Saturday, October 20, 2012

१० ‘मस्ट’ आर्थिक गोष्टी - 10 must know Financial Matters

असे म्हणतात , आयुष्यात दोनच गोष्टी निश्चित असतात , मृत्यू (death)आणि कर(tax) . त्यामुळे आपल्या आर्थिक बाबींची पूर्तता करत असतानाच , आपल्या मृत्यूनंतर कुटुंबियांचे काय होईल , हाही विचार करायला हवा . त्यांना आपल्या इच्छा सांगण्याबरोबरच , आर्थिक बाबतीतील काही तपशीलही कळणे गरजेचे आहे . या विषयीच्याच १० टिप्स .

सर्व मालमत्ता जबाबदाऱ्या यांचा आढावा घ्यावा

सर्वप्रथम , आपल्या सर्व मालमत्तांची ( घरातील घराबाहेरील ) जबाबदाऱ्यांची यादी करावी . ही यादी दरवर्षी अपडेट करावी , जेणे करून आपल्या मृत्यूनंतर कुटुंबियांना कोणतीही अडचण येणार नाही . या मालमत्तेत दागिने , रिअल इस्टेट अशा भौतिक , तसेच बँक खाती , पीएफ खाते , ‌ इन्शुरन्स योजना अशा वित्तीय मालमत्तांचा समावेश असेल . आपल्या नावावरील कर्जांचाही आढावा घ्यावा . हा सगळा तपशील आपला जोडीदार आपल्या संपत्तीची काळजी घेणाऱ्यालाही द्यावा .

जबाबदाऱ्यांना कवच (cover to responsibilities)
सर्व जबाबदाऱ्यांसाठी पुरेसे विमाकवच असल्याची खात्री करावी . भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी किती पैशांची गरज आहे , याचाही अंदाज घ्यावा .

कर्जाचे व्यवस्थापन (loan management)

कर्ज हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे , पण त्यातून बाहेर कसे पडायचे याची कल्पना असते . त्यामुळे जास्त खर्चिक कर्ज वेळेत पूर्ण करावे जेणे करून आपल्या पश्चात कुटुंबियांना त्याचा त्रास होणार नाही . कर्जाचा हप्ता भरणे शक्य होत असले तरी मोठे कर्ज असणे हे शेवटी आर्थिक ओझ्यासारखेच असते . यामुळे आपल्या आर्थिक घोडदौडीला लगाम बसू शकतो . त्यामुळे चिंतामुक्त राहण्यासाठी कर्जाचा भार शक्य तितका लवकर हलका करावा . तसेच , आपण कर्जासाठी जितकी रक्कम भरावी लागते आहे , त्यापेक्षा कमी उत्पन्न गुंतवणुकीतून मिळत असेल तर आपल्या पोर्टफोलिओतून कर्जाचे प्रमाण कमी करून योग्य संतुलन साधावे .

मालमत्तांशी संबंधित तपशिलाची खातरजमा (Property)

अनेकदा महिलांच्या काही मालमत्ता त्यांच्या लग्नापूर्वीच्या नावावर असतात . मालमत्तांवर योग्य नाव अचूक पत्ता असल्याची खात्री करणे आवश्यक आहे . काही वेळा , नोकरी वा घर बदलल्यावर ईपीएफ खात्यामध्ये अन्य गुंतवणुकीमध्ये माहिती अपडेट करणे राहून जाते . नंतर त्रास होऊ नये म्हणून आवर्जून असे तपशील अपडेट ठेवणे .

मालमत्तांचा मालकीहक्क तपासावा (ownership)

मालमत्तांचा मालकीहक्क स्पष्ट करण्यात दिरंगाई झाल्यास नंतर गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात . त्यामुळे मालमत्तेचा हक्क आपल्या जोडीदाराकडे वा प्रौढ अपत्याकडे हस्तांतरित करायचा असेल आपले खाते त्यांच्यासोबत संयुक्त खाते करून घ्यावे आणि त्यांना संयुक्त वा दुसरा खातेधारक म्हणून ' सर्व्हायव्हरशिप ' चा अधिकार द्यावा .

सगळ्या अकाउंट्सचा आढावा (bank accounts)

कालबाह्य सॅलरी अकाउंट , खास सवलत संपलेले क्रेडिट कार्ड , बँकेने दिलेले डिमॅट अकाउंट अशी अनावश्यक खाती सुरू ठेवून त्यांची विनाकारण जबाबदारी घेण्यापेक्षा त्यांच्याबाबत योग्य तो निर्णय वेळीच घेतलेला बरा .

मृत्यूपत्र बनवणे (will)

मालमत्तेचा वारस निश्चित करून आणि मालमत्तेवर अचूक नावे चढवली असली तरी नंतर काहीही वाद होऊ नयेत म्हणून मृत्यूपत्र करायला हवे . आपल्या वारसांविषयी कसलीही अस्पष्टता यामुळे बाकी राहत नाही . परंतु , कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून मृत्यूपत्रांची नोंद करण्यास विसरू नये .

ट्रस्टचा विचार करावा (trust)

अनेक व्यावसायिकांना वैयक्तिक मालमत्ता आणि बिझनेससंदर्भातील मालमत्ता यांच्यामध्ये अंतर राखता येत नाही . यातून नवे वाद निर्माण होतात . अशा व्यक्तींना ट्रस्टची निर्मिती करण्याचा पर्याय विचारात घेता येईल . वारसाहक्काबाबतही ट्रस्टची मदत होऊ शकते .

आणीबाणीसाठी तरतूद (Emergency)

किमान ते महिन्यांसाठीच्या खर्चाची रक्कम आणीबाणीसाठी तरतूद म्हणून वेगळी काढून ठेवावी . हा निधी मनी मार्केट फंडाच्या रुपातही ठेवता येईल . गरज असेल तेव्हा तो उपलब्ध होऊ शकेल .

कुटुंब संबंधितांशी संवाद (family communication)

आपल्या जवळच्या व्यक्तींशी मोकळेपणे संवाद साधला तर आपल्या मृत्यूनंतर होणारे अनेक संघर्ष कटकटी टाळता येतील . तुमच्या इच्छा , महत्त्वाची कागदपत्रे ठेवलेली ठिकाणे , वारसाची निवड आदीबाबत त्यांना अगोदरच सांगून ठेवलेले बरे . रिटायरमेंट अकाउंट्स आणि त्यातून मिळणारे फायदे याविषयीही तुमच्या कुटुंबाला माहीत असावे , जेणे करून तुमचा मृत्यू ओढवल्यास कुटुंबाला या गुंतवणुकीचा फायदा मिळेल .

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive