Tuesday, April 27, 2010

जीवनदायी रक्‍त

जीवनदायी रक्‍त

जलांश म्हणजे जीवन हा जगातल्या प्रत्येक घटकाला लागू असणारा न्याय लक्षात घेतला तर, रक्त हे आपल्या जीवनाशी इतके निगडित का हे लक्षात येऊ शकते. रक्तात निर्माण झालेले दोष शरीरावर विविध प्रकारे व्यक्त होतात. म्हणून मुळात रक्तातच दोष निर्माण होऊ नयेत यासाठी काळजी घेतली जायला हवी.

पुराणांतरी अशी गोष्ट सापडते की युद्धात एका राक्षसाचा वध करणे खूप अवघड होते कारण युद्ध करते वेळी जमिनीवर पडलेल्या त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून पुन्हा राक्षस उत्पन्न होत असे. पुराणातील असा राक्षस दूषित रक्ताचा, कुठल्यातरी व्हायरसचा निदर्शक असतो. शुद्ध रक् म्हणजेच जीवन रक्तामुळेच जीवनातील आनंद असतो. माणसा-माणसातील स्नेह ह्या ओलाव्यामुळेच असतो. रक् दूषित होणे म्हणजेच ओलावा कमी होणे.

"प्रयत्ने वाळूचे कणही रगडिता तेलही गळे" असे म्हणायची वेळ का येते तर वाळू एवढी कोरडी असते की त्यात जलांश वा तेलांश असूच शकत नाही. पण म्हणतात की खूप प्रयत्न केले तर कदाचित वाळूतूनही तेल निघणे शक् आहे. वाळूतील तेल काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल हा संदेश या म्हणीतून आपल्याला मिळतो. तात्पर्य काय तर कणाकणात ओलावा असावाच लागतो. लाकडात ओलसरपणा असेपर्यंत ते जिवंत असते, त्यातला ओलसरपणा एका मर्यादेपेक्षा कमी झाला की ते निर्जीव होते, त्याचा भुगा होतो, त्याचे कण वाऱ्यावर उडून जातात त्याचे आयुष्य संपते.

वस्तूचा जिवंतपणा त्यातील जलांशावर वा तेलांशावर अवलंबून असल्याने तोच अंश काढून घेतल्यास वस्तूचा आकार तसाच राहिला तरी त्या वस्तूत काही तथ्य राहिलेले नसते.

आयुर्वेदाने अन्नाच्या परिवर्तनानंतरच्या धातू - स्निग्धांशाला वीर्य असे संबोधले. म्हणून एखाद्या वस्तूत वीर्य किती आहे त्यानुसार त्या वस्तूची किंमत ठरते. सध्या लवंगा, वेलची अशा महागड्या वस्तू त्यातील तेल काढून घेऊन नंतर स्वस्तात विकल्या जातात. अशा वस्तू वापरून, "मी शिऱ्यात वेलची टाकली' अशा समाधानापेक्षा अन्य काही उपयोग होत नाही. अशा वेलचीला वास येत असला तर त्या वेलचीला रासायनिक द्रव्य लावले आहे, असे समजायला हरकत नाही.

प्रत्येक वस्तूतला जलांश हेच त्या वस्तूचे जीवन असते. तसेच, मनुष्याच्या शरीरातील रक् हेच त्याचे जीवन असते. रक् बाहेर बनविता येत नाही. ते वाळविताही येत नाही. वाळण्याची सुरुवातीची क्रिया म्हणजे ते थोडेसे घट्ट झाले तरी हृदयात वा मेंदूत अवरोध उत्पन्न होऊन हृदयाघात वा पक्षाघाताचा झटका आलेला दिसतो. रक् शरीरात असताना त्याचा एक विशिष्ट पातळपणा असणे आवश्यक असते, त्यातील सर्व द्रव्ये विशिष्ट प्रमाणात असावी लागतात प्रत्येक पेशीला रक्तातूनच जीवन मिळते. माया पातळ झाली तर व्यवहारात नातेसंबंध बिघडतात.

रक् अति पातळ होऊ लागले तर जखम झाली असता रक् वाहून जाईल आंतरेंद्रियांना आवश्यक त्या प्रमाणात रक्तपुरवठा होणार नाही. म्हणूनच हिमोफिलिया या रोगाची मोठी भीती वाटते. पण या रोगाशी लढण्यासाठी जन्मपूर्व प्रयत्न, गर्भसंस्कार नैतिक वागणूक यांची आवश्यकता असते आणि तरच औषधोपचार यशस्वी होतात.

शरीरात रक् भरपूर आहे किंवा नाही याचा अंदाज बोटाचे नख दाबून घेतला जातो. समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत बोट दाबले की तेवढा भाग पांढरट दिसतो कारण त्यातला जलांश दूर सरकतो तसेच नख दाबल्यावर प्रथम तेथील रक् बाजूला सरून तेथील नख पांढरट दिसते नखावरचा दाब काढल्यावर तेथे रक्तप्रवाह जलद गतीने येऊन नख लाल दिसते.

केसांमध्ये जोपर्यंत जीवांश किंवा तेलांश आहे तोपर्यंत केसांना चकाकी असते. अशा वेळी वरून लावलेले तेल उपयोगी पडते ते नीट बसतात. शरीराच्या मुख्य भागांनाच जेव्हा जीवनसत्त्वे मिळणे दुरापास्त होते तेव्हा केसांना बिचाऱ्यांना रक् कोठून मिळणार? अशा वेळी केस पांढरेफटक पडून वाऱ्यावर भुरभुरू लागले वा गळू लागले तर नवल नाही. तेव्हा केस गळण्याची तक्रार असल्यास फक् केसांना तेल लावून उपयोग नसतो. तर, शरीरातील रक्ताकडेही लक्ष द्यावे लागते. केस पांढरे होणे या तक्रारीवर उपाय करायचा असला तर रक्तावर उपचार करून नंतरच केसांवर उपचार करणे आवश्यक असते. शरीरात रक् कमी असले की ताकद राहात नाही, धाप लागते, त्वचा काळपट, पांढरट वा राखाडी म्हणजे जीवन नसलेली दिसू लागते.

रक् हेच जीवनाचे सर्वस्व असल्याने व्यक्ती कुठल्या रक्ताची आहे, व्यक्ती राजघराण्यातील रक्ताची आहे का? असे पाहिले जाते. यावरून लक्षात येते की रक्तसंबंध हाच शेवटी महत्त्वाचा असतो. युद्धात शत्रूचे रक् सांडणे किंवा रक्तशुद्धी, रक्ताचे नाते या गोष्टी नेहमी बोलण्यात असतात यावरूनही रक्ताचे महत्त्व लक्षात येते.

शरीरात रक् भरपूर प्रमाणात असले तरी त्यात काही दोष असतात असेही बरेच वेळा असे दिसते. जसे पाणी उघडे ठेवले तर वरून कीडा-मुंगी पडून पाणी दूषित होईल हे तर वेगळेच पण त्यात वातावरणातील धुळीचे बारीक कण मिसळून जातात काही वेळाने त्यात दोष उत्पन्न होतो. त्याचप्रमाणे शरीरावर कुठेही बाह्यवातावरणाशी संबंध येईल अशी उघडी जखम असल्यास खूप काळजी घ्यावी लागते. कारण, अशा उघड्या जखमेद्वारे बाह्यवातावरणातील जंतुसंसर्ग वा व्हायरससंसर्ग होऊ शकतो. या गोष्टीवर आधारित स्त्रियांच्या मासिक धर्माच्या वेळचे काही नियम केलेले दिसतात.

रक्ताची शुद्धता सांभाळणे खूप महत्त्वाचे असते. सेवन केलेल्या अन्नापासूनच रक् तयार होत असल्याने अन्न-पाण्याची शुद्धी पाळणे हे रक् शुद्ध ठेवण्याचा एक सोपा प्रभावी मार्ग असतो. मसालेदार, अति तिखट पदार्थ, तेलकट पदार्थ सेवन केल्यास रक्तात पित्तदोष उत्पन्न होऊन त्वचा लाल होणे, त्वचेवर गांधी वा पुटकुळ्या उठणे असे त्रास सुरू होतात. फुप्फुसात वा रक्तात मोठा दोष उत्पन्न झाला तर एक्झिमा, त्वचारोग, सोरायसिस असे रोगही झालेले दिसतात. डोक्यात कोंडा होणे, अंगावर कंड सुटणे, अंगावर सुई टोचण्यासारखे वाटणे असे सर्व त्रास झालेले दिसतात. रक्तातील बरेचसे दोष काही प्रमाणात तरी बरे करता येतात. तसेच ऍनिमिया म्हणजे रक् कमी प्रमाणात असणे या रोगाचाही इलाज करणे सोपे असते,

सध्या खाण्यापिण्यावर काही निर्बंध राहिलेले नसल्यामुळे आहारशास्त्राबाबतीत चुकीचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे बहुतेक ठिकाणी रक्तदोष घेऊनच मुले जन्माला आलेली दिसतात. त्वचेवर फोड, लालसरपणा याद्वारे रक्तदोष साधारणपणे प्रकट होतो पण रक्तदोष अधिक प्रमाणात असल्यास श्वसनाचे विकारही झालेले दिसतात. रक्तातील दोषामुळेच त्वचा काळवंडते हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून सौंदर्य वाढविण्याची वा रंग उजळ व्हावा चेहरा तेजःपुंज दिसावा अशी इच्छा असल्यास औषधयोजना करण्याचे काम रक्ताच्या माध्यमातून अत्यंत सोपेपणाने होऊ शकते.

 


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive