काही अन्वयार्थ
१. वाक्य - आमचा नातू खूप हुशार आहे, पण अभ्यासच करत नाही हो.
अर्थ -त्याला परीक्षेत गुण कमी मिळतात. ही सुद्धा एक स्टाईल आहे खोटं बोलण्याची.
२. वाक्य
आज खूप थकलो बुवा........
अर्थ- म्हणजे आता बायको सोबत बाहेर जाण्याचा कार्यक्रम रद्द..... आणि आधी चहा आणा!
३. वाक्य- टीम लीडर: वैशाली, युअर कम्युनिकेशन इज वीक अँड यू नीड टू इम्प्रूव इट. यू नो... यू शुड बी मोअर फ़ोकस्ड अल्सो!
अर्थ- वैशालीला इंग्रजी बोलणे जमत नाही आणि वरून इतरांच्या कामात तिचे जास्त लक्ष असते..... ते कमी करायला हवे.
४. वाक्य- सासरे जावयास:- तुम्ही खूप समजूतदार आहात. तुमच्यासारखा जावई मिळाला हे आमचे भाग्यच म्हटले पाहिजे. आपल्या राणीने अतिशय योग्य वर निवडला हो!
अर्थ- आम्हाला कल्पना आहे की आमची मुलगी तुम्हास किती त्रास देते? आणि हे तुमचे दुर्भाग्यच म्हटले पाहिजे. तुमची खरच फसवणूक झाली आहे आमच्या मुलीशी लग्न करुन.
५. वाक्य- बायको: अहो, आपले आई-बाबा (सासू-सासरे) किती चांगले आहेत. मला खूप्पच आवडतात.
अर्थ-हिचे आई-बाबा येणार आहेत लवकरच राहायला!
६. वाक्य- बाबा: अशोक, तुझे सर मला काल भेटले होते (अतिशय गंभीर चेहरा करुन). तुझे अभ्यासात
लक्ष नाही असे म्हणाले ते.
अर्थ...आता लवकर सायकल मिळणार नाही अशोकला.
७. वाक्य-नवरा: शुभा, पाऊस काय मस्त होतोय नाही...?
अर्थ- गरम गरम कांदा भजी बनवायला हरकत नही आता.....
९. वाक्य- रुग्णाचे नातेवाईक: डॉक्टर साहेब, तुम्ही पैशांची काळजी करु नका. फक्त त्यांना लवकर बरे वाटायला हवे.
अर्थ- मेडिक्लेम आहे कंपनी कडून त्यांच्या.
१०. वाक्य- वडील : बेटा तू पैश्यांची काळजी करु नकोस, फक्त अभ्यासात लक्ष दे आणि मोठा माणूस हो.
अर्थ- बाबांना पैसे जमवावयास खूप त्रास होतोय.
११. वाक्य- सासू नव्या सुनेस: सुनबाई, तू फक्त आपल्या घरातल्या मोठयांचा आदर-सत्कार कर, मी बाकीचे सांभाळून घेईन.
अर्थ-आम्ही जे सांगू ते तू ऐकले पाहिजेस, नाही तर माझ्याशी गाठ आहे.
१२. वाक्य
एक बर्थडे पार्टी रंगात आल्यावर......किशोर:- आता गाणी म्हणण्याचा कार्यक्रम होऊ देत.
अर्थ- म्हणजे किशोर स्वतःला सिंगर समजतो आणि तूच सुरुवात कर ना असे कुणी तरी त्याला सुचवावे असे त्याला वाटतेय.

No comments:
Post a Comment