Saturday, April 3, 2010

सानियाला बाळासाहेबांचा 'फोरहँड'

सानियाला बाळासाहेबांचा 'फोरहँड'


' सानिया मिर्झाचं हृदय भारतीय असतं, तर ते पाकड्यांसाठी धडकलं नसतं...इकडे लोक राष्ट्रासाठी धर्मासाठी स्वतःचे रक्त सांडत आहेत, हौतात्म्य पत्करत आहेत आणि ही त्या पाकड्यासाठी राष्ट्रनिष्ठाही विसरली. अरे थुत् तुमच्या जिनगानीवर !...' अशा जहाल शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज सानियाला सणसणीत ' फोरहँड ' लगावलाय.

लग्नासाठी पाकिस्तान आणि पैसा, प्रसिद्धीसाठी भारत, हे चालणार नाही. बये, तू आता जातच आहेस ना त्या शोएबशी निकाह करून पाकिस्तानात, मग त्याच देशाकडून वाट्टेल तेवढे खेळ ना ! , असंही त्यांनी सानियाला सुनावलं आहे.

सानिया मिर्झाचा पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मल्लिकशी होत असलेला ' निकाह ' सध्या वादाच्या भोव-यात सापडलाय. लग्नानंतर सानिया कुणाची ? भारताची की पाकिस्तानची ?, हा प्रश्न सर्वच वर्तुळात गाजतोय आणि त्यात राजकीय मंडळींनीही उडी घेतली आहे. लग्नानंतरही मी भारताकडूनच खेळेन, या सानियाच्या भूमिकेवर प्रामुख्यानं शिवसेनेनं आक्षेप घेतलाय आणि त्याचं सविस्तर ' विवेचन ' बाळासाहेबांनी आज ' सामना ' च्या अग्रलेखातून केलंय. ' सानिया मिर्झाच्या ' पाक ' क्रीडा ' या मथळ्याखाली त्यांनी सानियाला खडे बोल सुनावलेत.

सानिया ही आंतरराष्ट्रीय ख्यातीची टेनिसपटू असल्याचे म्हटले जाते. ती कोणते आंतरराष्ट्रीय सामने खेळली आणि त्यातले किती सामने जिंकली हे तिला आणि त्या शोएबलाच माहीत, अशी खिल्ली उडवून बाळासाहेबांनी अग्रलेखाला सुरुवात केली आहे आणि पुढे त्यांचा स्वर चांगलाच कठोर झाला आहे. प्रेम आंधळे असते असे आम्ही ऐकले होते, पण स्वदेशाच्या भूमीवर रक्ताचे सडे पाडणा-यांच्या बाबतीतही ते हळवे होते हे यानिमित्ताने दिसले, असा टोला त्यांनी हाणला आहे. अभिनेत्री रिना रॉय लग्न करून पाकिस्तानात गेली, तेव्हा तिचे कसे हालहाल झाले, याचा दाखलाही ठाकरेंनी दिला आहे.

शोएबशी लग्न झाल्यानंतरही सानिया भारताकडूनच टेनिस खेळेल, असं तिचे वडील आणि ती स्वतः म्हणते. पण एकदा पाकिस्तानात गेल्यावर भारताकडून खेळायला हा देश, इथले कायदे म्हणजे तमाशा आहे की काय ?, असा सवाल बाळासाहेबांनी केलाय. सानियाला हा देश म्हणजे टेनिसमधला बॉल वाटला काय ? हवा तेव्हा, हवा तसा आपल्या रॅकेटने टोलवला ! भारताकडून टेनिस खेळण्याची एवढीच इच्छा होती, तर त्या पाकड्याऐवजी एखादा भारतीय जीवनसाथी निवडायचा होता, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive