केलेल्या व्याख्यानाला उपस्थितांनी तर दाद दिलीच , याचबरोबर या साइटवरील व्हिडीओला नऊ लाख ५५ हजार १३३ हिट्स मिळाल्या आहेत . यूट्युब आणि इतर व्हिडीओसाइटसचा रेकॉर्ड पाहिला तर हिट्सची ही संख्या दुप्पट होईल .

आयआयटीत कुतुहल

आयआयटीमध्ये झालेल्या व्याख्यानात विद्यार्थ्यांनी एकामागून एक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली . यामध्ये २० वर्षांनी कॅमेऱ्याचा डिस्प्ले कसा असेल , तुमच्या या कॅमेऱ्यामुळे नेमका काय फरक पडेल , फोटोशॉप २०३० नेमके कसे असेल , चित्रपट निर्मिती , बातम्यांचे वृत्तांकन यामध्ये काय फरक होईल अशा प्रश्नांचा समावेश होता . या प्रश्नांना रासकर यांनी समर्पक उत्तरे दिली

Ramesh Raskar presents femto-photography, a new type of imaging so fast it visualizes the world one trillion frames per second, so detailed it shows light itself in motion. This technology may someday be used to build cameras that can look “around” corners or see inside the body without X-rays.
Photography is about creating images by recording light. At the MIT media lab, professor Ramesh Raskar and his team members have invented a camera that can photograph light itself as it moves at, well, the speed of light.

Why you should listen to him:

In 1964 MIT professor Harold Edgerton, pioneer of stop-action photography, famously took a photo of a bullet piercing an apple using exposures as short as a few nanoseconds. Inspired by his work, Ramesh Raskar and his team set out to create a camera that could capture not just a bullet (traveling at 850 meters per second) but light itself (nearly 300 million meters per second).
Stop a moment to take that in: photographing light as it moves. For that, they built a camera and software that can visualize pictures as if they are recorded at 1 trillion frames per second. The same photon-imaging technology can also be used to create a camera that can peer "around" corners , by exploiting specific properties of the photons when they bounce off surfaces and objects.
Among the other projects that Raskar is leading, with the MIT Media Lab's Camera Culture research group, are low-cost eye care devices, a next generation CAT-Scan machine and human-computer interaction systems.
Papers:
Andreas Velten, Thomas Willwacher, Otkrist Gupta, Ashok Veeraraghavan, Moungi G. Bawendi and Ramesh Raskar, “Recovering ThreeDimensional Shape around a Corner using Ultra-Fast Time-of-Flight Imaging.” Nature Communications, March 2012
Andreas Velten, Adrian Jarabo, Belen Masia, Di Wu, Christopher Barsi, Everett Lawson, Chinmaya Joshi, Diego Gutierrez, Moungi G. Bawendi and Ramesh Raskar, "Ultra-fast Imaging for Light in Motion" (in progress). http://femtocamera.info
"Though photographs in the near future will still be composed by people holding cameras, it will gradually become more accurate to say pictures were computed rather than 'taken' or 'captured.'"
Popular Photography magazine

1 comment:


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive