Monday, April 12, 2010

लठ्ठपणा घालविण्याचे सोपे उपाय Tips for Reducing Fat

लठ्ठपणा घालविण्याचे सोपे उपाय

तुमचा आत्मनिर्धार पक्का मनोबल दृढ असेल तर अर्धी लढाई जिंकल्यातच जमा आहे. तुमची इच्छाशक्तीच प्रबल असली तर तुमचे काम फत्ते झालेच समजा. वजन कमी. करण्यासाठी काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. यात नियमितपणा तेवढा महत्त्वाचा आहे. नाहीतर सगळेच मुसळ केरात, असा प्रकार होईल. त्यामुळे प्रयत्नात सातत्य असणे आवश्यक ठरते. वजन कमी करण्यासाठी आपले वजन नेहमी मोजले पाहिजे. दरदिवशी किंवा आठवड्यातून एकदा वजन मोजले पाहिजे.

तसेच त्याची नोंदही ठेवले पाहिजे. डाएटिंग सुरु केल्यानंतर वजन कमी होण्याची गती अपेक्षाकृत जलद असते. नंतर मात्र ही गती मंदावते. त्यामुळे निराश होऊ नये. त्यानंतर मात्र वजन कमी होऊ लागते.

काय खायचे आणि किती खायचे या बाबतीतही जागरुक असले पाहिजे. परंतु पाणी जास्त पिले पाहिजे. चांगल्या आरोग्यासाठी रोज किमान -१० ग्लास पाणी पिले पाहिजे. पाण्यामध्ये काहीच कॅलरी नसतात. पाणी जास्त प्यायल्याने भुकही कमी लागते. पाण्यामुळे पोटही साफ राहते. सकाळी एक चमचा मधाबरोबर लिंबाचा रस आणि एक ग्लास कोमट पाणी घ्यावे. रोजच्या आहारात सॅलड, ज्यूस, कांदा, टमाटे, मूळा, गाजर, काकडी. पत्ता कोबी असावे. यात कमी कॅलरी तर असतात. तद्वतच आवश्यक जीवनसत्वेही असतात.

एकटी राहणारी व्यक्ती फ्रीजमध्ये कमी कॅलरी असलेली पदार्थ साठवू शकतात. परंतु कुटुंबासमावेत राहण्यासाठी हे शक्य होत नाही. तेव्हा डायटींग करणे कठीण होते. तेव्हा मनोनिर्धार कामी येतो. काही झाले तरी कमी खायचे हा परिपाठ पाळायचाच. आहारात तळलेले चटकार आणि गोड पदार्थ टाळावेत. जेवण करतांना आपले पूर्ण लक्ष जेवणावरच केंद्रीत करावे. वजन कमी करतांना आपल्या मित्रांशी स्पर्धा करा. रात्री हलका आहार घ्या. जेवल्यानंतर लागलीच झोपी जाऊ नका. लगेच झोपल्यास कॅलरीच खर्च होत नाहीत. डायटिंग बरोबर व्यायाम केल्यास अपेक्षाकृत वजन कमी झाल्याचे लक्षात होईल. व्यायाम करण्यापूर्वी याबाबत आपल्या डॉक्टरांकडून तुम्ही निवडलेला व्यायाम तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, याची खात्री करु घ्या.

 


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive