Friday, April 2, 2010

आपला पासवर्ड कसा असावा?



 

आपला पासवर्ड कसा असावा?

आपला पासवर्ड काय असावा हे ज्याने त्याने आपल्या आवडीनुसार ठरवावे.

प्रत्येकाला आपला पासवर्ड योग्य आहे आणि शक्यतो तो कुणाला कळणार नाही असेच वाटते. परंतू आपला पासवर्ड योग्य आहे आणि तो कुणाला कळणार नाही असा गैरसमज कधीच करुन घेवू नये. थोडावेळ जर तुम्ही तुमच्याच पासवर्डचा विचार केल्यास आपणास कळेल कि तो किती सोपा आहे, कारण आपला पासवर्ड म्हणून आपण हा शक्यतो कुणाचे ना कुणाचे नाव दिलेले असते.

सर्वसाधारणपणे एखादे नाव पासवर्ड म्हणून वापरले जाते. निदान ८०% पासवर्ड तरी कुणाच्या ना कुणाच्या नावाचे असतात.

असे कधीही गृहित धरु नये कि आपला पासवर्ड कधिच कुणी शोधू शकणार नाही. आपण जर आपला पासवर्ड म्हणून असेच एखादे नाव वापरले असेल तर तुमचा पासवर्ड तुमच्या सोबत काम करणारी अथवा जवळची व्यक्ति पटकन तुमचा पासवर्ड शोधून दाखवेल.

याचा अर्थ आपला पासवर्ड म्हणून निरनिराळी अक्षरे आणि अंक तसेच सांकेतिक चिन्ह असलेला असावा असा होत नाही. आपला पासवर्ड म्हणून एखादे नाव देण्यामागचा अर्थचमूळी असा असतो कि तो लगेच लक्ष्यात रहावा. परंतू जर एखाद्याचे नाव जर पासवर्ड नसावा तर मग लगेच लक्ष्यात राहील असा पासवर्ड निवडावा तरी कसा? असा प्रश्न निर्माण होतो.

चांगला पासवर्ड असा द्यावा : - निरनिराळी अक्षरे आणि अंक तसेच सांकेतिक चिन्ह वापरुन किचकट पासवर्ड निवडण्याएवजी आपणास हवे असलेले एखादे नावच पासवर्ड म्हणून वापरावे, परंतू त्याच नावामध्ये ' $ '  किंवा ' # '  चिन्ह वापरावे.  उदा. जर तुमचा पासवर्ड ' mahesh'  असल्यास ' mah#esh '  किंवा ' mahesh$ '  असा पासवर्ड द्यावा.  अशाप्रकारे आपला पासवर्ड सोपा आणि सहजासहजी कुणाला न कळण्यासारखा होतो.

टीप : शक्यतो आपला पासवर्ड आठ अंकी असावा, कारण सध्या जवळजवळ सर्वच ठिकाणी किमान आठ अंकी असावा लागतो, म्हणून ऐनवेळी काय पासवर्ड द्यावा हे ठरविण्यापेक्ष्या आपला पासवर्ड आठ अंकी तसेच त्यामध्ये ' $ '  किंवा ' # '  चिन्ह असलेला असावा.


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive