Saturday, October 20, 2012

Kunal Kapoor interview




पूर्वी हिरोइनपेक्षा जास्त भाव असायचा तो हिरोलाच. पण हल्ली हिरोइनबेस्ड सिनेमेच जास्त येऊ लागलेत. त्यामुळे आता हिरोंपेक्षा हिरोइन्सची क्रेझ वाढली आहे...सांगतोय अभिनेता कुणाल कपूर.

वाढदिवसाच्या दिवशी तुझा सिनेमाही प्रदर्शित झालाय.

वाढदिवस आहे म्हटल्यावर सगळ्यांनाच आनंद होतो. पण यावेळी वाढदिवसाबरोबरच १९ ऑक्टोबरला माझा ' लव शव ते चिकन खुराना ' हा सिनेमा रिलीज होतोय. त्यामुळे माझा आनंद द्विगुणीत झाला आहे. या सिनेमाचं प्रदर्शन हेच माझ्यासाठी यावेळचं मोठं गिफ्ट आहे.

आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिकांमधून तू लोकांसमोर आला असलास तरीही ' हिरो ' म्हणून एकही सिनेमा तू केला नाहीस.

माझ्या आगामी चित्रपटातून मी हिरो म्हणून लोकांसमोर येतोय. त्या व्यतिरिक्त मी असं सांगेन की , मला वेगवेगळ्या भूमिका करायला खूप आवडतात. त्यामुळे एखाद्या सिनेमात माझी भूमिका हिरोची नसली आणि हट के असली तरीही ती मी स्वीकारतो. मी स्वतःला नशीबवान समजतो की मी केलेल्या छोट्या आणि वेगळ्या भूमिका अजूनही लोकांच्या आठवणीत असून मी त्यांचा लाडका आहे.

इतकी वर्ष होऊनही बॉलिवुडमधल्या ' खान्स ' ची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. एक तरुण अभिनेता म्हणून तू याकडे कसं पाहतोस ?

फक्त ' खान्स ' नाही , पण चाळीशीतल्या अभिनेत्यांची लोकांवर वेगळीच छाप आहे. त्यामुळे कितीही नवीन चेहरे आले तरी त्यांची क्रेझ कायम राहणार. कारण त्यांनी जेव्हा सिनेमात पदार्पण केलं तेव्हा हिरोइनबेस्ड सिनेमे नव्हतेच. हिरोइन्सपेक्षा हिरोचं कामच महत्त्वाचं असायचं. पण हल्ली हे चित्रं बदलत चाललंय. आता हिरोइनबेस्ड सिनेमे जास्त येतायत. त्यामुळे आज-काल हिरोंपेक्षा हिरोइन्सची क्रेझ वाढलीय. अभिनेत्यांचं असं नाही. जुन्या अभिनेत्यांची छाप कमी करण्यात आम्हाला काहीही रस नाहीय. उलट आम्हाला नवीन छाप पाडायची आहे. आणि त्यासाठी आम्ही कष्ट घेतोय. म्हणून तर या स्पर्धेत मी , रणबीर कपूर , इम्रान खान , इम्रान हाश्मी , आम्ही टिकून आहोत.

नवीन पिढी सिनेमांच्याबाबतीत खूप चूझी आहे का ?

सध्या सिनेसृष्टीत स्पर्धा एवढी वाढलीय की , स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध करायचं असेल तर थोडं तरी चूझी असावं लागतं. तरच आपण या स्पर्धेत टिकून राहू शकतो. पण मी खरंच इतका चूझी नाहीय. मला जी भूमिका मनोरंजक वाटते ती मी स्वीकारतो. मग माझा रोल एकदम छोटा जरी असला तरी मला ती भूमिका आकर्षक वाटली तर ती मी करतो.

तुझ्या ' लव्ह शव ते चिकन खुराना ' मधल्या भूमिकेविषयी सांग.

या सिनेमात मी हिरोचा रोल करतोय. यात माझी भूमिका साधारण ' मिठी छुरी ' सारखी आहे. एक त्रासलेला स्वार्थी माणूस जो घर सोडून जातो आणि त्याला १० वर्षांनंतर परत त्याच्या घरी यावं लागतं अशी काहीशी माझी भूमिका आहे. मग तो घरी परत का येतो आणि नंतर काय होतं हे यात बघायला मिळेल.

अभिनयाव्यतिरिक्त तुझे छंद काय आहेत ?

मला लिखाणाची खूप आवड आहे. त्याशिवाय रॅली ड्रायव्हिंग , फ्लाइंग असे वेगळ्या प्रकारचे साहसी क्रीडाप्रकार करायला मला आवडतात.

मराठी सिनेसृष्टीबद्दल काय सांगशील ?

मराठी सिनेसृष्टी संस्कृतीचा ठेवा जपणारी आहे. मला त्याविषयी खूप आदर वाटतो. सध्या मराठी सिनेजगतात एक सो एक विषय घेऊन दिग्दर्शक सिनेमे बनवतायत याचं मला खूप कौतुक वाटतं. एवढंच नाही तर मराठीमध्ये अप्रतिम अभिनय करणारे कलाकार आहेत. म्हणूनच आज-काल हिंदी सिनेमांनासुद्धा मराठी कलाकारांची गरज भासते.

 

तुझा ड्रीम रोल कोणता ?

' शोले ' सिनेमातली कोणतीही भूमिका मला कधीही करायला आवडेल. अगदी त्या बसंती घोडीचा रोलसुद्धा मी आनंदाने करेन. 


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive