Tuesday, April 27, 2010

श्रमप्रतिष्ठा

श्रमप्रतिष्ठा

बऱ्याच बंगल्यांवर 'श्रमसाफल्य' असे नाव दिलेले आढळते. असे नाव बघितल्यावर कुणाचे श्रम कुठे सफल झाले हा एक मोठा प्रश् पडतो. "इच्छापूर्ती' असे म्हटल्यास बंगल्याच्या मालकाची इच्छा पूर्ण झाली असे म्हणता येते पण श्रम केले एकाने आणि त्याची सफलता दुसऱ्याच्या नावावर, असे काहीसे विचित्र भाव 'श्रमसाफल्य' हे नाव वाचल्यावर मनात येतात.

श्रम वा कर्म केल्याशिवाय कुणालाच राहता येत नाही. प्रत्येकाने श्रम करावेतच. जीवन चालविण्यासाठी आवश्यक असते ती उपजीविका आणि उपजीविकेसाठी कुठले तरी काम करणे आवश्यक असतेच. उपजीविकेसाठी लागते अन्न, वस्त्र, निवारा पैसा आणि हे मिळविण्यासाठी करावे लागते काम. उपजीविका या शब्दातील 'उप' शब्दाचा अर्थ 'दुय्यम' असा आहे. मग मनुष्याची मुख्य जीविका कोणती? मुख्य जीविका योग्य तऱ्हेने निभावण्यासाठी लागते करुणा, प्रेम, श्रद्धा, सेवा समाधान आणि हे गुण मिळविण्याचा प्रयत्न केल्यास जीवन व्यर्थ जाते.

मनुष्यमात्राने कर्माचा विचार करताना 'धर्म' म्हणजे कर्मकांड, 'अर्थ' म्हणजे केवळ पैसा मिळविणारे कर्म, 'काम' म्हणजे शरीर मन यांना सुखविणारे कर्म हा विचार करून मोक्षासाठीचे कर्म म्हणजे ज्ञान अनुभव मिळविणे हे सवड मिळाल्यास करावयाचे म्हणून शेवटी बाजूला ठेवले. जीविकेचे अधिष्ठान असल्याशिवाय उपजीविका उपयोगाची नाही. कर्म नैतिकतेवर आधारितच हवे आणि असे कर्म करताना घडणाऱ्या श्रमांचा परिहार करण्याची योजना प्रत्येकाने विचारात घेतली पाहिजे. प्रत्येक व्यवसाय करत असताना त्यात श्रम अभिप्रेत असतातच. त्याचे आरोग्यावर चांगले-वाईट परिणामही होत असतातच. आरोग्य टिकवता आले नाही तर उपजीविकेचे साधन म्हणून केलेले श्रम मुख्य जीविताच्या आड येतात. म्हणून आयुर्वेदानुसार प्रत्येकाने स्वतःची प्रकृती समजून घेऊन आहार-विहाराची योजना करावी. आहाराचे महत्त्व आपण समजू शकतो. त्याकडे लक्ष दिलेही जाते, कारण चुकीचे खाल्ल्यानंतर पोट ताबडतोब बिघडते. तसेच अमुक एका रोगात अमुक आहार चालणार नाही याची माहिती लगेच मिळते. परंतु, विहाराच्या बाबतीत औदासिन्य दिसून येते. फिरायला जाणे, चालणे आरोग्यासाठी चांगले असले तरी काही विशिष्ट परिस्थितीत चालणे जमत नाही. अशा स्थितीत चालणे टाळल्यासच आरोग्य टिकू शकते. कोणासाठी सायकलिंग करणे चांगले असते तर कोणासाठी जिममध्ये जाणे चांगले असते. कोणी पळावे वा कोणी कुठल्या प्रकारचे व्यायाम करावेत हे प्रकृती पाहूनच ठरवावे लागते. योग आणि प्राणायाम हे प्रकार सर्व लोकांना जमण्यासारख्या विहारात मोडतात. पण, त्यातही कुठले प्रकार वा कुठल्या पद्धती आपल्यासाठी योग्य आहेत हे ठरवावेच लागते. अनेकदा या साऱ्या विषयांतही सर्वसामान्यांमध्ये बरीच जागरूकता दिसते. पण व्यवसाय कुठला निवडावा याबाबतीत मात्र आरोग्याच्या अंगाने विचार केलेला नसतो.

ज्या व्यवसायात कीर्ती, प्रसिद्धी, मान पैसा खूप खूप मिळेल असा व्यवसाय चांगला असे समजून प्रत्येक जण काही विशिष्ट व्यवसायांच्या मागे लागलेले दिसतात. त्यामुळे ऊठ सूट प्रत्येक जण इंजिनिअर वा डॉक्टर होतो किंवा 'आयटी'च्या मागे लागतो. त्या व्यवसायामुळे आरोग्याला होणारे धोके समजून घेतलेले नसतात. उन्हात कोणी काम करावे, भट्टीजवळ कोणी काम करावे, डोंगरावरची हवा कोणाला मानवेल समुद्राच्या जवळ कोणी व्यवसाय निवडावा या दृष्टीने विचार करणे आवश्यक असते. त्यातल्या त्यात शारीरिक श्रम करणाऱ्या लोकांच्या आरोग्याचा विचार करणे खूपच आवश्यक असते.

डोक्यावर वजन उचलणे चांगले का? डोक्याचा उपयोग सहसा वजन उचलण्यासाठी करायला लागू नये. अशा तऱ्हेने वजन उचलावे लागू नये म्हणून बऱ्याच प्रगत राष्ट्रांमध्ये वेगवेगळ्या यंत्रांचे शोध लागलेले दिसतात. परंतु, डोक्यावर वजन वाहण्याची वेळ आलीच तर काय काळजी घ्यावी याचा विचार करणे आवश्यक आहे. कोणत्याही कठीण गोष्टीचा डोक्याला स्पर्श होऊ नये म्हणून डोक्यावर मऊ वस्त्र घेतल्याशिवाय डोक्यावर ओझे ठेवू नये. मेंदूला आणि मस्तकाला पूरक गोष्टी आहारात अवश् ठेवाव्यात. रात्री झोपताना चुकता नाकात कानात तुपा-तेलाचे थेंब टाकावेत. टाळूवर आयुर्वेदिक 'संतुलन ब्रह्मलीन तेल' किंवा नुसते एरंडेल तेल चोळावे.

डोक्यावर ओझे उचलावे लागलेच तर मानेचे स्नायू कडक होतील इतका वेळ उचलू नये. रात्री झोपण्यापूर्वी पाठीवर 'संतुलन कुंडलिनी तेल' चोळावे. प्रत्येक कारखान्यात बांधकामक्षेत्रात सामानाची वाहतूक करावी लागतेच. त्यासाठी श्रम करावे लागतात. शेतात आणि बांधकामक्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना बऱ्याच अंगमेहनतीचे काम करावे लागते. त्यांना अशा कामाची सवय झाली असे वाटले तरी त्यांनाही शरीराची काळजी घेणे आवश्यक असतेच. त्यांनी स्वतःच्या शरीरप्रकृतीनुसार डॉक्टरांना भेटून सल्ला घेऊन त्यानुसार वागणे योग्य ठरते. त्यांना कामावर ठेवणाऱ्यांनी त्यांच्यासाठी अशा तपासणीची योजना करून त्यांना सल्ला मिळेल याकडे लक्ष देणेही आवश्यक ठरते.

संगणकासमोर काम करणाऱ्यांना संगणकाच्या चकाकणाऱ्या पडद्याचा त्रास होऊ नये यासाठी डोळ्यात काजळ घालणे, रात्री झोपताना डोळ्यांवर गुलाबपाण्याच्या घड्या ठेवणे, शरीरात थंडाई येण्यासाठी दूध-साखर वा 'संतुलन पित्तशांती'सारखे पित्तशामक द्रव्य घेणे आवश्यक असते.

शिक्षक, लेक्चरर्स, प्रोफेसर्स, वकील या व्यवसायातील लोकांना खूप बोलावे लागत असल्यामुळे त्यांनी रोज वा आठवड्यातून काही दिवस हळद-मीठ टाकून गरम पाण्याने गुळण्या करणे, सीतोपलादी सारखे चूर्ण तूप-मधाबरोबर घेणे, दिवसातून काही तास तरी बोलणे इत्यादी पथ्ये पाळणे आवश्यक असते. वकिलीसारख्या व्यवसायात खऱ्या-खोट्याची चर्चा असते आणि खूप मानसिक ताण येऊ शकतो. अशा व्यक्तींनी मेंदूसाठी 'संतुलन शतदाम' सारखा शतावरी बदामयुक् पौष्टिक कल्प घेणे, सुवर्णाचा प्रक्षेप झालेला 'संतुलन आत्मप्राश'सारखा एखादा कल्प घेणे आणि मेंदूला उपयोगी पडतील अशा रसायनांचे सेवन करणे आवश्यक असते. कफप्रकृतीच्या व्यक्तीने बैठी कामे अधिक करू नयेत. तसेच वातप्रकृतीच्या व्यक्तीने जास्त फिरतीची कामे करू नयेत.

व्यवसायातून उद्भवणारे अनेक प्रकारचे शारीरिक अपाय टाळण्यासाठी ते कर्म कसे करावे याचे प्रशिक्षण नक्की घ्यावे. साधे रस्ता साफ करण्याचे काम असले तरी तो कमीत कमी शारीरिक श्रमात, बसून किंवा वाकून कसा झाडावा हे शिकून घेणे गरजेचे असते. व्यवसायामुळे होणारे आजार टाळणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे काम करणे आवश्यक असते. अन्यथा, उपजीविकेचे साधन जीवन नष्ट करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.

व्यावसायिक आजाराचा विचार करीत असताना श्रम करण्यासाठी फुप्फुसांच्या ताकदीची खूप आवश्यकता असते. शरीर सुंदर सुदृढ असले पण फुप्फुसांमध्ये ताकद नसली, छाती फुगण्याची क्षमता नसली तर श्रम करणे जमत नाही. धुळीचे कण अधिक प्रमाणात असणाऱ्या ठिकाणी काम करावे लागल्याने बऱ्याच वेळा अनेक जण फुप्फुसांच्या विकाराने आजारी पडतात असे दिसते. दुधासरखे एखादे पेय घेऊन यासारखा त्रास टाळण्याचा प्रयत्न करता येतो. तसेच कारखान्यातून येणारा धूर, उडणारे रंगाचे कण किंवा लाकूड कापण्याच्या कारखान्यात उडणार धुरळा यामुळे फुप्फुसांची क्षमता कमी होते. हे सारे घटक फुप्फुसांच्या विकाराला कारणीभूत ठरतात. अशा वेळी आधीच दम्यासारखा विकार असला तर श्रम करण्यास अडचणी येणे साहजिक असते. त्यासाठी नाका-तोंडावर फिल्टर बांधून काम करणे योग्य असते. अशा व्यक्तींनी प्राणायामासारखा श्वसनप्रकार नियमित केल्यास अशा त्रासांपासून दूर राहता येणे शक् असते.

एकंदरीत श्रमप्रतिष्ठा जपण्यासाठी कामातील नैतिकता आणि शरीराचे आरोग्य जपणे आवश्यक असते.

 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive