Saturday, January 28, 2012

जगप्रसिद्ध कादंबरीचा सुरस मराठी अवतार "द हॉबिट.' The Hobbit in marathi

गेल्या अर्धशतकात मराठी साहित्यात अनुवाद वाङ्‌मयाची एक उसळी मारणारी लाट आली आहे. स्वतंत्र ललित साहित्याच्या बरोबर किंबहुना काकणभर अधिकच, अनुवाद साहित्याला मराठीत "स्पेस' मिळत आहे. याच प्रवाहातील एक कादंबरी म्हणजे "द हॉबिट.'

जे. आर. आर. टॉल्किन या विख्यात कादंबरीकारानं हे पुस्तक मुलांसाठी लिहिलं. 1937 मध्ये स्वत:च्या मुलांसाठी लिहिलेल्या या कादंबरीनं मग इतर अनेक मुलांना आणि मोठ्यांनाही वेड लावलं आणि वाचकविश्‍वात या कादंबरीनं लोकप्रियता मिळविली.

ही कादंबरी खरं तर टॉल्किनच्याच "द लॉर्ड ऑफ द रिंग्ज' या आणखी एका गाजलेल्या कादंबरीचा पूर्वरंग आहे; पण हा पूर्वरंग उत्तररंगाइतकाच नयनमनोहर आणि चित्तचक्षुचमत्कारिक आहे.

"द हॉबिट' ही एक कल्पनारम्य गूढकथा आहे किंवा गूढ अशी कल्पनाकथा आहे. मुलांसाठीच असल्यामुळे तीमध्ये मुलांच्या कल्पनाविश्‍वात जे जे साहसी, धाडसी, गूढ, कल्पनारम्य, अगम्य असे असेल ते ते सर्व या कादंबरीत आहे. मुलांच्या विश्‍वातील मनोव्यापाराला तार्किक व तर्कसंगत प्रश्‍न विचारायचे नसतात किंवा त्या प्रश्‍नांची उत्तरं कार्यकारणभाव सिद्धान्ताचा वापर करून शोधायची नसतात. कल्पनारम्य मनोव्यापार हीच ती संगती आहे.

टॉल्किनने याच सूत्राचा वापर करून "द हॉबिट' लिहिली आहे. पराक्रम, धाडस, जादू, चमत्कार या सर्व गोष्टींची रेलचेल "द हॉबिट'मध्ये असल्याने वाचक त्यात आकंठ बुडून जातो आणि त्यातील ड्‌वार्फसबरोबर त्याचाही प्रवास सुरू होतो. "द हॉबिट' हाच एक चित्तथरारक प्रवास आहे. कारण टॉल्किनने कादंबरीच्या पर्यायी नावातच त्या प्रवासाचे सूचन केले आहे.

"द हॉबिट : किंवा तिथं आणि पुन्हा परत' असं या कादंबरीचं नामकरण लेखकानंच केलेलं आहे. "तिथं आणि पुन्हा परत' या प्रवासाची ही डबलक्राऊन आकाराची 242 पाने आहेत. हा प्रवास प्रदीर्घ, किचकट, अफलातून, रोमांचकारी, कधीकधी कंटाळवाणा, तर कधी कमालीची उत्सुकता वाढविणारा आहे. या प्रवासात बिळं आहेत, टेकड्या आहेत, आगपाणी आहे; आणि एरवीच्या सरळ जीवनात कधीही येऊ शकणार नाहीत असे लोकविलक्षण अनुभव या कादंबरीतील शब्दाशब्दांतून वाचकाला अनुभवायला मिळतील.

एका अनपेक्षित पाटीपासून सुरू झालेला हा प्रवास बिल्बो बघत असतो. ही गोष्ट नेमकी आहे तरी काय? एका श्रीमंत हॉबिटचं नाव होतं बॅगिन्स! एक बॅगिन्स एका धाडसाला कसा सामोरा गेला आणि पूर्णपणे अनपेक्षित अशा गोष्टी कशा करू-बोलू लागला त्याची ही रंजक व रम्य गोष्ट आहे. हे हॉबिट्‌स बूट वापरत नाहीत, कारण त्यांना त्याची गरजच नसते. मोठ्ठं पोट, भडक रंगाचे कपडे, पावलांवर निसर्गत:च मांसाचा जाड तळवा, डोक्‍यावर जाड उबदार तपकिरी केसांचं जंगल, लांबसडक बोटं, असे हे हॉबिट्‌स हसतात मात्र छान!

वर्तुळातून वर्तुळ आणि त्यातून अनेक वर्तुळं निर्माण व्हावीत तसा हा त्यांचा प्रवास असतो आणि प्रवास जसा हॉबिट्‌स, बिल्बो यांचा आहे तसाच तो वाचकांचाही आहे, किंबहुना वाचक हेच खरे या विलक्षण प्रवासाचे प्रवासी आहेत.

सारा निसर्ग उघड्या पुस्तकासारखा लेखकानं वाचकांसमोर मांडला आहे. त्यामुळे या कादंबरीच्या प्रवाहातील गूढरम्यता निसर्गसौंदर्याच्या लयीत जोजवली आहे शब्दमय हे वाचकांना सहजी जाणवेल आणि एक अननुभूत विश्‍वाची शब्दाच्या अनुभूती वाचक घेऊ शकतील.

यातील बिल्बोच्या बरोबर या गूढरम्य दुनियेचा प्रवास वाचक करतो तेव्हा आपण कोणत्या भयंकर वा अभयंकर विश्‍वात बिल्बोसोबत गेलो हे त्याला कळतही नाही; पण नंतर जाणवतं मात्र नक्की!

बिल्बो बॅगिन्स एका प्रचंड मोठ्या आणि अतिशय धोकादायक अशा स्मॉग द मॅग्निफिसंट या ड्रॅगनच्या खजिन्यावर हल्ला करण्याच्या योजनेत सामील होतो. बिल्बो यासाठी नाखूष होता, पण नंतर तो या मोहिमेत युक्तिबाजपणे डोके लढवतो. स्वत:चीच कौशल्ये वापरून स्वत:च चकित होतो.

थोडक्‍यात, "द हॉबिट्‌स' हा एक चकित प्रवास आहे. या पुस्तकाची वैशिष्ट्यं म्हणजे ऍलन ली या जगप्रसिद्ध चित्रकाराची रेखाटने या पुस्तकात आहेत. त्यांची छपाई नयनमनोहर आहे. 1937 च्या या कादंबरीला 1997 मध्ये ऍलन ली यांची चित्रे मिळाली आणि या कादंबरीची वाचनीयता अधिक वाढली. ती दर्शनीय व प्रेक्षणीय झाली. भारतात जरी ही कादंबरी इतकी लोकप्रिय झालेली नव्हती तरी परदेशात तिच्या पताका फडकत होत्या. "द टाइम्स' या जगप्रसिद्ध वर्तमानपत्रात या कादंबरीविषयी लिहिलं आहे.

""इंग्लिश भाषिकांचं जग दोन भागांत विभागलं गेलं आहे. एक म्हणजे ज्यांनी "द हॉबिट' आणि "द लॉर्ड ऑफ द रिंग्ज' ही पुस्तके वाचली आहेत ते आणि जे आता ती वाचणार आहेत ते.'' "संडे टाइम्स' आणि "ऑब्झर्व्हर' यांनीही कौतुक करताना म्हटलंय : ""ड्‌वार्फस आणि एल्व्हज, भीतिदायक गॉब्लिन्स आणि ट्रॉल्स, यांच्या पराक्रमाची उत्तम पद्धतीनं लिहिलेली ही कथा आहे. प्रवास आणि जादूमय धाडसे यांचा उद्‌ध्वस्त करणारा शेवट असल्याने हे पुस्तक म्हणजे भावना उद्दिपित करणारं जणू महाकाव्य.'' ही कलाकृती निर्दोष व अत्युत्तम आहे, असं "ऑब्झर्व्हर' म्हणतो.

महाकाव्याबाबत भारतीय कल्पना वेगळ्या आहेत त्यामध्ये हे पुस्तक समाविष्ट होणे शक्‍य नाही. पण महाकाव्यासारखा प्रदीर्घ कालखंड, विशाल पट, विस्तृत लोकसमूह आणि घटना-प्रसंगांची रेलचेल यामधून मनुष्य स्वभावाचं दर्शन घडविणारं हे पुस्तक म्हणजे अनोखी कलाकृती आहे, यात शंका नाही. मूळ संहितेशी प्रामाणिक असणारा अनुवाद हेच याचं बलस्थान आहे.

हॉबिट , जे. आर. आर. टॉल्किन, अनुवाद - मीना किणीकर,  डायमंड पब्लिकेशन्स,

डॉ. न. म. जोशी


Purchase Marathi book here

Book Summary of The Hobbit

The Hobbit is a tale of high adventure undertaken by a company of dwarves in search of dragon-guarded gold.

A reluctant partner in this perilous quest is Bilbo Baggins, a comfort-loving and unambitious hobbit. Filled with encounters with trolls, goblins, elves, giant spiders, riddles and the discovery of a Ring, this wonderful story also forms a prelude to The Lord of the Rings.

About The Author
John Ronald Reuel Tolkien was born on the 3rd January, 1892 at Bloemfontein in the Orange Free State, but at the age of four he and his brother were taken back to England by their mother. After his father?s death the family moved to Sarehole, on the south-eastern edge of Birmingham. Tolkien spent a happy childhood in the countryside and his sensibility to the rural landscape can clearly be seen in his writing and his pictures.

His mother died when he was only twelve and both he and his brother were made wards of the local priest and sent to King Edward?s School, Birmingham, where Tolkien shone in his classical work. After completing a First in English Language and Literature at Oxford, Tolkien married Edith Bratt. He was also commissioned in the Lancashire Fusiliers and fought in the battle of the Somme. After the war, he obtained a post on the New English Dictionary and began to write the mythological and legendary cycle which he originally called The Book of Lost Tales but which eventually became known as The Silmarillion.

In 1920 Tolkien was appointed Reader in English Language at the University of Leeds which was the beginning of a distinguished academic career culminating with his election as Rawlinson and Bosworth Professor of Anglo-Saxon at Oxford. Meanwhile Tolkien wrote for his children and told them the story of The Hobbit. It was his publisher, Stanley Unwin, who asked for a sequel to The Hobbit and gradually Tolkien wrote The Lord of the Rings, a huge story that took twelve years to complete and which was not published until Tolkien was approaching retirement. After retirement Tolkien and his wife lived near Oxford, but then moved to Bournemouth. Tolkien returned to Oxford after his wife?s death in 1971. He died on 2 September 1973 leaving The Silmarillion to be edited for publication by his son, Christopher.

Click here to Purchase this book in English

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive