Monday, January 16, 2012

अस्सल गावरान खिमा Non-veg dish Khima Pav from Nashik

अस्सल गावरान खिमा

हॉटेलात जाऊन नॉनव्हेज खायचं म्हटलं की चिकन किंवा मटण करी हा पहिला ऑप्शन समोर येतो . त्यानंतर फार तर बिर्याणीचा पर्याय येतो . पण शौकीन मंडळी सतत काही तरी वेगळ्या ' शिकारी ' च्या शोधात असतात . त्यांच्यासाठी कॅनडा कॉर्नरवरच्या विराज कॉर्नरमध्ये मागील बाजूस असलेल्या ' जय दुर्गा ' तला खिमा हा बेस्ट ऑप्शन आहे .

नाशकातलं अस्सल नॉनव्हेज म्हटलं की रस्सा भाकरी किंवा मटन / चिकन थाळी हा ठरलेला मेन्यू . मोठ्या हॉटेलात गेलं तर तिथं नॉनव्हेजचे पंजाबी किंवा लखनवी मेन्यू दिसतात . पण खिम्यासारख्या स्पेशल मेन्यूचा समावेश खूप कमी ठिकाणी असतो . त्यातही तिथला खिमा जर मशीनने चॉप केलेला असला तर तो खाऊन निराशाच पदरी पडते . त्यामुळे खिमा शौकीनांची भूक काही शमत नाही . पण ' जय दुर्गा ' तला खिमा जरा हटके आहे . वडिलोपार्जित हॉटेलचा व्यवसाय Hotel Business सांभाळणाऱ्या अनिल सोनवणे यांनी २००६ मध्ये कॅनडा कॉनरजवळ जय दुर्गा हॉटेल थाटलं . त्यापूर्वी एमजी रोडवरच्या टेम्पो स्टँन्डवर सोनवणे यांचं जय दुर्गा नावाचंच छोटेखानी हॉटेल होतं . त्याठिकाणी वडा पाव , पुरी भाजी , मिसळ सोबत खिमा पावही मिळायचा . सोनवणेंचे वडील माधवराव सोनवणे हे जुन्या काळातले हॉटेल व्यावसायिक म्हणुन परिचित आहेत . त्यांची हुंडीवाला लेनमध्ये आनंद व एमजी रोडवर गगन ही दोन हॉटेलं होती . हा सिलसिला पुढे नेत अनिल यांनी एमजी रोडच्या टेम्पो स्टँन्डवर जय दुर्गा हॉटेल सुरु केलं . पण जागेचा अभाव व सुविधेंच्या कमतरतेमुळे त्यांनी हा व्यवसाय कॅनडा कॉर्नरला हलवला .

वडिलोपार्जित हॉटेल व्यवसायात असतानाही अनिल यांनी स्पेशल खिमा पाववर भर देण्याचं कारण वेगळं आहे . नाशिककर नाश्ता करायला निघाले की त्यांनी मिसळच आठवते . त्यामुळे नाशकात गल्लोगल्ली मिसळ मिळते . त्यामुळे याव्यतिरीक्त काही तरी हटके नाश्ता द्यायचा या विचाराने त्यांनी खिमा पाववर लक्ष देण्याचं ठरवलं . जुन्या नाशकातल्या काही हॉटेलात खिमा मिळतो . पण तो महाराष्ट्रीयन पद्धतीचा नाही , अशी तक्रार येत असल्याने अनिल यांनी महाराष्ट्रीयन चवीचा खिमा बनवायला सुरुवात केली . यासाठी खिम्यासाठी लागणाऱ्या मटणापासून मसाल्यापर्यंत सगळ्या गोष्टींत ते जातीने लक्ष घालतात . त्याचा अनुभव खिमा खाताना येतो . चवीला अस्सल गावरान असणारा खिमा इथे बनतो . खिम्यासाठी लागणारं मटनही Mutton ते एकाच ठिकाणाहून घेतात . त्यात मटणाचं चॉपींग मशिनने नव्हे तर हाताने केलेलं असावं आणि तुकडे बारीक असावे ही अट असते . या खिम्यासाठी लागणारा मसालाही spices घरगुतीच असतो . त्यासाठी रविवार पेठेतल्या दगडू तेली यांच्या दुकानातून २२ प्रकारचा खडा मसाला आणला जातो . त्याचं योग्य त्या प्रमाणात मिश्रण केलं जातं . खिम्यासाठी लागणारा गरम मसालाही सोनवणे घरी बनवतात . त्यासाठी लागणारी लाल मिरची , हळद बाजारातून आणून त्याची भुकटी करुन त्यात लसूण व आलं मिक्स केलं जातं . या पद्धतीने तयार केलेल्या मसाल्यात खिमा तयार होतो तेव्हा त्याला निराळीच चव लाभते .

इथली खिमा बनविण्याची रेसिपीही हटके आहे . इतर ठिकाणच्या खिम्यात थोडा तरी रस्सा असतो पण जय दुर्गातला खिमा ड्राय असल्याने तो न शिजवता थेट तव्यावर टाकला जातो . आणि त्यावर मसाला टाकून जवळपास एक ते दीड तास तव्यावर सतत फ्राय केला जातो . न शिजवता तव्यावर टाकल्याने मटणाचा अर्क त्यात एकरुप होतो . तसेच जास्त वेळ फ्राय केल्याने मसाला खरपूस होतो . पावाच्या सोबतीने येणारी खिम्याची डिश समोर येताच मटण आणि मसालामिश्रीत गंध नाकात दरवळतो आणि भूक चाळवतो . त्यामुळे प्लेट समोर येताच ' तूट पडो ' अशी परिस्थिती निर्माण होते . खिम्याचा घास तोंडात टाकताच मटणाची चव आणि मसाल्याचा झटका सगळं काही विसरायला लावतो . खिम्यासोबतचा पावही टेस्टी आहे . लोण्यावर फ्राय केलेले पाव आकाराने जम्बो आहेत . पाव आणि खिमा दोन्हीही गरमा गरम असल्याने मग और क्या ? असंच म्हणायची वेळ येते . खिमा दिसायला जरी लाल असला तरी त्यात तिखटपणा कमी असतो . त्यामुळे खिम्याची घासा - घासाने मजा घेता येते . घरगुती पद्धतीचा खिमा पावासोबत खातानाची मजा एकदा तरी अनुभवयाला हवी .

नॉनव्हेज शौकीनांसाठी खिमा आहे मग व्हेजवाल्यांचं काय ? त्यावरही इथे पर्याय आहे तो म्हणजे व्हेज पुलाव . इथल्या खिम्याप्रमाणेच व्हेज पुलावही स्पेशल आहे . खास व्हेज वाल्यांची काळजी म्हणून अनिल यांनी व्हेज पुलाव ठेवलाय . त्यासाठी बासमती तांदूळ basamati Rice तर असतोच पण मसालाही घरगुती असतो . खडा मसाल्याचा वापर करुन वेगळ्या प्रकारचा मसाला तयार केला जातो आणि हळदीत शिजवलेला राईस तव्यावर खरपूस पद्धतीने फ्राय केला जातो . त्यामुळे हळद आणि मसाल्याचं मिश्रण छान जमतं . त्यावर स्पेशल बटरचा गोळा टाकत त्याची टेस्ट वाढवली जाते . त्यामुळे खातानाची लज्जत वाढते . खिमा Khima आणि व्हेज पुलावसोबत Veg pulav इथली मिसळ Misal आणि वडा पावही Vada pav चाखून पहायला हरकत नाही .

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive