Monday, January 16, 2012

Chocolates world in India

असली स्वाद जिंदगी का

दहा- पंधरा वर्षांपूर्वी भारतातलं चॉकलेट विश्व फाइव्ह स्टार, डेरीमिल्क, इक्लेअर, मेलडी यांसारख्या मोजक्या चॉकलेटपुरतं मर्यादित होतं. मात्र, गेल्या काही वर्षांत जगभरातली असंख्य प्रकारची चॉकलेटस् दाखल होऊ लागल्यानंतर आपलं 'चॉकलेट वर्ल्ड'ही अधिक समृद्ध, चविष्ट आणि गोड झालं. केवळ चॉकलेटच नव्हे, तर चॉकलेट मिल्कशेक, हॉट चॉकलेट, चॉकिझा, चॉकोपिझा, कोकोपिझा, चिलर्स, शॉट ऑन बार, तिरामीसू... अशी चॉकलेट बेस असलेली भन्नाट व्हरायटी घेऊन ऑस्ट्रेलियन 'द चॉकलेट रुम' भारतात दाखल झाली. पंधरवड्यापूर्वी हीच चॉकलेट रुम ठाण्यातही उभी राहिली. तिथली चॉकलेट संस्कृती म्हणजे क्या बात है... क्या खास है ...क्या स्वाद है जिंदगी का....

सोळाव्या शतकात स्पेनचा राजा हेरनाडो कोर्टझ याने दक्षिण अमेरीकेतून 'कोको' हा प्रकार स्पेनला नेला. कोकोत साखर आणि इतर काही स्वाद मिक्स करून त्याने एक अप्रतिम चवीचा पदार्थ तयार केला. आज प्रत्येकाच्या हृदयात अढळस्थान मिळवणारा हा पदार्थ म्हणजे चॉकलेट. त्या चॉकलेटवर प्रत्येक देशात वेगवेगळे संस्कार घडले. भारतातातली चॉकलेट ही स्वीट कॅटॅगरीत मोडतात. तर, पाश्चिमात्य देशांमधली चॉकलेट सेमी डार्क आणि डार्क असतात. डार्क चॉकलेटमध्ये कोकोचं प्रमाण जास्त तर दूध-साखरेचं कमी असतं. हे चॉकलेट आरोग्यासाठी उत्तम असलं तरी कडवट चवीमुळे ते सगळ्यांनाच रुचेल असं नाही. मात्र, गेल्या काही वर्षांत भारतातील खवय्यांनादेखील सेमी डार्क चॉकलेट आवडू लागल्यानंतर ऑस्ट्रेलियातल्या 'द चॉकलेट रुम'ने २००७ साली भारतात पाय रोवण्यास सुरुवात केली. आज देशभरात ६० ठिकाणी चॉकलट रुम्सपैकी एक चॉकलेट रुम ठाण्यातील ढोकाळी नाक्यावरील आशर एन्केव्ह येथे उघडली आहे. चॉकलेटपासून तयार होणाऱ्या पदार्थांची नावं आणि त्यांची चवही भन्नाटच.

चॉकलेट सॉसच्या सहाय्याने तयार केलं जाणरं हॉट चॉकलेट अनेक ठिकाणी मिळतं. मात्र 'चॉकलेट रुम'मधले इटालियन हॉट चॉकलेट हे कोको पावडर, दूध आणि नैसगिर्क फ्लेवर्सपासून तयार होतं. क्लासिक, डार्क, मिंट अशा तब्बल १३ फ्लेवर्समध्ये हॉट चॉकलेट मिळण्याचं हे एकमेव ठिकाण. खालच्या कपात मेणबत्ती असलेल्या वॉमिर्ंग मगमध्ये हे हॉट चॉकलेट दिलं जातं. त्यामुळे गप्पा मारत मारत निांतपणे या 'हॉट' चॉकलेटचा आस्वाद घेता येतो. जिभेवर ठेवताच विरघळणारी बेल्जियमची चॉकलेटस् ही 'चॉकलेट रुम'चं खास आकर्षण. भारतातल्या चॉकलेटचं आवरण काहीसं टणक असतं. त्यामध्ये जेल किंवा फ्लेवरचं लिक्विड असतं. बेल्जियन चॉकलेट मात्र मऊशार असून त्यामध्ये विशिष्ट पेस्ट भरलेली असल्याने त्याची चव खासच आहे. पिझ्झा संस्कृतीतला चोकीझा हे चॉकलेट पिझ्झाही इथे मिळतो. कोको पावडरचा बेस आणि त्यावर चॉकलेट पेस्ट, ड्रायफ्रूटचे टॉपिंग आणि त्याला चॉकलेट सॉस, व्हाईट सॉस आणि डार्क चॉकलेटचे ड्रेसिंग केलेले चॉकडेट, रॉकीरोड, चिलीहॉट चोकीझ्झा म्हणजे चॉकलेट प्रेमीसांठी पर्वणीच.

हॉट चॉकलेटमध्ये सिझनल फळं बुडवून मिळणारे फेमस फॉण्ड्यू आणि युरोपीयन कोल्ड चॉकलेटचे चॉकशेक्स, दोन वेगवेगळ्या पेस्ट्री, चॉकलेट सॉस आणि चॉकलेट चिप्सपासून तयार केला जाणारा 'संडेज' हे प्रकारही भन्नाट आहेत. दूध, एक्स्प्रेसो, व्हॅनिला आइस्क्रीम आणि चॉकलेट सॉसपासून तयार केली जाणारी चिलर्स चाखण्यासाठी इथे 'ड्रिंक मी मग' असा स्पेशल कप दिला जातो. आनंदाच्या क्षणी फोडण्यासाठी 'चॉकलेट शॅम्पेन'ही इथे मिळते. त्यात अर्थात शॅम्पेनऐवजी सेमी लिक्विड चॉकलेट असतं. एखाद्या पबमध्ये जसा तकिला शॉट मारला जातो, तसाच चॉकलेटचा नॉन अल्कोहोलीक 'शॉट ऑन बार'ही इथे मिळतो. चॉकलेट सॉस आणि रम फ्लेवर मिक्स करून हा शॉट तयार केला जातो. स्ट्रॉबेरी, चॉकलेट, चोको अशा अनेक फ्लेवर्समध्ये या शॉटची मजा घेता येते. द चॉकलेट आऊटलेटच्या मालक अर्चना देसाई आणि त्यांची कन्या मानसी यांनी गेल्या आठवड्यात खास 'कोलावेरी संडे' ही स्पेशल डिश तयार केली. त्यावरही चॉकलेटप्रेमींच्या उड्या पडल्या. आता संक्रांतीला तोंड गोड करण्यासाठी खास चोकोतीळ लाडूही इथे मांडण्यात आलेत. त्याशिवाय फ्रोजन कॉफी, स्मोकिंग ब्राऊनी, चॉकलेट मॉकटेल्स, पनिऑन्स अशा चॉकलेटच्या अनेक करामती इथे चाखायला मिळतात.

चॉकलेट Chocolate खाऊन दात किडतात, भूक कमी होते अशी अनेक कारणं सागून लहानपणी प्रत्येकालाच चॉकलेटपासून दूर ठेवलं जातं. मात्र, तो जमाना आता सरलाय. चॉकलेट आरोग्यासाठी उत्तम असतं. डार्क चॉकलेटमधल्या कॅटेबीन्स - Catebeans कॅन्सर Cancer आणि हृदयविकार cure Heart disease टाळतो. चॉकलेटमधल्या कॅल्शियम Calcium, फॉस्फरस आणि मॅग्नेशिअममुळे Magnesium हाडे bones आणि दात Teeth मजबूत होतात. त्यात लोह Iron, तांबं Copper आणि व्हिटामिनदेखील असतं. त्यामुळे 'चॉकलेट खा आणि तरुण रहा' असा सल्ला डॉक्टरांकडूनच मिळतोय. त्यामुळे तरुण राहण्यासाठी आणि जिंदगीका असली स्वाद चाखण्यासाठी 'द चॉकलेट रूम'शिवाय दुसरं चांगलं ठिकाण नाही.

Chocolates world in India

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive