Sunday, April 4, 2010

चातुर्य कथा

चातुर्य कथा

चतुर व्हा

शरीर सुंदर सतेज वस्त्रे भूषणें केलें सज्ज

अंतरी नसता चातुर्य-बीज कदापी शोभा पावे

- समर्थ रामदास

सध्याच्या जगाला लाडीलबाडी प्रत्येक क्षेत्रातील जीव घेणी स्पर्धा , या दोन गोष्टींनी ग्रासलं आहे . भारताचे भावी आधारस्तंभ असलेल्या माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो, आपल्या अंगचा सज्जनपणा सोड्ता, जर या परिस्थितीवर मात करुन तुम्हाला आपली ध्येये साध्य करायची असतील तर, अंगी चातुर्य बाणविण्याची आत्यंनतीक गरज आहे.

परंतु 'चातुर्य' म्हणजे काय , हे ठाऊक आहे ? चातुर्य म्हणजे शहाणपणा, धोरणीपणा , मुत्सद्दीपणा, हजरजबाबी वृत्ती, धुर्तपणा, दूरदर्शीपणा, प्रसंगावधानता वगैरे गुणांच माणसाच्या डोक्यात तयार झालेलं एकजीव असं रसायन.

माणूस केवळ विद्वान असल्याने त्याचा या जगात निभाव लागत नाही. अंगी चातुर्य नसलेला विद्वान एखाद्या प्रसंगात सापडला, तर आपण या प्रसंगात का सापडलो, याची मुद्देसुद मीमांसा ही इतरांपुढे करीत बसतो, परंतु अंगी चातुर्य असलेला माणूस असे विवरण करीत बसता, आल्या प्रसंगावर मात करतो आणि आपली यशाची वाटचाल आक्रमू लागतो; थोडक्यात सांगायचं तर, विद्वत्ता ही नुसती बोलघेवडी असते, तर चातुर्य हे कृतिशील म्हणजे प्रत्यक्ष कृती करुन दाखविणारे असते. म्हणून जोश बिलिंग्ज नावाचा पाश्चात्य विचारवंत म्हणतो,

भावार्थ - विद्वत्ता ही ग्रंथालयांतून झोपा काढत घोरत असते, तर चातुर्य हे संभाव्य प्रसंगाला तोंड देण्यासाठी अगदी जागरुकतेनं एका पायावर उभे असते.

अंगी चातुर्य नसलेली माणसं भोवताली कितीही असली, तरी एकटा चतुर माणूस त्या सर्वांवर मात करु शकतो. आगऱ्यास औरंगजेबाच्या कैदेत सापडलेल्या शिवप्रभुंनी फ़ुलादखानाच्या पहाऱ्यातून आपल्या पुत्रासह पलायन केले, ते चातुर्याच्या जोरावरच ना ? म्हणून समर्थ म्हणतात..

उदंड बाजार मिळाले परी ते धूर्तचि आळिले ।।

धूर्तापासी काही चाले बाजाऱ्यांचे ।।

भावार्थ - बाजारबुणगे जरी संख्येनं बरेच असले, तरी धूर्त म्हणजे चतूर माणूस त्यांना ताब्यात ठेवतो. धूर्तापुढे त्या अलबत्या गलबत्त्यांचे काहीएक चालत नाही.

=============


दुसऱ्यासाठी खड्डा खणला आणि आपण त्यात पडला.

करीम न्हावी हा अकबर बादशहाचे केस दाढी कापायला नियमितपणे राजवाड्यावर जाई. तो बादशहाच्या वडिलांपासूनचा न्हावी होता. बिरबलावर जळणाऱ्या काही सरदारांनी एकदा त्या न्हाव्याला, तू बादशहांकडे केस कापायला जाशील, तेव्हा त्यांच्याशी अशा अशा तऱ्हेनं बोल, असं पढवलं त्याला राजवाड्यावर पाठवलं.
न्हावी त्याप्रमाणे राजवाड्यावर गेला बादशहाचे केस कापता कापता त्याला म्हणाला, 'खाविंद, आपल्या वडिलांचाही माझ्यावर अतिशय जीव होता, हे आपल्याला ठाऊक आहेच. नवलाची गोष्ट अशी की, आपले वडील मयत झाल्याला आता पाच सहा वर्षे झाली, तरी ते कधी चुकून माझ्या स्वप्नात आले नव्हते, पण गेल्या तीन रात्री लागोपाठ ते माझ्या स्वप्नात आले !'
बादशहानं कुतूहलानं विचारलं, 'असं ? मग त्यांची प्रकृती तुला कशी काय वाटली ?' त्यांनी तुला काही सांगितल का ?'
करीम म्हणाला, 'सांगितलं की ? पण आपण त्यावर विश्वास ठेवणार असाल, तर सांगतो.'
'
तू माझ्याजवळ खोटं कशाला बोलशील ?' असं बादशहा म्हणताच, अंगात उत्साह संचारुन करीम म्हणाला, हुजूर, आपल्या वडिलांची प्रकृती तशी चांगलीच दिसली, पण त्याचबरोबर ते मला उदास दिसले. साहजिकच मी त्यांना त्यांच्या उदासीनतेचं कारण विचारलं, तेव्हा ते मला म्हणाले, इथे खाण्या पिण्याची चंगळ आहे. पण या स्वर्गात प्रत्येक जण आपल्याच तोऱ्यात असतो. त्यामुळे माझा वेळा जाता जात नाही, म्हणून माझा बेटा अकबर याला माझा निरोप सांग की, एखादा चतूर, बुध्दीमान हजरजबाबी माणूस जर तुझ्याकडे असला तर त्याला काही दिवसांसाठी तरी लवकरात लवकर मजकडे पाठवून दे, म्हणजे माझा वेळ चांगला जाईल.'
आपण सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास बसल्याने, बादशहा आपल्याकडे संशयित नजरेनं पाहू लागला असल्याचं लक्षात येताच करीम त्याला म्हणाला, 'खाविंद, नाही ना बसत विश्वास ! बाकी विश्वास बसू नये, अशीच ही अजब गोष्ट आहे. परंतू लागोपाठ गेल्या तीन रात्री आपले वडील माझ्या स्वप्नात आले आणि हा एकच निरोप आपल्याला सांगण्याची जबाबदारी मजवर टाकून ते अदृश्य झाले, म्हणून मी आपल्याला त्यांचा निरोप पोहोचता केला. त्याची दखल घ्यायची की नाही, ते आपण ठरवावं' करीमनं एवढं सांगितल्यावर बादशहाचा त्याच्यावर विश्वास बसला तो विचार करु लागला. कूणाला बरं स्वर्गात पाठवून द्यावं ? परंतू चातुर्य हजरजबाबीपणा यांच्यायोगे वडिलांच मनं रिझवू शकेल, असा बिरबलाखेरीज दुसरा माणूस आपल्याकडे कोण आहे ? पण बिरबल या गोष्टीला तयार होईल का ? विचारुन तर बघावं.
याप्रमाणे विचार करुन, बादशहाने बिरबलाला बोलावून घेऊन करीम न्हाव्याला लागोपाठ तीन रात्री पडलेले स्वप्न त्याच्या कानी घातले विचारले, 'बिरबल, तू जाशील का रे स्वर्गात ? अर्थात एक तर स्वर्गात गेलेल्या माणसाला पृथ्वीवर परत येता येत नाही, आणि दुसरे म्हणजे समजा परत येणे शक्य झाले, तरी तुझ्यासारख्याला माझे वडील सोडायला तयार होणे शक्य नाही, म्हणून मी तुझ्या पश्चात तुझ्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी पंचवीस हजार सुवर्ण मोहोरा द्यायला तयार आहे. मग आहे जायची तुझी तयारी ?'
बिरबल म्हणाला, 'आपल्या वडिलांना जर माझ्यासारख्याच्या सहवासाची गरज आहे, आणि मी जावं अशी जर आपलीही इच्छा आहे, तर जातो. पण त्या पंचवीस हजार मोहोरा तेवढ्या माझ्या समक्ष माझ्या कुटुंबियांच्या स्वाधीन करा, म्हणजे मला स्वर्गात गेल्यावर त्यांची काळजी राहणार नाही.'
बादशहाने तेवढ्या मोहोरा दिल्यावर, बिरबलाने आपल्या सेवकांना स्मशानात चंदनाची चिता रचायला सांगितले, आणि मुहुर्तासाठी वेळ घेऊन, तेवढ्या अवधीत आपल्या विश्वासू नोकरांकडून त्या चितेच्या मध्यापासून ते काही अंतरावर असलेल्या गर्द झुडपापर्यंत एक भुयार खोदून घेतले.
मुहूर्ताच्या दिवशी राजेशाही सरंजामात बिरबल स्मशानात गेला त्याने त्या लाकडांच्या मध्यभागी असलेल्या पोकळीत उडी घेतली. लगेच त्याच्याच विश्वासू नोकरांनी त्या मधल्या पोकळीत लाकडे टाकून त्या चितेला अग्नी दिला.
चिता धडधडू लागली असता, बिरबल त्या भुयारातून रांगत रागंत त्या झूडपात दडलेल्या भुयाराच्या दुसऱ्या तोंडातून बाहेर पडला त्या झुडपात बसला. सर्व दिवस त्या झुडपात दडून राहून, रात्री त्याने दूरच्या गावचा रस्ता धरला. पाच -सहा महिने केस, दाढी मिशा कापता त्या दूरच्या गावी राहून, तो एके दिवशी बादशहाच्या दरबारात अकस्मात दाखल झाला.
त्याला पाहताच बादशहा इतर दरबारी मंडळी भयभीत झाली. त्यांची ती अवस्था पाहून बिरबल म्हणाला, 'घाबरु नका. मी भूत नसून, स्वत: बिरबलच तुमच्यापुढे उभा आहे.'
बादशहानं विचारलं, 'पण बिरबल, स्वर्गात गेलेला तू परत पृथ्वीवर कसा आलास ?'
'
चातुर्य हिकमत यांच्या जोरावर !' बिरबलानं उत्तर दिलं.
'
मग बिरबलजी, आम्हालाही ती हिकमत सांगा ना ?' बादशहासह सर्वजण आग्रहपूर्वक म्हणाले.
बिरबल म्हणाला, 'ती युक्ती मी सांगितली तर परलोकी जाणारा प्रत्येक त्या युक्तीच्या जोरावर पृथ्वीवर परत येईल, आणि पृथ्वीवर पाय ठेवायला जागा उरणार नाही. तेव्हा त्याबद्दल मला विचारू नका.'
बादशहानं विचारलं, 'बरं ते जाऊ दे. आमचे वडील कसे काय आहेत ?'
बिरबल म्हणाला, 'ते आता आनंदात आहेत. फ़क्त एकच उणीव आहे तिथे. स्वर्गात सर्वच पुण्यात्मे जात असल्याने, कुणीही तिथे दुसऱ्यांच्या हजामती करण्याचं कमी प्रतिष्ठेचं काम करायला तयार नसतं. साहजिकच आपल्या वडिलांची दाढी वाढून कमरेला लागू लागली आहे, तर केस मागे मांड्यांपर्यंत पोहोचले आहेत. तेव्हा वास्तविक त्यांनी करीमच्या स्वप्नात येऊन, हजरजबाबी चतूर माणसाप्रमाणे त्यालाही बोलावलं होतं, पण त्याने तेवढा निरोप आपल्याल सांगायचे टाळले !'
आता करीमवर संक्रात आली. बादशहाच हुकूम सुटला. नाही म्हणण्याची करीमची ताकद नव्हती. मग लवकरच वाजतगाजत त्याला कबरस्तानात नेण्यात येऊन, विधिपूर्वक पुरण्यात आले. तेव्हापासून बिरबलाविरुध्द कारस्थाने रचणाऱ्या सरदारांना त्याचा चांगलाच वचक बसला.

 



 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive