सुरस कथा मार्केटिंगच्या
कथा नववीः-
कॅश फ्लो ( Cash Flow ), म्हणजेच पैशांचा प्रवाह हे टेक्नीक उद्योग धंद्यामधे वापरले जाते. याच तंत्राचा अत्यंत प्राभावीपणे उपयोग करुन भारतातील एका उद्योग समुहाने स्वतःचा प्रचंड विकास करुन घेतला आहे. हा आहे बिर्ला उद्योग समुह.
बिर्लांचे मुळ गाव आहे राजस्थानमधील झुंझुनु जिल्य्हामधील पिलानी हे छोटे गांव. जवळ जवळ वाळवंटात बसलेले, कमी पाऊस पडणारे, पाण्याचे दुर्भीक्ष असलेले हे दुष्काळग्रस्त गाव आज जगाच्या नकाशावर आले आहे.
बिर्ला कुटुंबियांनी व्यापारानिमित्त प्राथम मुंबईला प्रयाण केले व मग पुढे त्यांनी कलकत्याला स्थलांतर केले. याच घराण्यात एक युगपुरुष जन्माला आला. त्याचे नांव घनश्यामदास बिर्ला. ते जी.डी. बिर्ला या नावाने जास्त परिचीत आहेत. लहानपणापासुनच त्यांनी पैशांचे महत्व ओळखले होते. पैशांचा योग्य वापर कसा करायचा, तसेच पैशाचा योग्य आदर कसा करायचा हे त्यांना चांगले ठाऊक होते. आपल्या 18व्या वाढदीवशी आपल्या बँक अकाऊंटला कमीत कमी एक कोटी रुपये जमा असायला हवेत असा संकल्प त्यांनी सोडला होता. शेअरमार्केटमधे ट्रेडींग करुन त्यांनी हा संकल्प कसा पुरा केला याची अत्यंत स्पृहणीय कथा त्यांच्या आत्मचरित्रात सांगीतली आहे. आर्थीक उद्दिष्टे मोठी कशी ठेवावीत व ती कशी पुर्ण करावीत हे त्यांनी दाखवुन दिले आहे. ब्रिटिशांच्या जमान्यात वयाच्या 18 व्या वर्षी आपल्या बँक अकाऊंटमधे एक कोटी रुपये गोळा करणे ही काही मामुली गोष्ट नव्हती.
भारतीय व्यापारी शक्यतो ट्रेडींग म्हणजे व्यापार करत असत. त्यावेळी भारतातील मॅन्युफॅक्चरींग ऍक्टीव्हीटीज ब्रिटीश किंवा स्कॉटीश लोकांच्या हातात होत्या. पण जी.डी.बिर्लांनी मॅन्युफॅक्चरींगचे महत्व ओळखले होते. त्यामुळे त्यांनी मॅन्यु॑फॅक्चरींगमधे उतरायचे ठरवले व कलकत्याला स्वतःच्या ज्युट मिल्स, म्हणजे तागापासुन कापड बनविण्याच्या गिरण्या सुरु केल्या. पण ब्रिटीश व स्कॉटीश लोकांना हे काही रुचले नाही. त्यांनी बिर्लांच्या ज्युट मिल्स बंद पाडण्याचे हरतर्हेहचे प्रयत्न करुन पाहिले पण जी.डी. नी त्यांना भीक घातली नाही. भारताला स्वातंत्रय मिळाल्यावर त्यांना संधींची अनेक द्वारे खुली झाली. त्याचवेळी जी.डीं.नी इंजिनीअरींग सेक्टरचे महत्व ओळखले. इंजिनीअरींग सेक्टरच भारताला खर्या अर्थाने प्रगतीपथावर नेईल हे त्यांनी चांगले ओळखले. त्यामुळे इंजिनीअरींग उद्योगांत जास्तीत जास्त गुंतवणुक करण्याचे धोरण त्यांनी ठरवले. इंजिनीअरींगचे महत्व ओळखणारे टाटा, किर्लोस्करांनंतर जी.डी.बिर्लाच होते. त्यामुळे आजच्या बिर्ला उद्योग समुहाचा पाया जी.डी.बिर्लांनीच घातला असे समजले जाते.
कॅशफ्लोचे महत्व जी.डी.नी बरोबर ओळखले होते. येणारा पैसा हा जाणार्या पैशांपेक्षा नेहमीच जास्त असावा व कंपनीकडे सतत पैसा शिल्लक असावा असे हे तंत्र आहे. याचा अत्यंत प्राभावीपणे उपयोग करुन जी.डीं.नी आपल्या सगळ्या कंपन्या कॅश रीच करुन टाकल्या. त्यामुळे खर्यां अर्थाने बिर्ला उद्योग समुह श्रीमंत उद्योग समुह समजला जातो. बाजारात कितिही उलथापालथ झाली तरी बिर्ला उद्योग समुहावर त्याचा फारसा परिणाम होत नाही. आपल्याला पण हे टेकनीक प्राभावीपणे वापरुन कॅश रीच होता येणे शक्य आहे.
बिर्ला मंडळी आपल्या पिलानी या मुळ गावाला मात्र अजिबात वीसरले नाही. इंजिनीअरींगचे महत्व लक्षात घेऊन त्यांनी जेव्हा पिलानी या गावी इंजिनीअरींग कॉलेज काढायचे ठरवले तेव्हा लोकांनी त्यांना वेड्यात काढले. पिलानीसारख्या पाण्याचे दुर्भीक्ष असलेल्या गावात कोण इंजिनीअरींग शिकायला येणार असे लोकांना वाटले. त्यामुळे हे इंजिनीअरींग कॉलेज फारसे यशस्वी होणार नाही असे लोकांना वाटले. पण बिर्लांनी त्यांचा होरा पुर्णपणे चुकिचा ठरवला. आज हेच कॉलेज बीटस पिलानी ( BITS Pilani) या नावाने ओळखले जात असुन आय. अय. टी.
( Indian Institute of technology ) नंतरचे सर्वात चांगले इंजिनीअरींग कॉलेज म्हणुन ओळखले जाते.
जी. डी. बिर्लांची रहाणी अत्यंत साधी होती. संपुर्ण शाकाहार व मद्यसेवन वर्ज ही त्यांची तत्वे होती. त्यांनी त्यांची हीच तत्वे आपल्या सगळ्या कंपन्यांमधे रुजवली आहेत. आजही कुठल्याही बिर्ला कंपनिच्या ऑफीशीयल पार्टिमधे नॉन व्हेज फुड व हार्ड ड्रिंक्स नसतात. यामधे फक्त व्हेज फुड व सॉफ्ट ड्र्रिंक्स असतात. हार्ड ड्रिंक्स व नॉन व्हेज फुडशिवाय पार्ट्या यशस्वी होत नाहीत असा अनेकांचा गैरसमज आहे. थोडक्यात हल्लिच्या भाषेत सांगायचे तर धासफुस वाल्या कोरड्या पार्ट्या यशस्वी होत नाहीत. पण बिर्लांनी हा समज साफ खोटा ठरवला आहे. अशा पार्ट्या सुध्धा यशस्वी होऊन त्यात कोट्यावधी रुपयांचे व्यवहार होऊ शकतात हे त्यांनी दाखवुन दिले आहे. या ना त्या कारणाने चीकन, मटण व दारुच्या पारट्या करणार्याह आजच्या तरुण पिढिला ‘पारट्यांमधे नॉव वेज फुड व हार्ड ड्रिंक्स असलीच पाहिजेत असे नाही. ती नसली तरी फारसा फरक पडत नाही’ हा संदेश मिळाला तरी पुरे.
जी.डी. बिर्ला हे पुढे महात्मा गांधींचे अनुयायी बनले. स्वातंत्रय लढ्यात त्यांनी पण भाग घेतला. गांधिजिंचा मुक्काम बर्याहच वेळा त्यांच्या घरात असे. त्यांच्या दिल्लितील घरातच गांधिजिंचा वध झाला. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतुन त्यांनी अनेक ठिकाणी बिर्ला मंदिरांची उभारणी केली. त्यांची मंदिरे हा वास्तुशास्त्राचा व स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना म्हणुन ओळखला जतो.
आपण त्यांचे कॅश फ्लोचे तंत्र प्रभाविपणे वापरले. तसेच संपुर्ण शाकाहार व मद्यसेवन वर्ज एव्हडी तत्वे जरी पाळली तरी पुष्कळ आहे.

No comments:
Post a Comment